पॅण्ट्रीत पसारा ( सॉफ्ट स्किल्स)
By admin | Published: July 23, 2015 05:50 PM2015-07-23T17:50:50+5:302015-07-23T17:50:50+5:30
अनेक बडय़ा कार्पोरेट ऑफिसेसमधे पॅण्ट्री असते. तिथं चहा-कॉफी बनते.
Next
>- अनेक बडय़ा कार्पोरेट ऑफिसेसमधे पॅण्ट्री असते. तिथं चहा-कॉफी बनते.
- मायक्रोवेव्ह असतं. भाज्या गरम करता येतात.
पण अनेक जणांना ही ऑफिस पॅण्ट्री कशी वापरायची हेच माहिती नसतं.
- भसाभसा पाणी सांडतात. आपल्या खरकटय़ा डिश तशाच टाकून जातात.
- त्यात उष्टं अन्न तसंच, ते डस्टबिनमधेही टाकत नाहीत.
- उष्टे पाण्याचे ग्लास तसेच ठेवतात.
- मायक्रोवेव्ह कसा वापरायचा हेच माहिती नसतं, मग तिथं घोळ घालतात.
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अत्यंत घाण करून ठेवतात.
हे सारं टाळायला हवं.
पॅण्ट्रीत स्वच्छता राखणं, वचावचा न खाणं. हे न सांडणं, खरकटं डस्टबिनमधे टाकणं हे सारं खरंतर सोपंय. पण आळस. नाहीच करत अनेकजण तेवढंही!!