दुआ दोस्ती के नाम.

By admin | Published: July 30, 2015 09:02 PM2015-07-30T21:02:54+5:302015-07-30T21:02:54+5:30

कमिन्या, छळकुटय़ा, दिलदार दोस्तीसाठी एक विशेष भेट. निमित्त, येत्या फ्रेण्डशिप डेचं!!

Dua friendship names | दुआ दोस्ती के नाम.

दुआ दोस्ती के नाम.

Next
>कमिन्या, छळकुटय़ा, दिलदार दोस्तीसाठी एक विशेष भेट. निमित्त, येत्या फ्रेण्डशिप डेचं!!
 
 
छळतात. खेटतात.. चिडवतात. हसतात.. खेचतात. पिडतात.. पकवतात. फसवतात. गंडवतात..
टांगतात. पचकतात.. अकडतात. मकडतात.. सतावतात. गचकवतात. अडकवतात आणि कधी कधी तर हरवतातही. त्या  ‘कमिन्यांना’ दोस्त म्हणतात..
---------
दोस्त!!
आयुष्यात येतात तेव्हा कुणीच नसतात आपले,
पण असे काही आपल्या आयुष्यात वादळासारखे घुसतात की,
पुन्हा आपलं आयुष्य काही जुन्या वळणावर येत नाही.
ते भलत्याच वाटेनं निघतं
आणि सोबत असतातच हे दोस्त.
सांगितलं ना, ते कुणीच नसतात आपले,
पण त्यांच्याशिवाय आपल्या
असल्यानसल्या, ब:यावाईट, चांगल्या-छळकुटय़ा
जिंदगीची कल्पनाही करता येऊ शकत नाही.
ते असतात, म्हणून तर या बोअरछाप,
पकाव आणि कठोर आयुष्यात
आनंदाच्या लाटा उसळतात.
नाहीतर असतं काय,
या रटाळ-रुटीन जगण्यात??
 
दोस्त!!
 
एक सल्ला विचारा त्यांना,
पन्नास सल्ले देतील.
ज्या प्रश्नांवरून स्वत:च गणलेले असतात,
फुल कन्फ्युज असतात,
त्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मात्र
कॉन्फिडण्टली देतील.
छातीठोक सांगतात, कर तू बिंधास्त, डरू नकोस.
काही झालं तर आपण आहे, निस्तरायला.
निपटू सगळा राडा..
त्यांच्यावर भरवसा ठेवून आपणही मग
बिंधास्त करतो ते म्हणतात तसं.
एरवी इतरांना वाटतो तो मूर्खपणा,
पण आपल्याला आतून माहिती असतं,
या येडय़ा दोस्तांनी आपल्याला
हरब:याच्या झाडावर बसवलं नस्तं,
तर कुठलंच डेअरिंग आपण कधीच केलं नसतं.
आपल्या सा:या डेअरिंगची,
आपल्या मनमर्जी मस्तीची आणि गुर्मीचीही
खरी एनर्जी जे असतात तेच हे कमिने.
सांगितलं ना, कुणीच नसतात खरंतर ते आपले.
 
दोस्त!!
 
सा:या दुनियेला आपण कंडम वाटतो.
भुक्कड वाटतो.
आपल्याला कुणी दारात उभं करणार नाही,
याची खात्रीच असते 
आपल्या घरच्या सख्ख्या म्हणवणा:या माणसांना.
त्याकाळी हे कमिने मित्र आपल्याला सपोर्ट करतात.
नुस्ता सपोर्ट नाही, तर असा फील देतात की,
आपण त्यांच्या नजरेत सचिन तेंडुलकर आहोत.
मैदानात उतरायचा अवकाश,
सेंच्युरीच मारणार!
त्यांचा तो विश्वास आपल्याला आत्मविश्वास देतोच,
पण. नुस्ती कोरडय़ा शब्दांची वाफ नसते त्यांची साथ!
स्वत:च्या खिशात फुटकी कवडी नसताना, 
ते उधारी करतात पण आपली निकड भागवतात. 
स्वत: कसेही राहतात
पण मुलाखतीला जाताना त्यांचा लकी शर्ट आपल्याला देतात.
नसतील बरे बूट, तर स्वत:चे जोडेही काढून देतात.
त्यांना शक्य असतं, तर
कमिन्यांना जीव काढून ठेवला असता आपल्या हातात.
 
दोस्त!!
 
एरवी साले छळतात, 
दुनिया पकवत नाही इतकं पकवतात, 
बोल बोल बोलतात, उपदेशांचे डोस पाजतात,
लाज काढतात आणि 
कधीकधी तर चारचौघात लाज आणतात.
इज्जतीचा पार फालुदा करून टाकतात.
हसवून हसवून मारतात
आणि आपण मरत असताना
जगण्याची आस घेऊन धावतही येतात.
 
 
दोस्त!!
 
त्या ‘कुणीच नसलेल्या’ दोस्तांसाठी,
जगवणा:या दोस्तीसाठी,
दोस्तांच्या दिलदारीसाठी
आणि दुनियेला लाथाडून
ज्यांच्यासाठी जगावं असं वाटतं,
त्या दोस्तांसाठी.
आजचा हा विशेष अंक.
येणा:या फ्रेण्डशिप डे चं नुस्तं निमित्त.
ये तो एक दुआ है,
अपनी दोस्ती के नाम.
वो दुआ,
जो जिने की वजह बन जाती है!!
 
- ऑक्सिजन टीम

Web Title: Dua friendship names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.