- संतोष पद्माकर पवार
(लेखक नामांकित प्राध्यापक आहेत. ग्रामीण भागातील विद्याथ्र्याचे दोस्त प्राध्यापक आहेत.)
खेडय़ापाडय़ातल्या
या मुलामुलींसोबतचा हा कॉलेजर्पयतचा प्रवास.
लाल डब्यातला.
मंथली पासचा.
बस चुकली तर काय
या धसक्याचा.
रोज बुडणा:या पहिल्या तासाचा.
ठरल्या वेळेत बस धरून घरी जाण्याचा
आणि कामालाच नाही तर औताला जुंपण्याचा.
शहरी पोरंपोरी गाडय़ा उडवत
बड्डेच्या पाटर्य़ा करतात
तेवढय़ा पैशात आपला
महिन्याचा किराणा येईल म्हणत
जीव जाळण्याचा.
आणि घरी प्यायचं पाणी तरी मिळेल
म्हणून कॉलेजातून चारसहा बाटल्या
भरून घरी घेऊन जाणा:या
कुणा ताईमाईच्या
असहाय्यतेच्या सोबतीचा!
बसच्या पासला पैसे नाही
म्हणून कसा काय कुणी आपला
जीव घेऊ शकतं,
या शहरी प्रश्नाची काही उत्तरं तरी
सापडतील या प्रवासात.
अपडाउन करणा:या मुलामुलींचा पहिला तास हमखास बुडतोच.
कारणो अनेक. बस वेळेवर न येणो, कधी वेळेआधीच निघून जाणो, कधी घरून उशीर होणो.
अशी हजारो कारणो.
तालुकास्तरावर आणि आता काही गावांतही कॉलेजेस निर्माण झाली. पण तळागाळात राहणा:या वाडीवस्तीवरच्या विद्याथ्र्याना अपडाउन चुकले नाही. ज्यांना ते अंतर आवाक्यात आहे, चालत, सायकलने जाता येते ते बसच्या नादी नाही लागत.
पण पंधरा सोळा किलोमीटरवर बसशिवाय पर्यायच नसतो. एवढंच कशाला, आपल्या उच्च शिक्षणाची टिमकी मिरविणा:यांना हे ठाऊकही नसेल, त्यांची ही शिक्षण व्यवस्था एस.टी. महामंडळाच्या कृपेने गेली चाळीसेक वर्षे तग धरून आहे.
खेडय़ापाडय़ातल्या विद्याथ्र्याला आपल्या घरून निघावं लागतं, बसस्टॉपवर येण्यासाठीचे अंतर कधी कधी तीनचार किलोमीटरही असते. स्टॉपर्पयत पायी किंवा सायकलने रखडत जायचे. योगायोगाने कॉलेज स्टॉप असलेला मार्ग असेल तर ठीक. नाहीतर पुन्हा उतरून त्या गावच्या स्टॉपवरून कॉलेजर्पयत पायी चालण्याची रखडपट्टी आहेच. हे अंतरदेखील तीन किलोमीटर्पयत दूर असल्याची उदाहरणं आहेतच.
परतीच्या प्रवासाचे तेच. गाडय़ाही टायमिंगच्या पण बिनटाइम चालणा:या. धावपळ करीत पोहोचा. दोनतीन तास पार पडेर्पयत पुन्हा बस धरून घरी पळायची घाई. यातच एनर्जी लॉस. अप-डाउनच्या विद्याथ्र्याना कॉलेज हे दोन जाहिरातीदरम्यानच्या मुख्य कार्यक्रमासारखं असतं. दो ब्रेक के बीच..
मॉर्निग कॉलेजचे पहिले तास इंग्रजीसारख्या महत्त्वाच्या विषयाचे असतात, ते हमखास चुकतातच. पण पुन्हा बस पकडून घरी येण्याच्या पायी कॉलेजच्या पुढच्या उपक्रमात सहभागी होता येत नाही. आणि तसे थांबण्याच्या आग्रहही होत नाही, कारण बस चुकली तर?
कॉलेजात तरुण मुलांपेक्षाही मुलींना जी काही भयाण स्वप्नं पडतात त्यात रोज पडणारं एक स्वप्न म्हणजे ‘बस चुकणं’ आणि मग पुढच्या हालानेच जाग येते.
अप-डाउन नसते तर महाराष्ट्रातील ग्रामीण मुले-मुली शिकलीच नसती, हेही खरे. एसटी आमच्यासाठी केवळ प्रवासीवाहिनी नाही, ज्ञानवाहिनी पण आहे.
पण त्याला जोडून कितीतरी पिडा आहेत. एकतर कायम धावपळ करा, कसातरी सिलॅबस उरका, हेच काम.
बस-पास ही एक मोठीच कटकट आहे. एकदा काढल्यावर तो संपूच नये वाटते. पण महिना संपतोच. शिवाय रविवार, सुटीच्या दिवशी पास वापरावर र्निबध येतात. सुटीच्या दिवशी कॉलेज इव्हेण्ट असला तर तिकीट काढायला लागते. रीतसर. कारण एसटीने नियम केलेत. पासची किंमत कमी करण्यासाठी जरी हे असे असले तरी कधी-कधी भरुदड असतोच.
ब:याचदा घरचेही लोक तालुक्याच्या गावाला चाललेच मुलगा-मुलगी तर काही वाणसामान, चिजवस्तू आणण्याचे कामही मागे लावतात. माणसांची- जनावरांची औषधं, फवारायची कीटकनाशकं, दुस:या काही किडूकमिडूक गोष्टी आणाव्या लागतात. कधी कधी गावचे ओळखीचे लोकही काम देतात. एवढे टपाल पोस्टपेटीत टाक, रजिस्टर कर, निरोप दे, डबा पोचव.
घरापासून कॉलेज आणि तिथून पुन्हा घर गाठणं यात दिवस मोडतो. पण घरच्या कामांनाही हातभार लावावाच लागतो. मुलींना तर कपडे धुणो, स्वयंपाक करणो ही कामे अधिकची असतात. सोबत शेत असतं छोटे मोठे, जनावरांच्या धारा, कधी गवत, कधी खुरपणी, मुलांना नांगरटीपासून दुस:याच्या रानात मिळेल ते काम करावे लागते.
कॉलेजच्या प्रवेश फीपासून ते परीक्षा फीर्पयत, रोज वापराच्या कपडय़ांपासून ते बसच्या पासर्पयतच्या पैशाची तजवीज करता करता नाकीनव येतात. सुटीतल्या कामांनी हातभार लागतो. पण गावातल्या गावात मिळणारी मजुरी ही अत्यल्प असते. मुलांना दुस:या घरी कामाला जाता येते, पण मुलींची मात्र अडचण असते. त्यांना एसटीने कुठे कामाला जाता येत नाही. चार-सहा जोडीदारणी असल्या तरच काम करता येते.
खेडय़ापाडय़ातून येऊन-जाऊन करून आजकाल कॉलेजात मार्कापासून ते राहणीमानार्पयत स्टँडर्ड मेण्टेन करावा लागतो. त्याचे तर विचारणोच नको. खेडय़ापाडय़ातील विद्यार्थी-विद्यार्थिनी बुजरे आणि आसपासहून येणारे लोकल यंगस्टर्स मात्र चित्रविचित्र आकाराच्या स्कूटर्स, बाइक उडवित येणार, काही महाशय तर थेट फोर व्हीलरमधूनच येणार. कॉलेज कॅन्टीनमधून साजरे होणारे त्यांचे बर्थडे. तोंडाला केक चोपडणो. पुढे त्यातून पटवापटवीचे कार्यक्रम, यांच्यामुळे मनावर नाही म्हटले तरी दाब येतोच. आणि एक न्यूनगंडाचे मोठे शून्य बाळगत असल्याची भावना वाढतच जाते, कायमसाठी!
या तरुण मुलामुलींच्या मनात येतंच की आपले पालक खेडय़ापाडय़ातले, दुष्काळी पट्टय़ातले, नशिबाने मार खाल्लेले, आयुष्याच्या संधीची बस चुकलेले- कॉलेज, बस सोडा त्या स्टॉपर्पयतही पोचू शकलेले नाहीत. आणि आपण त्यांचीच पुढची पिढी. आपल्या आयुष्यात शिक्षणाचे दान पडावे म्हणून ते नादानपणो राबत राहतात. आणि आम्ही ना इकडचे उरतो ना नवीन जगाचे होतो म्हणून मनात मोठाच कालवा होतो.
मीठ आहे तर तिखट नाही, तिखट आहे तर मीठ नाही अशा अवस्थेतलं हे कायमचं जगणं.
त्यात शैक्षणिक यशाची डबल बेल मिळाली तर मिळाली, नाही तर धक्का स्टार्ट बससारखी अवस्था ठरलेली. ब्रेकडाउन होऊन अपमानीत होऊन घरी पडून राहणो परवडणारेच नसते. एकेक रुपया चाकासारखा भासू लागतो. आपल्यासकट घरच्या दुस:यांची शिक्षण रखडण्याची भीती. बहीण-भावांची लगA होण्या न होण्याची भीती, सोय:याधाय:यांत, गाव- पंचक्रोशीत इज्ज्जत दवडायची भीती, याच दबावापोटी आमच्यातली कोणी स्वाती विषाची बाटली गळ्याखाली घोटते, तेव्हा कुठं यंत्रणोला जाग येते. पण ही वरवरचीच मलमपट्टी. खरं दुखणं जाणून घ्यायचं तर आमच्या सोबतीनं सुखदु:ख ङोलून राहील तोच खरा मार्ग शोधील. आवाक्यात पडणारे शिक्षण घेण्याकडेच आमचा कल. आर्ट्स, कॉमर्स हेच आमचे मार्ग, सायन्स कॉलेज ब:याचदा दुपारचे असते आणि महागडेपण. म्हणूनच आम्ही आर्ट्स, सायन्सवालेच असतो बहुतकरून.
आईवडिलांच्या चिंता आम्हाला या कॉलेजवयात चांगल्याच गाठतात. कर्ते सवरते म्हणून आम्हालाच पावले उचलावी लागतात. पण हाती काही कर्तृत्व नसते. ते येण्याची शक्यताही नसते आणि संधी तर नाहीच. कॉलेजलाइफ चैन मानणा:यांपैकी आमचा वर्ग नाही. आमच्यासाठी ही स्पर्धा, पण या स्पर्धेत आम्ही अनेक साधनांअभावी धावत असतो. त्यांच्या एक जीबीचा नेटचार्ज मारणा:यांच्या पैशात आमचा महिन्याचा एस.टी. पास निघतो. एक बर्थ डे पार्टीत आमची वर्षाची फी निघू शकते आणि पेट्रोलगाडय़ा उडविणा:या पैशात तर आमचे घरही चालून जाईल, अशी परिस्थिती आहे.
कॉलेजच्या गावात ‘रूम’ करून राहणो कधीच परवडणारे नसते. वरून जेवणासाठी ‘मेस’ कोठून लावायची? तरी काहीजण एकत्र येऊन रूम करतात आणि गावाकडून एस.टी.ने डबा बोलावतात. पण वेळच्या वेळी डबा पोच करण्याइतपत व्यवस्था घरी असायला नको का? दिलाच डबा त्यालाही एस.टी. पास असतो. पुन्हा तो वाहून आणणो आणि त्यातले अन्न दरम्यान खराब होण्याची आणि ते आहे तसेच खाण्याची वेळही खूप जणांवर येतेच येते.
रूम करणो, मेस लावणो यादेखील चैनीच्या गोष्टी जिथे ठरतात, तिथे शिक्षण कसे घ्यायचे? आणि ‘रूम’मधल्या पोरांचा एकत्रित गलका होतो, तिथे अभ्यास तो कसला होणार? सतत असुरक्षिततेची भावना मनात घर करून असतेच.
इथे बसच्या पासला पैसा नाही आणि हे टाइमपास म्हणून बसमध्ये फिरणारे पण आगे मागे असतात. काय म्हणणार? तशात मग कधीतरी ठिणगी पडतेच. मग मारामारी, हमरीतुमरी ठरलेली. अपडाउनवाले थोडेच संघटित असतात, पण त्यांनाही कधीतरी एकत्र यावं लागतं. पोलीस, कंट्रोलर यांना निवेदने द्यावी लागतात, वेळेवर गाडय़ांसाठी आंदोलने करावी लागतात. पण आत कुठेतरी आपल्या आतला असुरक्षिततेचा आवाज येतच असतो. व्यवस्थेच्या जबडय़ातून शिक्षणाची बिकट वाट वहिवाट म्हणून चालावी लागते.
कधी कधी तर कंडक्टरच्या रोषालाच सामोरे जावे लागते. त्यातल्या काहींना आम्ही म्हणजे ‘फुकटे प्रवासी’ असल्याचेच वाटत असते. ब:याचदा त्यामुळे उभ्यानेच प्रवास करावा लागतो. ज्येष्ठ नागरिक, पासधारक यांनाही हमखास असेच हिडीसफिडीस वागविले जाते. नियम दाखविले की ‘आगावू’ विशेषण देणार. पोलिसांत देण्याच्या धमक्याही देतात.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था होऊन जाते. पण ‘रोजचेच मढे त्याला कोण रडे’ अशी अवस्था.
अपडाउनच्या पोरा-पोरीेंना ‘सॅक-बॅग’चे मोठे वरदानच लाभले म्हणावे लागेल. ‘विंचवाचे बि:हाड पाठीवर’ त्याप्रमाणो सॅकमध्ये वह्या, पुस्तके, डबा, पाणी बॉटल आणि इतर च्यावम्याव असे सारे काही मावते. शे-दोनशेची जुळवाजुळव केली की आली सॅकबॅग. ब्रँडेड आणि दुस:या भारीच्या नादी कोण लागतं? साताठशे रुपये लागणार. तिथेही आमची भागवाभागव सुरू राहते.
मॅचिंग गॅङोट्स, मोबाइल, हेडफोन, ब्लूटूथ ही नवी दुनिया आमच्यापासून दूर असलेलीच बरी. आमच्या जवळच्या नातेवाइकांनी वापरायचे सोडून दिलेले जुने मोबाइलही वापरायला दुरापास्त ठरतात. त्यात बॅलन्स कुठून टाकायचा? नाही म्हटले तरी नुसता चालू ठेवायलाहीे रिचार्ज मारावाच लागतो.
इथं कोणत्याही खर्चाचा विषय निघाला की शेतारानात रोजंदारीवर राबणा:या आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि आपण शिक्षण घ्यायला जातो की चैन करायला, असाच प्रश्न पडत राहतो. शिक्षणाचे महत्त्व मान्य असूनही निराशा दाटून येते आणि हा रस्ता सोडून जाण्याची बुद्धी होऊ लागते. पण शिकले तर पाहिजेच, त्याआधी जगलेही पाहिजे, पळून जाऊन आयुष्य जगता येत नाही. गेलेली संधी परत येत नाही. विचार तर खूपच येतात. एक वेळेस असे होते, विचार यायचेही बंद होतात, स्वप्ने तर संपलीच असे वाटत राहते आणि कानात नुसताच येत राहतो अप-डाउनच्या बसचा खडखडाट!
कॉलेजातून बाटल्या भरभरून पाणी
नेतीस कुठं?
अप-डाउन करणा:यांच्या सगळ्याच तहान-भुका कायम जागृत तर असतातच, पण त्या तशाच दाबूनही ठेवाव्या लागतात. आता तर पाणीही बाटलीतून विकत घेऊन प्यावे लागते, अशा काळात त्यासाठी पैसे आणायचे कोठून? कॉलेजच्या सार्वजनिक नळावर तहान भागविणो, कॅन्टीनमध्ये जाऊन पाणी पिणो हे एकमेवच मार्ग. दरम्यानच्या काळात तिथूनच बाटल्यात पाणी भरून वापरायचे.
आमच्या पाहण्यातली एक मुलगी तर कॉलेजमधून परतताना घरी नेण्यासाठी पाच-सात बाटल्या भरून नेते, का? तर घरी पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ. गावातच पाण्याचा टँकर चालू. तशात राष्ट्रीय सेवा योजनेत असलो आणि त्याचा कॅम्प असला की तेवढे सात दिवस फार विरंगुळ्याचे वाटतात. तिथे खाण्या-पिण्याच्या सोयीसह मनाचेही मोठे मनोरंजन होते, रोजच्या जीवनात काहीसा बदल होतो. तिथेही घरचे लोक सोडायला नाखूश असतात, पण दृढ करावा लागतो, बिनखर्चिक आहे हे पटवून द्यावं लागतं. शिबिराचे दिवस कॉलेज शिक्षणात भारीच मजेचे म्हणायचे!
लाल डब्यात
खरं शिक्षण
अप-डाउन करणा:यांचे अर्धे शिक्षण बसगाडीत होते. रोज अप-डाउनमध्ये रोजचे येणारे-जाणारे पाठ तर होतातच, पण कंडक्टर-ड्रायव्हर यांचे डय़ूटी शेडय़ूलही पाठ होते. बसचे नंबरही पाठ होतात. त्यांच्या त्याच त्या कळाही पाठ होतात. बसमध्ये रोजच्या व्यतिरिक्त कोण पाहुणो आले हेही समजते. आणि कोण कोणाचा पाठलाग करतो हेही समजते.
बसचा पास हरवला तर?
बसचा पास हरवला तर काय? हे एक महान दिव्य. पोलिसांत जा, तक्रार करा, हेलपाटे मारा. नको जीव होतो. त्यात कॉलेजवाटेवर येता-जाताना अपघात झाला तरी विद्याथ्र्याला विद्यापीठ मोबदला देत असते. पण इथे अनुभव मात्र कायमच चांगला येईल असे नाही. या गोष्टी ब:याचदा महाविद्यालय प्रशासनाच्या मनावर असतात. बसपाससाठी ओळखीची सही घ्यायला जे तासन्तास ताटकळत ठेवतात, ते कधी विद्याथ्र्याच्या कल्याणाच्या गोष्टी बघणार? वरून काही बोलायचा अवकाश की बोधामृताचे डोस ऐकायला मिळणार म्हणजे मिळणार. अपवादामत्क परिस्थितीत चांगला अनुभवही येतो, पण तो अपवादात्मकच.
कसलं कमवा नि कसलं शिका?
एखादा आकस्मिक खर्चाचा मुद्दा निघाला तर तो घरी कसा सांगायचा, यातच काही दिवस निघून जातात. मग शेवटी काहीतरी मार्ग निघण्यासाठी आईवडिलांना सावकाराची पायरी चढावी लागतेच. आणि मग एका शिक्षणापायी किती हाल अशी अवस्था होते. त्यातूनच उभारी येण्याचे मार्गही सापडत नाही. ‘कमवा आणि शिका’ योजना चांगली आहे पण मोबदला अत्यल्प वाटतो, कुठे तो नियमानुसारही दिला जात नाही. काही ठिकाणी तर त्या नावाखाली दिवसभर राबूनही दोन तासाचे पैसे मिळत नसल्याच्या घटना घडल्यात. विद्यार्थी कल्याण मंडळासाठी विद्यापीठाच्या कितीतरी योजना असतात म्हणो. पण कळाल्या तर ना! त्या सांगणार कोण? त्याचा संपूर्ण तपशील मिळाला तरी अंमलबजावणीच्या नावाने आनंदीआनंद असतो.