हॉस्टेलवाली यारी

By admin | Published: July 30, 2015 08:49 PM2015-07-30T20:49:08+5:302015-07-30T20:49:08+5:30

हॉस्टेलवाल्या दोस्त मंडळींच्या जिवावरच तर अंगावर येणा:या कुणालाही शिंगावर घेण्याची आणि कुठलीही ‘आफत’ ओढवून घेण्याची हिंमत येते.

Hostelwari yari | हॉस्टेलवाली यारी

हॉस्टेलवाली यारी

Next
>अजित दत्तुसिंह बायस 
 
हॉस्टेलवाल्या दोस्त मंडळींच्या जिवावरच तर अंगावर येणा:या कुणालाही शिंगावर घेण्याची आणि कुठलीही ‘आफत’ ओढवून घेण्याची हिंमत येते. कारण मॅटर कुठलाही असो, त्यातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी  हे ‘जिगरी यार’ असतातच.
------------
तसा मी मूळचा जालना जिल्ह्यातील एका छोटय़ाशा खेडेगावातला. शिक्षणासाठी घर सुटलं आणि आयुष्यात हॉस्टेल आलं. मला अजूनही आठवतंय की, आठव्या इयत्तेत असताना हॉस्टेलची पहिली पायरी चढलो. त्यावेळी ‘हॉस्टेल लाइफ’ आणि हॉस्टेलमधील मित्रमंडळी आता आपल्या पुढच्या वाटेवर आयुष्याचा अविभाज्य भाग बनणार आहेत, याची पुसटशी कल्पनादेखील नव्हती. हॉस्टेलवर आलो त्यावेळी प्रचंड हुरहुर होती आणि अस्वस्थताही. प्रथमच घरच्यांना सोडून लातूरसारख्या नवख्या शहरात आलो होतो. (त्यापूर्वी घरच्यांना सोडून कधी मामाकडे राहिल्याचेसुद्धा आठवत नाही.) मला सोडायला आलेले माङो काका निघून गेल्यानंतर जवळपास दोन तास मी स्वत:ला एका रूममध्ये बंदिस्त करून रडत बसलो होतो. कुठल्या विपरीत काळी हॉस्टेलवर येण्याची ‘अवदसा’ सुचली, या विचारानं मी स्वत:च्या नावानेच खडे फोडत बसायचो. पण हॉस्टेलवर येणं हा माझा स्वतंत्र निर्णय असल्याने माघारी परतण्याची दोरही कापलेले होते. आता कशाही परिस्थितीत इथे निभावून नेणं, एवढा एकच पर्याय माङयाकडे शिल्लक होता. 
हॉस्टेलवर महाराष्ट्रातल्या कान्याकोप:यातून आलेली अनेक मुले होती. काहीजण तर अगदी विदर्भातल्या नागपूर, अमरावतीहूनसुद्धा आलेली. बहुतांशी माङयासारखीच अस्वस्था. भेदरलेली, घरच्यांच्या आठवणीत तासन्तास एकटीच बसलेली. आम्हा सर्वच समदु:खी मंडळींना एकत्रित गुुंफायला हा धागा पुरेसा होता. (शिवाय पुढे एकत्रितपणो अनेक कारनाम्यांना ‘अंजाम’ही द्यायचा होता, सबब एकत्र येणं ही आम्हा सर्वाचीच गरज होती.) शिवाय नवीन शहर, नवीन शाळा, नवीन वातावरण असं सगळंच नवं नवं. तिथे जुळवून घेण्यासाठी ही ‘दोस्त मंडळी’ हवीच होती. हॉस्टेलच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सिनीयर मंडळींनी जो धीर, आधार दिला त्यामुळेच तर ख:या अर्थाने नवख्या मातीत पाय रु जायला मदत झाली. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अगदी काही काही समजायचं नाही. प्रत्येक छोय़ा छोटय़ा गोष्टीत गोंधळायला व्हायचं. हे गोंधळलेपण मग प्रकर्षाने घरची जाणीव करून द्यायचं. अशा वेळी ज्यांनी ज्यांनी सावरायला मदत केली त्या सर्वाबरोबरचा ‘याराना’ आजतागायत कायम आहे. 
मी ज्या हॉस्टेलमध्ये राहत होतो ते होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं. श्री गुरुजी संस्कार केंद्र. सुरुवातीचे काही दिवस छान गेले. हॉस्टेलच्या दैनंदिनीचा एक भाग म्हणून संघाची शाखा आयुष्यात आली. मग मात्र खटके उडू लागले. खर तर ‘विचारसरणी-बिचारसरणी’ या असल्या गोष्टी कळण्याचं काही ते वय नव्हतं. पण बंडखोरी होतीच, प्रश्न विचारणं सुरू झालं. पण हे बंड करताना आपले दोस्त आपल्या सोबत आहेत, त्यांचं पाठबळ आहे हे डोक्यात होतंच. माङया अगदी मूर्खपणाच्या कृतीमध्येसुद्धा केवळ ‘यारी-दोस्ती’खातर भक्कपणो उभे राहणारे ‘मित्र’ या हॉस्टेलनेच दिले. नाहीतर ही बंड थंड बस्त्यात जायला फारसा वेळ नसताच लागला. 
हॉस्टेलमधील मित्रमंडळी आणि इतर दोस्त लोग यांच्यातला मुख्य फरक जो मला जाणवतो तो हा की हॉस्टेल हे तुमंच तात्पुरत्या स्वरूपाचं हा होईना पण घर बनून जातं. आणि ही हॉस्टेलवरची मित्रमंडळी म्हणजे तुमच्याही नकळत तुमच्या कुटुंबाची सदस्य होऊन जातात. हॉस्टेलवरील मित्रमंडळीसह तुम्ही तुमचं जगणंच शेअर करत असतात. तुमचं चालणं, बोलणं, हसणं, खेळणं या सगळ्यांवरच त्यांचा एक संस्कार तुमच्याही नकळत होतच असतो. तुमच्या एकूण ‘असण्यावरच’ या मंडळींचा एक अमीट असा ठसा उमटत असतो. या दोस्त मंडळींच्या जिवावरच तर मग अंगावर येणा:या कुणालाही शिंगावर घेताना आपण कुठली तरी ‘आफत’ ओढवून घेतोय, हा विचारही मनाला शिवत नाही. (ही आफत ओढून घेण्यासाठी मग तुमची स्वत:ची छाती 56 इंचांची नसली तरी चालते) कारण मग मॅटर कुठलाही असो, त्यातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी हे ‘जिगरी यार’ असतातच सोबत!
आज मागे वळून बघताना काही गोष्टी लख्खपणो डोळ्यासमोरून तरळून जातात. मग त्यात ‘गजराज-मेघराज’ची भेळपुरी असेल, नानाविध विषयांवर चर्चा करताना रिचवलेले कटिंग चहाचे प्याले असतील, लेक्चर्स बंक करून अटेंड केलेल्या राजकीय सभा असतील किंवा टी-2क् विश्वचषकातील भारताची मॅच बघता यावी म्हणून गुपचूपपणो हॉस्टेलहून केलेलं पलायन आणि बसस्टँडवर जागून काढलेली अख्खी रात्र असेल, हे आणि असं बरंच काही..  
हॉस्टेलवाल्या या यारीनं नेमकं काय दिलं? 
हा प्रश्न स्वत:लाच विचारला असता उत्तर मिळतं की, घराच्या चार भिंतींच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडून उडण्यासाठी पंखांना बळ दिलं. पाठय़पुस्तकीय शिक्षणापलीकडे जाऊन समाजात वावरण्यासाठी जे शहाणपण लागतं ते इथंच मिळालं. ‘करना है तो करना है’ म्हणून कुठल्याही गोष्टींसाठी जिवापाड धडपडायलाही इथंच शिकलो. मित्रंसाठी, निखळ मैत्रीसाठी प्रसंगी काहीही करण्याचं बळदेखील या यारीनंच दिलं. या ‘हॉस्टेलवाल्या यारी’नं माझं जगणंच समृद्ध केलं. 
 
 
 
हॉस्टेलवाल्या यारीचे 3 उसूल
 
एकदा आपण हॉस्टेलवर राहायला गेलो, तिथे मित्र जमले, रूमपार्टनर तर काय आपली सावलीच. चांगला अड्डा जमतो. मजा येतेच.पण तरीही ही यारी निभावण्याचे काही उसूल आहेत.
ते मोडले की मग मात्र या दोस्तीचं भूत आपल्याच मानगुटावर बसतं. त्यापेक्षा आपली ‘हद’ ज्याला त्याला माहिती असलेली बरी!
 
1) सबकुछ अपना है, पर क्या नहीं है?
 
हॉस्टेलमधे अशी काही एकमेकांच्या वस्तू वापरताना परवानगी घेत नसतात. अगदी दुस:याचे शर्ट, बनियनसुद्धा लोकं न विचारता घालतात.
डब्यातलं खाऊन टाकतात आणि श्ॉम्पू, टुथपेस्ट संपवून टाकतात. जोवर दोस्तीत हे सारं चालतं तोवर ठीक. पण किती आणि काय काय वापरणार याची एक ‘हद’ असते.
होता होईतो कुणाच्या अगदी कितीही जवळचा मित्र असला तरी त्याच्या पर्सनल गोष्टींना हात लावू नये. कितीही इच्छा झाली तरी!
 
2) गॉसिपला सुट्टी
गॉसिप होतंच, टिंगल होते, मजा होते. पण काही पर्सनल गोष्टीविषयीचं गॉसिप इतकं भयानक असतं की ते करूच नये. त्यानं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यामुळे अशी काही बातमी आपल्यार्पयत आलीच तर त्यावर उपाय एकच, ती आपल्यापाशीच थांबवणं. पोटात दडपून टाकणं.
 
3) लावालाव्या?
हा मैत्रीतला सगळ्यात मोठा आजार. त्यामुळे आपल्या दोस्तावर पूर्ण विश्वास ठेवावा, लावालाव्या करणा:यांवर नव्हे. याने अमूक सांगितलं म्हणून खरं खोटं करत बसू नये आणि आपल्या आणि आपल्या मित्रत जर कुणी मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर मित्रशी बोलावं हे उत्तम.
 
 
(अजित पुणे विज्ञापीठात पत्रकारितेचा अभ्यास करतो आहे. )

Web Title: Hostelwari yari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.