- दीप्ती मंजरी डाकुआ
इयत्ता दहावी, नयागढ, ओडिशा
दीप्तीचे वडील अपंग. ते एक छोटं हॉटेल त्यांच्या खेडेगावात चालवतात. हॉटेलसाठी एकदम धान्य घेतलं तर त्यांना कीड लागते. मग तिच्या आईला ते सारं निवडत बसावं लागतं. या प्रश्नावर तोडगा शोधण्यासाठी दीप्तीनं किडय़ांच्या वाढीचा अभ्यास केला. धान्य भरल्यावर कोठीचं तपमान वाढलं की कीड कशी वाढते हे तिच्या लक्षात आलं. त्यातून तिला या कोठीची कल्पना सुचली, जी आतल्या तपमानाचं इंडिकेशन देईन. म्हणजे मग कळेल की कीड वाढतेय की नाही. त्यातून कीड न होऊ देण्याचे उपाय त्वरित करता येतील आणि किडीला रोखता येईल.
दीप्ती म्हणते, ‘आम्ही गरिबीत जगत असलो तरी विचार करणं, अभ्यास करणं आणि त्यातून काही घडवणं यापासून तर मला कुणी रोखू शकत नाही.’