संकटालाही एकदा कळू देत, तू किती ‘अवघड’ आहेस !

By admin | Published: July 30, 2015 08:39 PM2015-07-30T20:39:51+5:302015-07-30T20:39:51+5:30

संकटं कधीच आपल्याला अडवत नाहीत, ते तर कायम मदतीचा हात देत असतात.आपल्याला आपल्या सामथ्र्याची जाणीव करुन देताना ते म्हणत असतात, ‘बघ, पाहिलंस?’

Let the crisis also know, how difficult you are! | संकटालाही एकदा कळू देत, तू किती ‘अवघड’ आहेस !

संकटालाही एकदा कळू देत, तू किती ‘अवघड’ आहेस !

Next
संकटं कधीच आपल्याला अडवत नाहीत, ते तर कायम मदतीचा हात देत असतात.आपल्याला आपल्या सामथ्र्याची जाणीव करुन देताना ते म्हणत असतात, ‘बघ, पाहिलंस?’.
----------
‘जो स्वप्न पाहतो, तो तरुण’ अशी तरुणाईची व्याख्या करता येईल. तरुणाईचं ते एक अभिन्न असं अंग आहे. स्वप्नच तुम्हाला उडायला आणि ‘जगायला’ आणि ‘कशासाठी जगायचं?’ हे शिकवतात.
अंथरुणावर पडल्यानंतर डोळे मिटल्यावर जे आपण पाहतो ते स्वप्न नाही, स्वप्न तर उघडय़ा डोळ्यांनीच पाहता येतात, पाहायची असतात. अशी स्वप्न जी आपल्याला झोपूच देत नाहीत.
 
स्वप्न, स्वप्न आणि स्वप्न.
स्वप्नांचा हा ध्यासच मग आपला श्वास बनतो आणि तो आपल्याला कृतिशील बनवतो. 
या स्वप्नांच्या वाटेवर चालत असताना कधी काटे लागतील, कधी कोणी तुमचचे पाय ओढेल, कदाचित अनंत संकटंही येतील, पण संकटं आलीत म्हणून थांबायचं नसतं, त्यांच्या भीतीनं आपल्या प्रवासाला विराम द्यायचा नसतो. ही संकटं म्हणजे तर देवानं तुमच्या वाटेवर ठेवलेली संधी. ती लाथाडायची नाही आणि तिच्यापासून दूर पळायचंही नाही.
जेव्हा तुम्हाला वाटेल, आपल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे, आशा मातीमोल झाली आहे आणि ध्येय पायदळी तुडवलं गेलंय. अशावेळी आपल्या पायाखालच्या त्या ढिगा:याकडे आणि विझलेल्या निखा-यांकडे फक्त पाहा. नुसती संधीच नाही, कदाचित त्या उद्ध्वस्त स्वप्नांच्या राखाडीतच एखादी ‘सुवर्णसंधी’च तुम्हाला मिळून जाईल.
 
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा कुणी ‘असामान्य’ बनण्याच्या ध्येयानं पछाडलेले असता, त्यावेळी ब:याचदा तुमच्या आजूबाजूचं जग मात्र तुम्हाला ‘सामान्य’ ठेवण्यासाठीच जिवाचा आटापिटा करत असतं.
अशावेळी कामाला येतो तो ‘मित्र’. त्याची ‘पहचान’ मात्र आपल्याला झालीच पाहिजे.
 
अडचणींना संकट समजू नका. त्यांना लाथाडू नका. ही संकटंच तर आपल्याला जगण्याचं आणि पुढे जाण्याचं बळ देत असतात. संकटं म्हणजे आपले दोस्तच. आयुष्याच्या प्रवासात ते तर हवेतच. त्यांच्याशिवाय आपण यशोशिखराकडे जाऊ शकत नाही, विजयाचा आणि यशस्वीतेचा आनंदही आपल्याला त्यांच्याशिवाय मिळू शकत नाही. काहीही झालं तरी हार न मानण्याची आणि पुढे जात राहण्याची उर्मी त्यांच्याशिवाय दुसरं कोण आपल्याला देणार?.
 
तुम्हाला माहीत आहे, जोराचा पाऊस सुरू झाला, की सगळे पक्षी ‘आसरा’ शोधायला लागतात, पण गरुड मात्र आसरा शोधण्यापेक्षा पाऊस पाडणा:या त्या ढगांच्याही वर ङोप घेतो. साध्या पक्ष्यांत आणि गरुडात हाच तर फरक आहे. मनात जिद्द असली तर आपल्या गरुडभरारीला कोणीही रोखू शकत नाही. कोणीच नाही. संकटं म्हणजे तर फक्त पालापाचोळा. तो दूर करायला कितीसा वेळ लागतो?.
 
कोणतीही गोष्ट करायची तर त्यासाठी कष्ट नाही, हिंमत लागते. थोडीशी हिंमत दाखवा आणि मग बघा, काय होतं ते!.
सरधोपट मार्ग निवडण्यापेक्षा ज्या मर्गावर अजून फारसं कुणी चाललेलं नाही, अशा ‘अज्ञात’ मार्गाचा शोध घ्या, नवीन ‘शोधण्याची’ आणि ‘नवनिर्मिती’ची धडाडी दाखवा. ‘अशक्य’ या शब्दाला घाबरण्यापेक्षा त्याच्याच पाठी हात धुवून लागा, सगळे अडथळे आणि संकटं स्वत:च आपल्याला पुढे जाण्यासाठी वाट करून देतील.
 
एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, संकटं कधीच आपला मार्ग अडवण्यासाठी येत नाहीत, तुम्हाला रोखणं हे त्यांचं उद्दिष्ट नसतंच, ते तर तुम्हाला मदतीचा हात देत असतात आणि आपल्यातच दडलेल्या आपल्या सामथ्र्याची आपल्याला जाणीव करुन देताना म्हणत असतात, ‘बघ, पाहिलंस, किती सहज हे तू करू शकतोस. किती शक्ती आहे तुङयात. 
आणि त्या संकटालाही एकदा कळू देत ना, तू किती ‘अवघड’ आहेस ते!
 
म्हणून सुरुवातीलाच सांगितलं, सगळ्यांशी आपली ‘दोस्ती’ झाली पाहिजे. संकटांशीच एकदा का दोस्ती झाली, की ते स्वत:हूनच आपली ‘यारी’ निभावतात. मग विजय फक्त आपला!.
 
पहिला विजय, पहिलं यश खूप महत्त्वाचं. या टप्प्यावर थोडं उभं राहा, किती मोठा पल्ला आपण पार केला, तो किती ‘कठीण’ होता, याची कौतुकभरली थाप भले स्वत:च्याच पाठीवर द्या, पण इथे थांबू नका. कारण याच पल्लय़ावर थांबलात, ‘खुश’ झालात, तर मागून आपल्याला ऐकू येऊ शकतं, ‘ह्यॅ, लक, दुसरं काय!’.
 
पहिल्यांदा यश आलं, विजय मिळाला, म्हणजे प्रत्येक वेळी आणि पहिल्याच प्रय}ात येईल असं नाही, पण समजा आलंच अपयश, झालातच ‘फेल’, तर अशा वेळी खचू नका, धीर सोडू नका. थांबू तर मुळीच नका.
‘फेल’, ‘एण्ड’ आणि ‘नो’ची व्याख्या तुम्हाला माहीत आहे?.
F A I L म्हणजे 'First Attempt In Learning'
E N D म्हणजे  'Effert Never Dies'  आणि
N O म्हणजे 'Next Opportunity' !
 
आणखी एक, जिंकणं आणि हरवणं. वरकरणी दोन्ही शब्द सारखे वाटत असले तरी त्यात मुळातच खूप फरक आहे. 
एखाद्याला तुम्ही सहज हरवू शकाल, पण त्याला ‘जिंकणं’ फार फार कठीण असतं. 
एखाद्याला हरवण्यापेक्षा, त्याला ‘जिंकायचा’ प्रय} करा, हरूनदेखील तो कायमचा ‘आपला’ होऊन जाईल.
‘मित्र’ कायम ‘आपले’ असतात, कारण दोघांनीही एकमेकांना मनानं ‘जिंकलेलं’ असतं. 
एकदा नव्हे, अनेकदा.आपल्याही नकळत.
 
(डॉ. अब्दुल कलाम यांच्या व्याख्यानांतील संदर्भाचा संपादित गोषवारा)
 

 

Web Title: Let the crisis also know, how difficult you are!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.