AI चा बटवा कोणती क्रांती घडवेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:57 PM2018-08-09T16:57:53+5:302018-08-09T16:58:13+5:30

आज क्रांतिदिन. क्रांती आपल्या अवतीभोवती घडते आहे. आपण नव्या क्रांतीचे साक्षीदार आहोत. वैद्यकीय क्षेत्रात अशी क्रांती होतेय. कोण करतंय? कृत्रिम बुद्धिमत्ता.

revolution of AI?-world is changing. | AI चा बटवा कोणती क्रांती घडवेल?

AI चा बटवा कोणती क्रांती घडवेल?

Next
ठळक मुद्देवैद्यक क्षेत्रातही ‘आजीबाईचा बटवा’ जाऊन एआयचा बटवा येण्याची क्रांती होते आहे!!

- डॉ. भूषण केळकर

आपण मागच्या लेखात एआयचे कला/साहित्य क्षेत्रात काय परिणाम होतील ते पाहिलं. या पुढील काही लेखात आपण एआयचे अन्य अनेक क्षेत्रात काय परिणाम व तद्नुषंगिक स्थित्यंतरं होतील ते पाहू. आजच्या आपल्या संवादात आपण एआयचे वैद्यकीय क्षेत्रातील उपयोग व परिणाम बघू.
दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतील मुलांसाठी कॅलिफोर्निया व न्यू जर्सीमध्ये करिअर काउन्सिलिंग करताना प्रकर्षाने जाणवलं की वैद्यकीय क्षेत्रातील विशेषतर्‍ पॅथॉलॉजी व रेडिओलॉजी या उपशाखांबाबत करिअर करणं धोक्याचं आहे, असा तेथील डॉक्टर, पालकांचा ठाम विश्वास दिसला. मला फार धक्का बसला नाही कारण मी स्वतर्‍च अशा तंत्रज्ञानावर आयबीएममध्ये असताना काम केलंय.
‘ट्रायकॉर्डर’ नावाचं  अंगावर बाळगता येईल असं छोटं उपकरण हे  एआय, क्लाउड, बिग डाटा, अ‍ॅनलिटिक्सचा वापर करून आजमितीला रक्त, घाम, रेटिना स्कॅन वगैरे विश्लेषण करून तुमची आरोग्यस्थिती घरबसल्या सांगतो. पॅथॉलॉजी लॅबची गरज नाही! एवढं छोटं उपकरण किती गोष्टी मोजतो तर ‘अब तक छपन्न.’ आरोग्याची जणू ‘स्विस नाइफ’ वाटावी असं उपकरण! नुसती सोयच नव्हे तर हे उपकरण पॅथॉलॉजी लॅबपेक्षा अधिक अचूकतेनं  56 गोष्टी मोजतं आणि विश्लेषण करतं असे सध्याचे अहवाल आहेत!
रेडिओलॉजीचं उदाहरण घेतलं तर डीप लर्निग व बिग डाटा (ज्याचा ऊहापोह आपण याच लेखमालेत आधी केलाय.) यांचा वापर करून लाखो इमेजेसचा अभ्यास करून आजकाल प्रख्यात रेडिओलॉजिस्ट्सपेक्षा अधिक अचूक व क्षणार्धात रोगनिदान करताहेत, आयबीएम वॉटसन सारखी मशीन्स! क्षयरोगाचं निदान हे 96 टक्के अचूक केलं जातंय साध्या मशीन्सद्वारे!
मी स्वतर्‍ आयबीएममध्ये असताना डायबेटिक रेटिनोपथी (मधुमेहामुळे अंधत्व येणं) याचे रोगनिदान लुइझियानामधील  खेडेगावासाठी आणि आपल्या ईशान्य भारतीय जनजातींसाठी केलंय, तेही 2010 मध्ये! आता तर ते तंत्रज्ञान अजून विकसित असणार हे उघड आहे!
दिल्लीमधल्या काही शल्यचिकित्सा व शस्त्रक्रियासुद्धा प्रख्यात हॉस्पिटलमध्ये रोबॉटिक्सद्वारा होत आहेत. अगदी मायक्रो सजर्रीर्पयत! रोबॉटिक्स म्हणजे इंडस्ट्री 4.0चाच भाग हे आपण जाणतोय!
2006 मध्ये मी एआय वापरून क्लीव्हलॅण्ड क्लिनिक या ओहायो प्रांतात हृदयरोगावर काम केलं होतं. त्यात नुसतं अचूक निदान हा भाग नव्हता, तर असलेल्या माहितीचा वापर करून काही पूर्वी दृग्गोचर नसणारे व काही आश्चर्यकारक निष्कर्ष आम्ही काढू शकलो होतो. ज्यामुळे तेथील डॉक्टर्स चकित झाले होते. आता बघा त्यालाही एक तप लोटलं आहे!!
कर्करोगावरचे संशोधन हे प्रचंड आहे. 5.5 कोटींपेक्षा अधिक शोधनिबंध असणारं हे क्षेत्र एआय वापरणारा संगणक सहज ‘खाऊ’ आणि ‘पचवू’ शकतो! त्यातून कर्करोगाचे नुसते निदान नव्हे तर त्यावर मात करण्याच्या दिशेने, रेडिएशन शस्त्रक्रिया किंवा अलीकडील ‘डॉमा नाइफ’’ या तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊन, नॅनोरोबॉट्सच्या साहाय्याने आत्यंतिक अचूकतेने ‘स्थानिक’ पातळीवर दुरुस्त्या, शस्त्रक्रिया करतो की ज्यामुळे रुग्णाला त्रास कमी होतो व जीवनमान सुसह्य होतं.
हेच काय तर ज्याला इन्फॉर्मेशन बेस्ड मेडिसिन म्हणतात की ज्यात नुसतेच वैद्यकीय/लक्षणं व पॅथॉलॉजीचीच माहिती विचारात घेतली जात नाही तर जनुकीय माहिती  वापरली जाते. ती शाखा तर जणू एआयवरच आधारित आहे. त्याविषयी आपण विस्ताराने पुढील भागात ऊहापोह करू.
मानवी देह हा सीमित आहे. आपल्याला सगळं माहिती आहे असं म्हणून आपणं जर सांगत राहिलो की वैद्यकीयशास्त्र परिपूर्ण आहे, तर तो भ्रम ठरेल. परवाच एका नव्या मानवी अवयवाचा शोध लागला. त्याचं नाव इंटरसिशियन. हे आपण वाचलं असले.!
आज 9 ऑगस्ट या क्रांती दिनाला हा लेख वाचताना लक्षात ठेवू की वैद्यक क्षेत्रातही ‘आजीबाईचा बटवा’ जाऊन एआयचा बटवा येण्याची क्रांती होते आहे!!
आपण सर्वच त्याचे साक्षी आहोत!!


 

Web Title: revolution of AI?-world is changing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.