वो मेरा दोस्त है, उसका निशाना, क्या कहने?

By admin | Published: July 30, 2015 08:54 PM2015-07-30T20:54:06+5:302015-07-30T20:54:06+5:30

शायर काय म्हणतात दोस्तीविषयी, दोस्तांच्या जिंदादिलीविषयी आणि त्यांनीच दिलेल्या ‘दर्द’विषयी.

He is my friend, his target, what to say? | वो मेरा दोस्त है, उसका निशाना, क्या कहने?

वो मेरा दोस्त है, उसका निशाना, क्या कहने?

Next
>प्रदीप निफाडकर
 
शायर काय म्हणतात दोस्तीविषयी, दोस्तांच्या जिंदादिलीविषयी आणि त्यांनीच दिलेल्या ‘दर्द’विषयी.
दोस्तापेक्षा दोस्तीचं मरण जास्त छळतं म्हणणा-या शायरीच्या जगातली ही एक खास मैफल.
दोस्ती के नाम!
-----------------
इश्क में नाम कमाना कोई आसाँ न था
सारे अहबाब को नाराज किया है मैंने
(प्रेमात नाव कमावणो ही साधी गोष्ट नव्हती. माङया सर्व मित्रंना नाराज केले तेव्हा कुठे हे नाव मिळाले मला.)
फव्वाद अहमद यांचा हा शेर प्रेमात पडलेल्या प्रत्येकाच्या अनुभवाचा शेर आहे. मित्र म्हटले की ईष्र्या आली, स्पर्धा आली. मग क्षेत्र प्रेमाचेही असो. फव्वाद यांनी ही गोष्ट बरोबर पकडली आहे. 
मित्र या शब्दाला उर्दूत जरी यार, दोस्त शब्द असले, तरी अरबीचा ‘अहबाब’ शब्दही उर्दूने घेतला आहे. हुब्ब म्हणजे प्रेम. त्यापासून मुहोब्बत, महेबूब, हबीब हे शब्द तयार झाले. म्हणून उर्दू शेरो-शायरीत यार, दोस्त बरोबरच ‘अहबाब’ शब्दही रूढ आहे. 
अलिगढचे शायर असअद बदायूँनी मित्रचे महत्त्व व्यक्त करताना म्हणतात,
वो सारी बातें मै अहबाबही से कहता हूँ
मुङो हरीफ को जो कुछ सुनाना होता है
(शत्रूला जे सांगायचे ते आडून-पाडून सा:या मित्रंपाशीच मी बोलतो.) मित्र असे असतात त्यांना शिव्या दिल्या तरी त्या प्रेमानेच ङोलल्या जातात.  जिवाला जीव देणारा म्हणजे मित्र. मित्रची ही दुसरी नव्हे, पहिली बाजू आहे. म्हणून तर मित्र वाईट वागला तर फारच त्रस होतो. 
कतील शिफाई म्हणतात,
वो मेरा दोस्त है सारे जहाँ को है मालूम
दगा करे वो किसी से तो शर्म आये मुङो
त्याने फक्त मलाच नाही, इतर कुणालाही त्रस दिला तरी मला वाईटच वाटेल. नाही तर दगा देणारे दोस्तही कमी नसतात. म्हणून तर हबीब जलिब यांचे अनुभव धडा देतात. हफीज जालंधरीसारखा पाकिस्तानचा शायर हबीबसाहेबांच्या कायम विरुद्ध होता. हबीब यांना वर्षानुवर्षे तुरुंगात टाकण्यात त्याचाही वाटा होता. म्हणून तर हबीब म्हणाले होते,
लोग डरते है दुश्मनीसे तेरे
हम तेरे दोस्ती से डरते है
काय करणार? या मित्रंना आपण वाचवायला जावे तर तेच आपल्यावर उलटणार. म्हणून गोड गळ्याचे खुमार बाराबंकवी (‘भुला नहीं देना जी भुला नही देना’ हे गोड गाणो लिहिणारे) यांनी आपली व्यथा सांगितली होती,
उठाये ये जो राहसे दोस्तोंकी
वो पत्थर मेरे घर में आने लगे है
मित्रंना चालताना त्रस होऊ नये म्हणून मी जे दगड रस्त्यावरून हटवले होते, तेच दगड आता माङया घरावर पडत आहेत. काय दुर्दैव! 
आणि सईद राही तर अशा मित्रंपासून स्वत:ला वाचविण्यासाठी सांगतात,
मुङो मेरे दोस्तों से बचाईये ‘राही’
दुश्मनों से मै खुद निपट लुंगा
शत्रूशी दोन हात करायला आपण कायमच तयार असतो. पण ‘थप्पड से डर नही लगता, प्यारसे लगता है’ अशी जी अवस्था होती तशी गत दोस्तीतही होतेच. थोडासा रुसवा, थोडीशी मजाक यामुळे वर्षानुवर्षाचे संबंध जर बिघडत असतील तर त्या मैत्रीचा काय उपयोग? 
ते कसले संबंध? कचकडय़ाची नाती ती!!
पण अशा गोष्टींचाही जीवनात उपयोग होतो. 
खरे नाही वाटत? 
मग खातिर गजनवी सांगतील काय उपयोग होतो ते!
गो जरासी बात पर 
बरसों के याराने गये
लेकिन इतना तो हुआ 
कुछ लोग पहचाने गये
लोकांची खरी ओळख अशामुळेच होते. म्हणून नव्या ओळखी करून घेताना फार सावध राहिले पाहिजे. राहत इंदोरी तर म्हणतात,
दोस्ती जब किसी से की जाये
दुश्मनों की भी राय ली जाये
शत्रूचे मतही लक्षात घ्यायला ते सांगतात. पण हे फार कठीण आहे. चांगला मित्र मिळणो हे नर्गिसला किंवा उंबराला फूल येण्याएवढी मोठी गोष्ट आहे.
नये है दोस्त, नया है जमाना, क्या कहने?
मिला है रंजो-अलम का खजाना, 
क्या कहने?
हर एक तीर पर मेरा ही नाम लिखा है
वो मेरा दोस्त है, उसका निशाना, 
क्या कहने?
असे बागपतचे जिया बागपती उगीचच म्हणत नाहीत. नव्या जमान्यात नवे मित्र, नव्या जखमा, नवी दु:खे सारे काही नवीन. 
पण आपल्याला आजही हे कळत नाही की, जो ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवितो तो म्हणजे मित्र नाही. ती पाठविणारा फक्त ओळखीचा असतो. मित्रपदाला पोहोचण्याच्या पात्रतेचा तो असेलच असे नाही. नजिम बरलेवी हे अलीकडच्या जमान्यातले शायर हाच धोका दाखवून देतात.
क्या है मेरी दिल की हालत 
वाकई कैसे कहूँ?
क्यूँ है मेरी आँख मे इतनी नमी, 
कैसे कहूँ?
सामने आया तो ‘नाजिम’ 
उसने पहचाना नही
फेसबुक की दोस्ती को दोस्ती, कैसे कहूँ?
फेसबुकवरची मैत्री काय मैत्री आहे का? ती तर ओळख. इंग्रजीत शब्दांची कमतरता म्हणून ‘फ्रेंड’ म्हटले एवढेच. पण ती नुस्ती ओळखच. दिसेल त्याच्याशी मैत्री होत नसते. नाहीतर किती मित्र होतील. फेसबुकवर पाच हजार कशाला, पन्नास हजार मित्र होतील. पण म्हणजे ते सारे मित्र असतात का? खरे मित्र वेगळेच असतात. दिल्लीचे सुरेंद्र शजर म्हणतात.
हमारी दोस्ती सब से नहीं है
किसी से है तो मतलब से नहीं है 
कुणाशी मैत्री करताना आपला काही फायदा पाहू नये, ती मनापासून असावी हे किती छान सांगितले आहे त्यांनी. 
जिसकी कुर्बत से हमें 
कुछ फैज मिल जाये मियाँ
ऐसा कोई दोस्त, 
ऐसा हमनवा मिलता नही
ज्याच्या सहवासात काही आनंद मिळेल, ज्याची सोबत आपल्या जीवनाला अधिक सुंदर करेल असे मित्र मिळणो कठीण. जो आपल्या सहवासाला सुंदर करेल तोच मित्र. 
ही तन्वीर आझमी याची वेदना खरोखरच ते सांगते. 
ये तो दुनिया का दस्तूर है
यार बनकर दगा दीजिए
ही परंपरा आहेच. ही रीत आहेच. आणि म्हणूनच मुमताज पीरभाईंसारखी लिहिणारी रेहाना सही म्हणते,
ये सोचकर न फिर कभी 
तुझको पुकारा दोस्त
दुश्मन का दोस्त 
हो नही सकता हमारा दोस्त
पण खरा मित्र कसा तेही लगेचच रेहाना पुढे सांगते,
हमने कभी रखा ही नही है हिसाबे-इश्क
तू ही हमारा नफा है, तू ही खसारा दोस्त
(खसारा म्हणजेच घसारा) मित्र, एकदा मानले की तोच नफा, तोच तोटा. कधी कधी असेही होते ज्यांना धोका द्यायचाच असतो ते मित्रच्या वेषात येतात. आस्तीन के सांप त्यांनाच म्हणतात. उस्मान खान ‘सालिक’ यांचा अशा लोकांवर एक शेर आहे,
परदे में दोस्ती के बडे एहतियात से
दे जाते है ये लोग दगा, 
और कुछ नही.
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त फिराक गोरखपुरी यांची शायरी वेगळीच होती. त्यामुळे मित्रत्वाचे अनुभवही निराळे होते. ते म्हणतात-
लाख कर जुर्म-ओ-सितम, 
लाख कर एहसान-ओ-करम
तुझ पे ये दोस्त, 
वही वहम-ओ-गुमाँ है, 
जो था मित्र.
तू माङयावर अत्याचार कर किंवा कृपा कर. पण परंपरा मला सोडता येत नाही. तुङयाशी मैत्री करताना परंपरेने सांगितलेले सर्व शक, संशय तसेच आहेत.
 आणि नश्तर खान काहींची तर वेगळीच व्यथा आहे. ते म्हणतात,
मुसीबतों के भंवर में पुकारते नहीं मुङो
अजीब दोस्त है, लेते नही इम्तिहान मेरा
माङया मित्रंवर संकटे कोसळली तरी मला आवाज देत नाहीत. माङो मित्र चांगले आहेत म्हणू की वाईट. कारण मला त्रस द्यायचा नाही म्हणून ते चांगले म्हणावे की माङया धीर देण्याच्या, मदतीला धावण्याच्या शक्तीची त्यांना जाणीव नाही. मी काय करू शकतो, याची खात्री नाही का? अशीही जीवघेणी परीक्षा घेऊ नका म्हणावं!!
 जसे आपल्याकडे संजय चौधरी म्हणतो की, मित्र म्हणजे दुस:या आईच्या पोटातून निघालेला आपलाच एक अवयव. ते रुसतात, भांडतात पण मैत्री तोडत नाहीत. म्हणून मी म्हणतो माङया गझलेत.
भांडून यार गेला, नाही रगेल तो
लक्षात चूक येता, मागे वळेल तो
खांद्यावरून त्याच्या, जाईन एकदा
घ्या सावरून त्याला, जेव्हा रडेल तो..
 
(लेखक सुप्रसिद्ध कवी गझलकार आहेत.)
 

Web Title: He is my friend, his target, what to say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.