मुलामुलींची दोस्ती प्रॅक्टिकल आणि समंजस

By Admin | Published: July 30, 2015 08:57 PM2015-07-30T20:57:47+5:302015-07-30T20:57:47+5:30

दोस्तीनं किती स्थित्यंतर पाहिली. केवढा आटापिटा केला जग बदलण्यासाठी! जग युद्धांनी आणि द्वेषानं बदलतं म्हणतात, पण ते खरं नाही.

Friendships are practical and equitable | मुलामुलींची दोस्ती प्रॅक्टिकल आणि समंजस

मुलामुलींची दोस्ती प्रॅक्टिकल आणि समंजस

googlenewsNext
>चैत्रली बोडके
दोस्तीनं किती स्थित्यंतर पाहिली. केवढा आटापिटा केला जग बदलण्यासाठी! जग युद्धांनी आणि द्वेषानं बदलतं म्हणतात, पण ते खरं नाही. जग बदलतं दोस्तीनं, संवादानं आणि एकत्र जगण्याच्या इच्छेनं!
त्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा होता, स्त्री-पुरुष मैत्रीचा. खरंतर आपल्या समाजाला आजही मान्य नाहीच स्त्री-पुरुष दोस्ती. एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात निखळ मैत्री असू शकते का?
यावर परिसंवाद होत असत एकेकाळी कॉलेजात. असलेल्या दोस्तीकडे लोक ‘नसेलच’ किंवा ’तसलंच असेल काहीतरी’ म्हणून पाहत! तो काळ आता मागे पडू पाहतोय. कारण स्वत:ला एकमेकांचे फक्त दोस्त समजणा:या अनेकांनी भांडून, लढून आणि स्वत:च्या दोस्तीवर ठाम राहून गोष्टी एवढय़ार्पयत आणून ठेवल्या आहेत की, हा माझा मित्र आहे किंवा ही माझी मैत्रीण आहे असं म्हटलं तर लगेच काही कुणी भुवया उंचावत नाही.
अनेक घरात पालकही आता अशी मैत्री स्वीकारतात. खेडय़ापाडय़ात नाही अजून हे काच इतके सैल झाले पण निदान शहरी भागात तरी अशी दोस्ती स्वीकारली जातेय!
खरंतर मुलंमुली मित्र असतात. मुलीमुली मैत्रिणी असतात. मग या भिन्नलिंगी मैत्रीचाच एवढा आग्रह का? असं काय देते ही मैत्री? असं काय असतं जे एखाद्या मित्रला फक्त मैत्रिणीशीच शेअर करता येतं?
किंवा मैत्रिणीला मित्रचाच सल्ला जास्त प्रॅक्टिकल वाटतो?
खरं सांगू, हे झाले पुढचे प्रश्न.
त्यापेक्षाही महत्त्वाचं असतं आपण एक मुलगी आहोत किंवा मुलगा आहोत हे विसरून जाऊन फक्त मित्र आहोत ही भावना रुजवणं. ती नितळ भावना हीच या मैत्रीची खरी ताकद आहे. आणि त्या ताकदीच्या जोरावर आज आपल्या अवतीभोवती अशी मैत्री दिसते. त्या मैत्रीचेच हे काही पॅटर्न. जी समानता समाजात एरवी कायद्यानं येत नाहीये, ती या दोस्तीत तरी येते आहे, त्याचाच खरं तर जास्त आनंद आहे.
 
मुली म्हणतात, मित्र जास्त ‘प्रॅक्टिकल’ असतात.
 
शोधत गेलं की कळतं, मुलींना आता मुलगी बेस्ट फ्रेण्ड असण्यापेक्षा मुलगा बेस्ट फ्रेण्ड असणं का महत्त्वाचं वाटतं, तर त्याची ही काही कारणं सापडतात.
1) मुलगी बेस्ट फ्रेण्ड असते, तिच्याशी बोलता येतं. पण मित्र जास्त शांतपणो ऐकून घेतात. पर्याय सांगतात, प्रश्न कसा सोडवायचा हे सांगतात.
2) आपण भावुक झालो, इमोशनल निर्णय घ्यायला लागलो की थांबवतात, प्रॅक्टिकल विचार करायला शिकवतात.
3) कुठंही कधीही आपल्यासोबत यायला तयार असतात. बिंधास्त असतात. कितीही अवघड टास्क असो, कर म्हणतात. आणि ते पूर्ण व्हावं यासाठी मदतही करतात.
4) मित्रंशी बोलताना याचं दडपण नसतं की, आपण जे बोलतो ते गावभर होईल का? मुली तरी कुणालाच नाही तुलाच सांगते म्हणत एखाद्याला तरी सांगतातच मनातलं. पण मुलांचं तसं नसतं.
5) आपण मुलगी आहोत, नाजूक आहोत, आपल्याला समाजानं कायम बंधनात जगायला शिकवलंय हे विसरून मुलांबरोबर जास्त मनमोकळं जगता येतं. नाहीतर सतत लोक काय म्हणतील, याचाच विचार करावा लागतो.
7) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅशन, प्रेम, बॉयफ्रेण्ड आणि आईबाबा हे विषय सोडून बोलता येतं. नाहीतर मग सतत नेलपेण्टचा कुठला रंग चांगला यावरच बोलावं लागतं.
8) मुलांचं वाचन चांगलं असतं अनेकदा, विविध विषयांवर चर्चा करताना आपल्यापेक्षा एक वेगळा दृष्टिकोन समजतो.
9) पुरुष म्हणजे कायम बायकांना छळणार, त्रस देणार हा विचार बदलून त्यांचे काय प्रश्न आहेत हेदेखील समजतं.
10) मुख्य म्हणजे, जो चांगला मित्र असतो तो कधीच तू मुलगी आहे असं म्हणत आपल्याला कमी लेखत नाही.
 
मुलं म्हणतात, मैत्रिणी जास्त समंजस असतात..
 
जसं मुलींना विचारलं तसं मुलांनाही विचारलं की, का बरं मित्रंपेक्षा मैत्रिणी चांगल्या?
मला खूप मैत्रिणी आहेत हे स्टेटस सिम्बॉल म्हणून मिरवायला? भास मारायला?
त्यावर मुलांचं म्हणणं एकच होतं, मैत्रीण वेगळी, गर्लफ्रेण्ड वेगळी. गर्लफ्रेण्ड हा भास मारायचा विषय असू शकतो, पण मैत्रीण हा मात्र अत्यंत ख:याखु:या दोस्तीचा विषय असतो. आणि ती मैत्री फ्रेण्डशिप मागून होत नाही.
ती दोस्ती कमवावी लागते.
मुलींचा विश्वास संपादन करून त्यांच्या दोस्तीच्या निकषावर उतरणं सोपं नसतं. पण जर मैत्री झाली तर ती मैत्री पुरुषी जगण्याला एक नवा संदर्भ देते.
1) मुली अत्यंत समंजस असतात. आपल्याला काही झालं तर ऐकून घेतात. त्यावर सेन्सिबल उपाय सुचवतात.
2) मुख्यत: कुठल्याही गोष्टीची इमोशनल बाजू आपल्याला त्यांच्यामुळे दिसते.
3) दुस:या माणसाचा अॅँगल समजून घेता येतो. नाहीतर रागाच्या भरात फार गडबड करतो आम्ही.
4) मुली असतील ग्रुपमधे तर जरा तरी पाऊलं लायब्ररी आणि अभ्यासाकडे वळतात. मुलींच्या नोट्सचाही फार उपयोग होतो.
5) आपल्या आयुष्यात येणा:या महिलांची विचार करण्याची पद्धत तर कळतेच. त्यातून पुरुषी वृत्ती जरा मागे पडते.
6) मुलींकडे मदत मागितली तर पटकन मिळते. मदत आर्थिक नव्हे, तर सपोर्टची. 
7) अनेकदा एखादी चांगली मैत्रीणच व्यसनांपासून दूर करते.
8) बोलायला कुणीतरी असतं. मित्रंशी जे बोलता येत नाही ते बोलता येतं. रडताही येतं.
9) मैत्रीण आयुष्यात उत्साह आणि आनंद आणते. सेलिब्रेशन शिकवते.
10) आणि आपल्यापेक्षा एक वेगळं जग दाखवते, जे एरवी बायकी म्हणून आम्ही नाकारतो.
 
 

Web Title: Friendships are practical and equitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.