एक सेण्टी तो दुजे सॉलीड!

By admin | Published: July 30, 2015 08:45 PM2015-07-30T20:45:30+5:302015-07-30T20:45:30+5:30

दोस्ती को किसी रिश्ते का इल्जाम मंजूर नहीं, दोस्ती खुदा का तोहफा है. हे कितीही खरं असलं तरीही आपण म्हणजे दोस्ती करणारे ‘नमुनेच’ असतो ना..

One centi and two reddies! | एक सेण्टी तो दुजे सॉलीड!

एक सेण्टी तो दुजे सॉलीड!

Next
>अनुपम खोटे
 
दोस्ती को किसी रिश्ते का इल्जाम मंजूर नहीं, दोस्ती खुदा का तोहफा है. हे कितीही खरं असलं तरीही आपण म्हणजे दोस्ती करणारे ‘नमुनेच’ असतो ना.. त्यामुळेच तर आपल्या दोस्तीचेही वेगवेगळे रंग पाहायला मिळतात.आणि त्या दोस्तीतल्या दोन शुद्ध जाती आहेत.
मान्य आहे, दोस्तीत जातिभेद नसतात, कसलेच भेद नसतात. जिथं भेदाभेद आला तिथं संपलीच दोस्ती. पण तरीही एक भेद असतोच ना? नाही समजलं?
मुलामुलांची दोस्ती आणि मुलीमुलींची दोस्ती. हा असा भेद आहे, जो जगाच्या अंतार्पयत राहणार आहे.
म्हणजे काय तर दोस्ती दोस्तीच असते, पण तिचा इजहार आणि दोस्ती निभाने की रीत अलग असते!
तो जोक आलाच असेल ना फॉरवर्ड होत तुम्हालाही..
एक मुलगा सकाळीच घरी येतो. बाबा विचारतात, कुठं होतास? तो सांगतो, मित्रच्या घरी अभ्यास करत होतो. बाबा त्याच्या सगळ्या मित्रंना फोन करतात.म्हणतात, काहीजण सांगतात, हो माङयाच कडे होता, रात्रभर अभ्यास करून आत्ता घरी जायला निघाला. काही म्हणतात, नुकताच झोपलाय.
एकजण तर कमाल करतो, तो या मित्रचाच आवाज काढून त्याच्या बाबांशी बोलतो, म्हणतो, बोला बाबा, मी अभ्यास करतोय! ही झाली मुलांची दोस्ती. आणि मुलींची?
ऐकूनच घेणार नाही काही. मैत्रीण तिकडे आलीये का विचारायचा अवकाश? नसेल आली तर लगेच रडबोंबल सुरू. कुठं गेली? का गेली? कशी गेली? आता काय करायचं? ही झाली मुलींची दोस्ती. फुल सेण्टी. काळजीवाहू!! म्हणून तर म्हटलं मुलामुलांची दोस्ती वेगळी, मुलीमुलींची दोस्ती वेगळी!
त्या दोस्तीतल्या भेदांची ही एक गंमत.
 
------------
( तो म्हणतो, मी कॉलेजात जातो, पण शिकतबिकत नाही!)
 
मुलींची मैत्री घळाघळा, सेण्टी, रोनाधोना ते शावाशावा
 
सेण्टी.
या एकाच शब्दात होतं सारं काम.
मुलींना खूप मैत्रिणी असतात. आता तर मित्रही असतात.
ढीगभर असतात. शॉपिंगला जायचं तरी पाचदहा जणी मिळून जातात. शिवाय रूम पार्टनर, बहिणी इत्यादि इत्यादि लांबलचक असते त्यांची मैत्रिणींची यादी. 
पण नुस्तं विचारा तुझी बेस्ट फ्रेण्ड कोण आहे?
एकीचंच नाव सांगतील.
एकच त्यांची बेस्टफ्रेण्ड. भरपूर सिक्रेट्स तिलाच सांगतील.
सगळं मनातलं बोलतील. सगळं शेअर करतील. पङोसिव्ह होतील.
रडतील. हसतील. गप्पा मारतील.
एकमेकींचे ड्रेसेस घालतील.
बहुतेकींचं सारं जग त्या एकाच मैत्रिणीविषयी फिरतं!
काय काय रंग दिसतात त्या चक्रात.
 
1) मुलींची मैत्री म्हणजे तासन्तास बोलणं. काय बोलतात कुणास ठाऊक. पण बोलतात. सतत बोलतात. अनेकदा तर दोघी-तिघी एकदम बोलतात. तरी ऐकतात.
2) मुलींच्या मैत्रीत पङोसिव्हनेस जास्त. सतत सगळं शेअर करायचं, बारकी गोष्ट जरी शेअर करायची राहिली तरी मग रुसवेफुगवे. मीच केल्याचं फिलिंग, मग रोनाधोना आणि बरंच काही.
3) सगळी एन्जॉयमेण्ट एकत्र. एक नाही गेली तर दुसरी नाही जाणार, मग तिसरी नाही जाणार. मग सगळंच रद्द. कुठं जायचं तर त्याचं प्रचंड डिस्कशन. इतकं की कंटाळा यावा.
4) नेलपेण्टचा रंग, ते ड्रेस, ते कानातले, सगळं एकमेकींना विचारून करणार, आणि तरीही आपण वेगळं दिसावं म्हणून धडपडणार!
5) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुली एकदा मैत्री केली तर जन्मभर निभावतात. नातं टिकवतात. मनापासून त्या नात्याला जीव लावतात.
6) त्यामुळे मुलींची मैत्री एकतर लवकर होत नाही आणि झाली की तुटत नाही. - भांडते मात्र फार!!
 
मुलांची मैत्री रोखठोक, बिंधास, सॉलिड ते भांगडा
 
बेकार बिंधास.
दुसरं काय सांगणार?
मुलांना अजून कळतच नाही की आपली दोस्ती होते ती का? कारण दोस्तीत ते कसला विचारबिचार करत नाहीत. झाली दोस्ती झाली.
मग ते एकत्र फिरतात. गाडय़ा उडवतात. बिडय़ाकाडय़ा-चहापासून बरंच काही पिणंबिणं, पिक्चर, ट्रेकबिक असं काय काय करत सुटतात. गप्पा मारतात. पण प्रॉब्लेम्स शेअरिंग कमीच.
गरज असेल, मार्गदर्शन हवं असेल, खरंच सल्ला हवा असेल तर कुणाला काही सांगणार?
नाहीतर आपले प्रॉब्लेम आपल्याजवळ, आपलं आपण पाहून घेऊ म्हणतात.
जे दुस:याला पटकन पत्ता विचारत नाही ते सल्ला काय विचारतील म्हणा!
त्यामुळे अनेक मुलांचं असं होतं की, त्यांना दोस्त खूप असतात, पण बेस्ट फ्रेण्ड असेलच असं नाही.
त्या सा:या दोस्तांना याच्या मनात काय घुसमट चाललीये हे कळेलच असं नाही. कारण तो बोलतच नाही, हे विचारतही नाही!
एकमात्र नक्की, पोरांची दोस्ती रॉक सॉलिड, जन्मभराची. कितीही मोठा साहेब झाला दोस्त, तरी चारचौघात कचकचीत शिवी देऊनच त्याचा सत्कार करणार.
दोस्ती अशी निभावणार की मागितली दोस्तानं तर जान पण देणार!
 
1) एकत्र फुल कल्ला, फुल राडा करणार. त्यातही हॉस्टेलवर दोस्त तर कहरच. बोलतील खूप पण महत्त्वाचं बोलणारच नाहीत.
2) मुलांच्या दोस्तीत ग्रुपचं महत्त्व असतं. त्यात गॉसिपही होतं. पण शक्यतो त्या गॉसिपचं खरंखोटं कुणी करत बसत नाही.
3) मुलींवरून भांडणंही होतात, पण दोस्तीत गर्लफ्रेण्डचा विषय काढायचा नाही. तिच्यासाठी दोस्त सोडायचे नाहीत हा पक्का उसूल.
4) प्रेमाबिमात जरी पडले तरी गर्लफ्रेण्डच्या आधी दोस्त हे प्रत्येक तरुणाचं असतं. ते तसं दाखवत नाही इतकंच.
5) सगळ्यात महत्त्वाचं, जिवाला जीव देणारे सच्चे दोस्त भेटले तर तरुणही पङोसिव्ह होतात. पण ते दाखवत नाहीत, एक्स्प्रेस करत नाहीत इतकंच!

Web Title: One centi and two reddies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.