पायी चालताना दम लागावा, असा घाटमाथ्याचा चढ तो सायकलने चढत होता. शेकडो किलोमीटरच्या प्रवासाने आधीच पायाला गोळे आलेले. वेग तर गोगलगाईचाच! हिय्या करत घाट चढलोच. ङिांग तर पुढे होती. सायकल उतरणीला लागली अन् सुसाट सुटलो. हवेला चिरत आणि आजूबाजूच्या वाहनांशी स्पर्धा करत घेतलेला थरारक अनुभव तर काय वर्णावा?
- भन्नाटच! खरं सांगू, जग जिंकणं म्हणजे काय असते, हे त्याच क्षणांनी शिकवले!!
रवींद्र राठोड आणि सागर शिंदे सांगतात, त्यांनी पूर्ण केलेल्या एका स्वपAाची कहाणी. उघडय़ा डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणारे येडचॅप तरुण! होय येडचॅपच! अडगळीतील सायकली. त्यावर गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू ही राज्यं ओलांडत पुणो ते कन्याकुमारी असा 15क्क् किलोमीटरचा प्रवास. कधी अपघातांशी सामना, तर कधी ऊन-पावसाचा अडथळा! रस्त्यात कधी कद्रु माणसांची भेट, तर कधी दिलखुलास प्रेमही! स्वप्न पूर्ण करण्याच्या या वेडेपणाला काय म्हणावे?
रवींद्र नगरचा. कधीकाळी कामाच्या निमित्ताने पुण्यात असताना पुणोकरांचे सायकलप्रेम अनुभवणारा! सागरही मूळचा नगर जिल्ह्यातील पाथर्डीचा, पण कामानिमित्ताने आता ठाण्यात स्थिरावलेला. आताचे हे जिवलग मित्र एकमेकांसाठी तसे अनोळखीच होते. पुण्याहून कन्याकुमारी सायकलने गाठावे, हा विचार प्रथम चमकला तो रवींद्रच्या डोक्यात. पण सोबतीला दोस्त असावा, म्हणजे एकसे भले दो! पण दुसरा कोण? हा प्रश्न रवींद्रला सागर्पयत घेऊन गेला. कधीतरी त्याने सागरचं सायकलप्रेम वर्तमानपत्रत वाचलं होतं. त्याला शोधणार कसं, हा प्रश्न सोडवला फेसबुकने! रवींद्रने सायकलवारीची कल्पना सागरकडे मांडली. गंमत बघा, सागरही झपाटलेलाच निघाला. इरादा पक्का झाला अन् दोघेही निघाले सायकलवर. स्वत:चं जग जिंकायला!
5 नोव्हेंबर 2015! रवींद्र नगरहून, तर सागर ठाण्याहून सायकलने पुण्यात पोहचला. मनात ओसंडून वाहणारा उत्साह, खिशात जेमतेम रक्कम, साध्याच सायकली आणि वाट्टेल त्या संकटाला सामोरं जाण्याच्या तयारीसह कन्याकुमारीच्या दिशेने पहिलं पायडल मारलं. ध्येय एकच होतं, कन्याकुमारीचा सनसेट! पण हा प्रवास सोपा नाही, याची जाणीव पहिल्याच दिवसानं करून दिली. पोट:या सुजल्या होत्या, पण मन थांबायला तयार होईना! परतीचा विचार तर कधीच लॉक केला होता.
त्यांनी वेगाचा पहिला थरार अनुभवला तो महाराष्ट्र ओलांडून गोवा गाठताना! याच वेगाने हत्तीचे बळ दिले होते. पण प्रवासातील खडतर अनुभव अद्याप बाकी होते.
कर्नाटक गाठलं, तेव्हा प्रवासाने परीक्षा घेतली. रवींद्र सागरच्या 6क् किलोमीटर पुढे निघून गेला होता. उडपीजवळ रवींद्रचा अपघाताशी सामना झाला. काही वेळ तो गांगरलाच. घरापासून शेकडो मैल दूर या अनोळखी प्रदेशात एकवेळ धीर सुटतो की काय, असा विचार मनाला शिवून गेला. पण ‘माणसं’ भेटली आणि रवींद्र सावरला. त्यांनी शेजारीच मंदिरात आश्रय दिला. शुश्रूषा केली. तेव्हा लक्षात आलं की, प्रदेश भलेही अनोळखी असेल, माणसं मात्र ओळखीची झाली.
तोर्पयतच्या प्रवासात कुठंही पावसानं गाठलं नव्हतं, पण कन्याकुमारीच्या आसपास गाठलंच. पण आता थांबायचं नाही हे मनाशी ठरवत, पाऊसधारा चिरत त्यांनी प्रवास सुरूच ठेवला. अखेर स्वप्नातील दिवस ठरला, तो 18 नोव्हेंबर! दुपारी कन्याकुमारी गाठून विवेकानंद स्मारकासमोर उभं राहून समुद्राकडे ङोपावलेला लालबुंद सूर्याचा गोळा त्यांनी डोळ्यात साठवला.
हे सारं रवींद्र आणि सागर उत्साहात सांगत असतात! आणि म्हणतात, प्रवासात वाईट अनुभव आले पण ते आम्ही विसरलो. चांगलं ते लक्षात ठेवून सायकलवरच्या प्रवासाचा आनंद फक्त मनात भरून घेतलाय. परतीच्या प्रवासात पुण्याहून सागर ठाण्याकडे आणि रवींद्र नगरच्या दिशेने निघाला. तो सांगतो, पहाटे पाचच्या सुमारास शिक्रापूरजवळ सायकलचं टायर फुटलं. नवा टाकला तेव्हा 9 वाजले होते. पुन्हा रांजणगावजवळ सायकलची चेन तुटली. घराजवळ होतो, म्हणून बिनधास्त होतो. पण मदतीला कोणीही नव्हतं. चार किलोमीटर सायकल ढकलून आणली. नवी चेन टाकली, तेव्हा खिसा शब्दश: रिकामा झाला होता. तरीही सायकल चालण्याच्या स्थितीत नव्हती. बसने नगर गाठावेसे वाटले, पण बस वाहक नाही म्हणाला. शेवटी मजल-दरमजल करत दुपारी 3 वाजता नगर गाठलं.
आता या सा:याला कोणी वेडेपणा म्हणो किंवा आणखी काही, पण मनात होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पायडल मारलं! आमच्यासाठी हे जग जिंकण्यासारखंच होतं!’
रवींद्र अन् सागर ही त्यांची गोष्ट सांगतात, तेव्हा त्यांचा हा आनंददायी वेडेपणा आपल्यालाही मान्यच करावा लागतो.
- साहेबराव नरसाळे
(लेखक लोकमत नगर आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)