- सेंथूर बालाजी
इयत्ता बारावी, इरोडे, तामिळनाडू
समजा आपण प्रवासाला गेलो, गाडी थांबली, वॉशरूमला गेलो तर दाराची कडी तुटलेली, मग काय करणार? कुणाला सांगणार? त्यावर उपाय एकच, आपण आपलं लॅच, आपलं पोर्टेबल कुलूप सोबत घेऊन जावं. पण ते बनवायचं कसं? याच प्रश्नाचं उत्तर शोधत सेंथूरनं अनेक चित्र काढली, डिझाइन्स बनवल्या. त्यातून त्यानं एक पोर्टेबल लॅच तयार केलं. पब्लिक टॉयलेटमधे गेलं की हे लॅच दाराला लावता येतं आणि तुटक्या कडीकुलपाची भीती राहत नाही.
सेंथूर म्हणतो, ‘नियमित प्रवास करणारे, महिला यांना अशा ठिकाणी किती त्रस होतो, मग त्यावर उपाय हवा म्हणून मी लॅच शोधलं. यातून मी एकच गोष्ट शिकलो, आपण स्वत:साठी काही केलं तर ते फार काळ टिकत नाही; पण इतरांसाठी केलं तर ते कायम टिकतं, त्याचा उपयोग जास्त होतो.’