एका को:या मनाची डायरी
By admin | Published: January 29, 2016 01:41 PM2016-01-29T13:41:19+5:302016-01-29T13:41:19+5:30
नवीन वर्ष संपत आलंच की, म्हणून तिनं डायरी काढली. तीच ती नवीकोरी. यावर्षी डायरी लिहायची असं ठरवल्यावर बाजारात जाऊन विकत आणलेली. वाटलं, वाचू तरी गेल्या 25 दिवसात काय काय घडलं आपल्या आयुष्यात.
Next
मन की बात
नवीन वर्ष संपत आलंच की,
म्हणून तिनं डायरी काढली.
तीच ती नवीकोरी.
यावर्षी डायरी लिहायची असं ठरवल्यावर बाजारात जाऊन विकत आणलेली.
वाटलं, वाचू तरी गेल्या 25 दिवसात काय काय घडलं आपल्या आयुष्यात.
काय काय लिहिलं आपण मनातलं,
असं काय आहे या डायरीत जे आपण इतर कुणालाच सांगितलं नाही, फक्त स्वत:च स्वत:शी कबूल केलं.
आणि स्वत:शीच हसून, रडून साजरे केले काही वेडे, हळवे, काचरे, बोचरे क्षण.
पान उघडून पाहिलं तर काय.
पहिले 1क्-12 दिवसच.
प्रत्येक पानावर जेमतेम दहा बारा ओळी खरडलेल्या.
त्याही अगदीच नोंदीवजा.
म्हणजे अमुक घडलं, तमुक ढमकं बोलला,
मला ते लागलं, जिव्हारी बोचलं.
नुस्ती रडकथाच.
मग तिनं स्वत:शीच विचार केला,
हे असं का?
म्हणजे गेल्या काही दिवसांत आपल्या आयुष्यात चांगलं काही घडलंच नाही का?
आपल्याला आनंद झालाच नाही का?
मग तो आनंद आपल्या हातातून या पानांवर का सांडला नाही.?
आपण तो का या पानात साठवून ठेवला नाही?
तिच्यापाशी उत्तर नव्हतंच.
पण ते उत्तर देण्यापूर्वीच तिला पुढचा प्रश्न पडला की,
आपण हे इतकं कमी का लिहिलं? आणि डायरी लिहिणं लगेच थांबवलं का?
त्याचं उत्तर मात्र तिनं स्वत:ला खरंखरं दिलं,
आपण स्वत:शी बोलणंच विसरलोय.
स्वत:ला सांगणंच विसरलोय छोटे छोटे आनंद.
छोटय़ा हस:या जागांवरचं थांबणं.
भरभरून हसणं.
जे आपल्यातच नाही ते या को:या पानावर उमटत नाही.
कदाचित उद्या जगण्यातही उतरायचं नाही.
डायरी मिटून तिनं ठरवलं की, आता हसू या वेडेपणावर
आणि जरा भरभरून जगायला लागू.
मग लिहू ही डायरी.
( एका जपानी फॉरवर्डचा मुक्त अनुवाद)