दिल चाहता है!
By admin | Published: October 2, 2014 06:53 PM2014-10-02T18:53:08+5:302014-10-02T18:53:08+5:30
वेळ कमी पडतो इतके कल्पनांचे पंख फुटतात मनाला. अशावेळी त्या आयडिया शेअर करण्यासाठी कुणीतरी ‘आपलं’ असावं असं वाटतं ना तुम्हाला?
Next
>हजारो ख्वाईशे ऐसी के,
हर ख्वाईश पे दिल निकले.
वेळ कमी पडतो इतके कल्पनांचे पंख फुटतात मनाला. अशावेळी त्या आयडिया शेअर करण्यासाठी कुणीतरी ‘आपलं’ असावं असं वाटतं ना तुम्हाला? ‘कायतरीच फालतू सुचतं तुला, गप बस.’ असं न म्हणता, त्या आयडियातलं नवंकोरंपण समजून घेत, ते सुचण्याच्या ‘एन्थू’ला एनकरेज करत जे सुचलंय ते प्रत्यक्षात आणण्यासाठी साथ देईल असं कुणीतरी असावंच आयुष्यात? अशा मित्रांच्या कट्टय़ात जाता यावं आपल्याला असं वाटतं ना तुम्हाला? छोटंसं करावं काहीतरी, पण असं काही जे वेगळं असेल, हटकेच असेल आणि ते करताना आपल्याला सच्चाईनं काहीतरी केल्याचं समाधान लाभेल.
मात्र त्या नुस्त्या वाटण्याला कुणी किंमत देत नाही, आपल्या विचारांना व्यक्त करण्याची संधीच नाही. आपल्याला मार्गदर्शन करायलाच कुणी नाही असं वाटून फ्रस्ट्रेट होता तुम्ही?
होत असाल तर हे फ्रस्ट्रेशन सोडा. आम्हाला भेटा. लगेच. तातडीने. आम्ही कोण?
बडे बडे चेहरे, पेपरात झळकणारे, त्या गर्दीत आपलंही नाव असावं,बडे बडे नामों मे
अपनाभी नामोनिशान तो हो, असं वाटण्यात चूक काय.
आपण महत्त्वाकांक्षी असावं, ढोरपण स्मार्ट मेहनत करावी, जीव काढून कष्ट करावेत आणि उत्तम परफॉर्म करून मस्त अभिमानानं मिरवावं असं वाटतं ना तुम्हाला.
दुनिया गेली उडत, आपल्याला हवं तेच करीन असा ठस्का आहे ना तुमच्याकडे.
खड्डय़ात पडलो तरी जबाबदारी माझीच असं म्हणत तुम्ही जे करायचं तेच करता ना. आणि ते करतानाही माहिती असतं तुम्हाला की, आपल्यात कमी काय आहे, त्या कमतरता दूर करून आपण स्वत:त बदल करायला हवेत असं मान्य करण्याचा मोकळेपणाही आहेच ना तुमच्यात.
आणि फुल एन्जॉय करत, मस्त पार्टी करण्याची हौसही आहे तुम्हाला.
हे भरभरुन जगण्याचं तुमचं कसब, त्याला पैलू पाडून घ्यावेत आणि अजून चमकावं असं वाटत असेल तर
आम्हाला भेटा.
लगेच.
तातडीने.
आम्ही कोण?