शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

नाइट लाइफ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 12:07 PM

प्रत्येक शहराचं स्वतंत्र नाइट लाइफ. कैरोचं एक नाइट लाइफ आहे. लंडनचं आणखी एक स्वतंत्र नाइट लाइफ आहे. पॅरिसचं तर विचारायलाच नको. रोमही नाइट लाइफसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईचं नाइट लाइफ कसं असेल? बार्सेलोनासारखं, लास वेगाससारखं, बँकॉकसारखं की प्रिन्स्टनसारखं.

निळू दामले

महाराष्ट्र सरकारने (महाराष्ट्र दुकाने व आस्थापना कायदा २०१७) आता २४ तास दुकानं उघडे ठेवण्याची मुभा दिली आहे. गेल्या आठवड्यात ही घोषणा झाली. मुंबई तशीही झोपत नाही, आता तर कायद्यानं २४ तास जागी राहू शकते; पण रात्री जागणारं हे शहर नक्की कुठल्या स्वभावाचं असेल?जगभरातली अनेक शहरं आपल्या नाइट लाइफसाठी प्रसिद्ध आहेत. ती कशी दिसतात? मुंबई कशी दिसेल?

आता म्हणे मुंबईत नाइट लाइफ सुरू होतंय.मुंबईत मॉल, खाणावळी, पिणावळी, खाऊगल्ल्या, दुकानं इत्यादींना रात्रभर उघडं रहायला सरकार परवानगी देणार आहे. अर्थात अटी घालून. सीसीटीव्ही कॅमेरे असतील. नोकरांना नीट भरपाई दिली जाईल, त्यांची जाण्या-येण्याची सोय केली जाईल.पोलिसांची आणि बहुदा पालिकेची परवानगी आवश्यक असेल.‘नाइट लाइफ’ या शब्दाला जगभरात वेगवेगळे अर्थ आहेत.बार्सेलोनात नाइट सुरू होतेच ती रात्रीचे बारा उलटून गेल्यानंतर. स्थानिक आणि पर्यटक मध्यरात्र उलटल्यानंतर जागे होतात आणि बार, नाचगाण्याच्या जागांकडं सरकतात. जॅझ, हिपहॉप, डिस्को, आफ्रिकन, स्पॅनिश, कॅरिबियन इत्यादी इत्यादी.फ्लॅमेंको नाच हा एक बार्सेलोनातला खास कार्यक्र म.मंचावर एक जोडी नाचते. मागं एक गायक गातो. दोन वादक. मंचाची उंची जमिनीपासून फार तर एक फूट. मंचाच्या तिन्ही बाजूंनी प्रेक्षक बसलेले असतात. वेटर टेबलावरच्या बशा आणि हातातले ग्लास रिते होऊ देत नाहीत. ताल आणि सूर तीव्र होत जातात, वरवरची पातळी गाठत जातात आणि दणकन एका क्षणी नाच संपतो. स्पॅनिश लोकगीतं, प्रेमगीतं, विरहगीतं या परफॉरमन्समध्ये गायली जातात.फ्लॅमेंको नाच उत्तम दर्जाच्या आॅपेरा हाउसमध्ये होतात आणि साधारण वस्तीतल्या एकाद्या छोट्याशा जागेतही होतात. नृत्य करणाºयांचा दर्जा आणि नाचघराचा दर्जा यानुसार तिकिटाची किंमत ठरते.बार्सेलोनातला ‘राम्बला’ हा लांब रु ंद रस्ता म्हणजे जगातलं एक सर्वात लोकप्रिय नाइट लाइफ मानलं जातं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानं, बार, नाचाच्या जागा, संगीत मैफली, प्रदर्शनं, म्युझिअम इत्यादी पसरलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोट्या गल्ल्या सापासारख्या आळोखे घेत दूरवर पसरलेल्या असतात. या गल्ल्यांत खाणावळी आणि बार. गल्लीत जेवढं खोलवर जावं तेवढ्या करमणुकीच्या जागा छोट्या होत जातात, एक्स्क्लूसिव्ह होत जातात. एक बार आहे. तो मध्यरात्री एक वाजता उघडतो आणि लगोलग भरतो. दीड वाजता दरवाजे बंद होतात. स्थानिक लोकांना असे बार माहीत असतात. त्यांची मदत घेतली तरच पर्यटकाला त्यांचा पत्ता लागतो.माणसं बारा वाजल्यानंतर सुरू होतात आणि सकाळ होताना संपतात. मग दिवसभर झोपा काढतात.बार्सेलोनातलं रंगेलपण संगीत, नाच असं संस्कृतीच्या बाजूनं फुलतं.अमेरिकेत लास वेगासमधली रात्र म्हणजे जुगार आणि खाणं. फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या जागा एकेका हॉटेलच्या तळाशी असतात. तिथं शेकडो जुगार यंत्रं असतात. तरुण, मध्यमवयीन आणि म्हातारी अशी सगळी माणसं यंत्राच्या फटीत पैसे टाकून पडद्यावरची धमाल अनुभवत असतात. चारी बाजूंनी दिव्यांचा लखलखाट आणि नाना प्रकारचे खेळ. बसल्या जागी वेटर येतो आणि पदार्थ, बियर इत्यादी गोष्टी पुरवतो. वयस्क माणसं दुपार झाली की दहा सेंट, पन्नास सेंटच्या नाण्यांचा जुगार खेळणाºया यंत्रासमोर बसतात. रात्रभर. बहुदा त्यांना निद्रानाशाचा विकार असावा. पहाट होताना ही माणसं त्यांच्या घराकडं परततात.ही झाली हॉटेलांच्या आतली रात्र. बाहेर स्ट्रिप या नावानं ओळखल्या जाणाºया मैल-दोन मैल लांबीच्या रु ंद रस्त्यावर दोन्ही बाजूंना खाणावळी, पिणावळी, करमणुकीची साधनं, विदुषक, कारंजी इत्यादी पसरलीत. स्ट्रीपवरच्या गर्दीत जगातल्या सर्व रंगांची माणसं दिसतात. सर्व बोली कानावर पडतात. दोन्ही बाजूला आकाशस्पर्शी इमारती प्रकाशमान असतात. नाना रंगांचे प्रकाश, नाना आकारांचे प्रकाश. रात्र आणि दिवस यात फरक वाटू नये इतकी प्रकाशमान स्ट्रिप.लास वेगासला सिन सिटी म्हणतात, पापी शहर.पूर्वेला बँकॉक. शहरातले काही विभाग रात्रभर धमाल उडवत असतात, बाकीचं शहर झोपलेलं असतं.ट्रेन मार्केट. तिथं नाना प्रकारची दुकानं. त्यात जगभरातल्या गाजणाºया ब्रँडचे कपडे, अत्तरं, घड्याळं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, ड्रेसेस, अलंकार, सौंदर्यप्रसाधनं मिळतात. खरं म्हणजे या वस्तू जगात कुठंही मिळतात. अमेरिकेतले आणि युरपातले लोक त्या वस्तू इथे का खरेदी करतात ते कळत नाही. पैसे खर्च करण्याची नशा असावी.काही दुकानांमधे टोप्या, शर्ट, पॅण्ट्स, ड्रेसेस असतात. भडक रंगांचे. गबाळे. इंग्रजीत अशा कपड्यांना कित्स असं म्हणतात. माणूस टोपी डोक्यावर घालतो, आरशात स्वत:ची छबी न्याहाळतो, सोबतच्या माणसाला विचारतो, कसं दिसतंय. दोघंही खळाळून हसतात. वा, छान असं म्हणतात. विकत घेतात. महाबळेश्वरला गेल्यावर माणसं काठ्या, चपला, टोप्या घरेदी करतात तसंच. घरी परतल्यावर त्या वस्तू पुन्हा वापरल्या जात नाहीत. महाबळेश्वरला किंवा बँकॉकला किंवा तत्सम ठिकाणी गेलो होतो याचा पुरावा आणि आठवणी एवढंच त्या वस्तूंचं महत्त्व.बँकॉकमध्ये अ‍ॅण्टिक वस्तूंचा मोठ्ठा बाजार आहे. कारपासून ते मिंटच्या डब्या अशा नाना प्रकारच्या वस्तू इथे मिळतात. विसाव्या, एकोणिसाव्या, अठराव्या शतकातल्या वगैरे.पर्यटक रात्रभर या विभागात फिरतात. अ‍ॅण्टिक खरी आहे की फेक आहे त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करतात. दुकानदार गळ्याची शपथ घेऊन वस्तू एकदम आॅथेण्टिक आहे असं सांगत असतो. मग किमतीची घासाघीस. हे सारं हसत हसत चालतं. शांघायमध्ये विक्रे ते तुमच्या गळ्यात पडतात, तुम्ही एकादी वस्तू महाग वाटली म्हणून न घेता पुढे निघालात तर डोळ्यातून अश्रू वाहिल्याचा हावभाव करून विक्रे ता तुमचे हात धरून ठेवतात. तसला प्रकार बँकॉकमध्ये नाही.बँकॉक सेक्ससाठी प्रसिद्ध. नाना प्रकारच्या स्त्रिया, नाना प्रकारची सेक्स उपकरणं, नाना प्रकारची बटबटीत आणि सॉफ्ट सेक्स दुकानं. बार्सेलोनासारखंच, गल्लीत खोलवर गेलात तर टोकाला जाताना इमारतींच्या पहिल्या-दुसºया मजल्यावर सेक्सचे अड्डे आणि त्यातल्या स्त्रिया इमारतीच्या दारात उभ्या राहून आमंत्रण देताना दिसतात.एक नाइट लाइफ अमेरिकेतल्या विश्व शाळेच्या परिसरातही असतं. प्रिन्स्टन, हारवर्ड, कोलंबस, विस्कॉन्सिन. विस्तृत हिरवळी आणि बागा. तलाव. मधे मधे इमारती. इमारतीत ग्रंथालयं, वाचनालयं, प्रयोगशाळा. रात्रभर या सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. मुलं-मुली रात्री दहानंतर लॅबमध्ये जातात. तिथं दोनेक तास वाचतात. मग बाहेर पडून नाक्यावरच्या कॅफेमध्ये जाऊन कॉफीचे घुटके घेत गप्पा करतात. काही मुलं-मुली मैल -चार मैल पळतात. पळून झाल्यावर कॅफेमध्ये बसून कॉफी घेतात, मग लॅबमध्ये परततात.रात्रीचे दोन वाजलेले असतात आणि मुलं-मुली सायकल चालवत असतात, जॉगिंग करत असतात. किंवा तळ्याच्या काठी, हिरवळीवर झाडांच्या बुंध्याशी लॅपटॉप उघडून वाचत असतात. एका मांडीवर लॅपटॉप आणि दुसºया मांडीवर लाँगबुक. त्यात टिपणं काढणं. कानात इअरफोन कोंबलेले.प्रत्येक शहराचं स्वतंत्र नाइट लाइफ.कैरोचं एक नाइट लाइफ आहे.लंडनचं आणखी एक स्वतंत्र नाइट लाइफ आहे.पॅरिसचं तर विचारायलाच नको.रोमही नाइट लाइफसाठी प्रसिद्ध आहे.मुंबईचं नाइट लाइफ कसं असेल?बार्सेलोनासारखं, लास वेगाससारखं,बँकॉकसारखं की प्रिन्स्टनसारखं.

( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)