नीम लामू लेपछा
इयत्ता दहावी, सिक्कीम
तो अगदी लहान होता, तेव्हा गॅस लिक होऊन त्याचं राहतं घर जळून खाक झालं होतं. तेव्हापासून त्याच्या डोक्यात होतं की, गॅसची सुरक्षितता वाढवली पाहिजे. कारण घरात लहान मुलं असतील तर ती अनेकदा गॅसच्या बटनांशी खेळतात आणि ते डेंजरस असतंच. त्यानं म्हणूनच गॅसला लावायची एक मॅन्युअल आणि डिजिटल कोड सिस्टिम बनवली आहे की, तो कोड घातल्याशिवाय गॅस सुरूच होणार नाही.
नीम म्हणतो, ‘मी घरात आईला मदत करतो, स्वयंपाक करतो, तेव्हा जाणवतं की, हे काम सोपं नाही. यातला धोका टाळायलाच हवा.’