फिनलंडच्या शाळेत.

By admin | Published: March 26, 2015 09:10 PM2015-03-26T21:10:19+5:302015-03-26T21:10:19+5:30

फिनलंड हा जगातला असा एक देश आहे, जिथल्या शिक्षणव्यवस्थेकडून शिकायची तयारी अमेरिका करते आहे. त्या देशात शाळेची धास्ती नाही, गुणांची आणि कॉपीची चढाओढही नाही!

In Finland's school. | फिनलंडच्या शाळेत.

फिनलंडच्या शाळेत.

Next
>प्रज्ञा शिदोरे
 
फिनलंड हा जगातला असा एक देश आहे, जिथल्या शिक्षणव्यवस्थेकडून शिकायची तयारी
अमेरिका करते आहे. त्या देशात शाळेची धास्ती नाही, गुणांची आणि कॉपीची चढाओढही नाही!
-----------
 
कॉपी करणं हा एक केवळ फसवणूक करून परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विषय नाही. तिथं तो संपतही नाही. कारकून बनविणार्‍या आपल्या शिक्षण पद्धतीचा आणि सगळीकडेच फोफावत चाललेल्या खोटेपणाचा विचार करायला हवा.
आपल्याकडे अजून शिक्षण पद्धतीचा गांभीर्यानं विचारच व्हायला तयार नाही. तिकडे जगभरात सध्या माणसं घडवणार्‍या शिक्षण पद्धतींचा विचार सुरू आहे. अनेकजण प्रयोग करत आहेत.
आणि ज्या शिक्षण पद्धतीचं जगभर विशेष कौतुक होतं आहे त्या फिनलंडमधल्या शिक्षण पद्धतीची खरंच ओळख तरी होणं गरजेचं आहे. 
आपल्याकडे जशी मुलं केवळ पास होण्यासाठी कॉपी करतात तशी कॉपी फिनलंडमधल्या विद्यार्थ्यांना करावीच लागत नाही. कारण त्यांच्या शिक्षण पद्धतीत काही विशेष सूत्र आहेत.
१) वर्गात एका ठिकाणी बसूनच विद्यार्थ्यांनी शिकायचं असा त्यांचा काही नियम नाही. मुलांचं शिक्षण खेळता खेळता होतं असं तिथं मानलं जातं. मुलाला किती शब्द तोंडपाठ येतात यापेक्षा त्याच्यामध्ये शिकण्याची क्षमता कशी आहे, ती कशी वाढवता येईल याकडे लक्ष दिलं जातं.
२) मुलांना विचार कसा करायचा हे शिकवलं जातं.
३) इथे एक मोठी परीक्षा नाही. मोठी, एकसंध परीक्षा मुक्त विचाराला मारक ठरते असं  मानलं जातं.
४) या देशात शिक्षकांवर भलताच विश्‍वास ठेवला जातो. आपल्या येथे एखाद्या डॉक्टरला जेवढा पगार मिळतो तेवढा तिकडे शिक्षकांना मिळतो. शिक्षक व्हायला प्रचंड मेहनत घेतली जाते. मुख्य म्हणजे शिक्षक होणं भलतंच प्रतिष्ठेचं समजलं जातं. 
५) शाळा किंवा जिल्हे.. एकमेकांशी टक्क्यांवरून स्पर्धा करत नाहीत. त्यामुळे तिथे ‘लातूर पॅटर्न’ वगैरे काही नाही. मुळात टक्केवारीच नाही, तिचं अनाठायी महत्त्वही नाही.
६) मुलं सात वर्षांची होईपर्यंत शाळेत जात नाहीत. त्यानंतरही प्रत्यक्ष शाळा दोन किंवा तीन तासांपेक्षा जास्त नसते.
७) सोळा वर्षे वयानंतर पुढचं शिक्षण हे व्यवसाय शिक्षण हवं आहे की वैचारिक शिक्षण हवं हे विद्यार्थ्यांना ठरवता येतं. दोन्हीला तेवढीच प्रतिष्ठा आहे! तिकडच्या मुलांना, आर्ट्स घेऊन कोणाला नोकरी मिळते का वगैरे गोष्टी घरी पालकांकडून ऐकाव्या लागत नाहीत!
८) चौथीपर्यंत कोणतीही परीक्षा नाही आणिअभ्यासक्रमापेक्षा मूल्यशिक्षण अधिक महत्त्वाचं मानलं जातं.
९) शाळेची इमारतदेखील शिक्षणाला पोषक कशी होईल असा विचार करून बांधली जाते! शाळेच्या इमारतीचा बांधतानाच तसा विचार केला जातो. शाळा म्हणजे फक्त खोल्या नव्हेत.
१0) एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे पडत असेल तर दोष शिक्षकांचा असतो असं मानलं जातं. त्या शिक्षकाला त्याची कारणे द्यावी लागतात. 
११) अशा वातावरणात सांगा कसं कोण कॉपी करेल हो? कारण इथे कॉपी करायला काही चान्सच नाहीये! 
१२) जगातल्या सर्वात महत्त्वाच्या युनिव्हर्सिटीज् ज्या देशात आहेत अशी अमेरिकासुद्धा फिनलंडकडून शिक्षणव्यवस्थेसंदर्भात काही गोष्टी शिकण्याचा विचार करते आहे.
 

Web Title: In Finland's school.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.