सिम्पल तरीही बिंधास्त!!

By admin | Published: July 23, 2015 06:30 PM2015-07-23T18:30:28+5:302015-07-23T18:30:28+5:30

आम्हाला जे आवडेल ते आम्ही घालू, कसल्या फॅशन नी कसले ट्रेण्ड्स असं म्हणत जुन्याच गोष्टी नव्यानं स्वीकारणा:या कॅम्पस फॅशनची एक चिअरफुल झलक!!

Simple still damn !! | सिम्पल तरीही बिंधास्त!!

सिम्पल तरीही बिंधास्त!!

Next
>- सायली कडू
 
आम्हाला जे आवडेल ते आम्ही घालू, कसल्या फॅशन नी कसले ट्रेण्ड्स असं म्हणत जुन्याच गोष्टी नव्यानं स्वीकारणा:या कॅम्पस फॅशनची एक चिअरफुल झलक!!
 
कॉलेजं सुरू होण्याचा हा सिझन!
शाळा सुरू होताना नवी वह्या-पुस्तकं,
त्यांना कव्हर्स,
असा माहौल असतो!
आणि कॉलेज सुरू होताना.?
पुस्तकबिस्तकं नंतर!!
अॅडमिशन नावाचा किचकट प्रश्न सुटला की,
पहिला त्याहून जटिल प्रश्न उभा राहतो,
कॉलेजसाठी नवीन कपडे कसे घ्यायचे?
काहींनी तर ठरवून टाकलेलं असतं,
जुना लूक सोडायचा, यंदा एकदम स्टायलिश 
आणि प्रेङोण्टेबल दिसायचं!
काहीजण मात्र त्याहून भारी.
ते म्हणतात, जे आवडेल ना ते घालू,
आपल्याला काही घेणंदेणं नाही फॅशनशी!
आपण घालू ती फॅशन!!
हे असे अॅटिटय़ूड ठासून भरलेले असताना,
यंदा कॉलेज सुरू होताना 
कॅम्पस फॅशनमधे काय नवीन आहे,
कशाची चलती आहे
आणि कशाकशाची चिक्कार बोलती आहे.
याचा एक ढोबळ कॅम्पस स्टडीच करायचा 
असं ठरवलं;
आणि हे यंदाचं कॅम्पस 
खरंच काहीतरी खास अॅटिटय़ूड घेऊन येणार 
याची एक झलकच दिसली.!!
 
काय ‘हिट’ आहे,
कॅम्पस फॅशनमधे?
 
 रिबिन्स !
- बरोबर वाचलंत तुम्ही, दचकू नका!
शाळकरी वयातसुद्धा मुली आता केसांना तेल लावून रिबिनी बांधायला नाही म्हणतात, आणि कॉलेजात रिबिनी?
पण हे खरंय, रिबिन्सची फॅशन परत आली आहे. रिबिन, लेस, यांनी केस बांधणं हे पुन्हा यंदा चर्चेत आहे!
***
हातभर बांगडय़ा घालूनच मुली कॉलेजात येताना दिसतात. जीन्स, टी-शर्ट आणि हातभर बांगडय़ा याला कुणी आता खेडवळ म्हणत नाहीत.
***
हेअरबॅण्ड.
शाळेतल्या मुली हेअरबॅण्ड लावतात, कॉलेजात कुणी आताआतार्पयत हेअरबॅण्ड लावून आली की तिची टिंगलच व्हायची. पण आता तसं नाही. कलरफुल हेअरबॅण्ड हा नवीन स्टायलिश मामला झालाय!
 ***
नाकात गोल नथ अन् कपाळावर टिकली, झालरवाल्या बॅगा, गळ्यात माळा, हिरवं-निळं काजळ, पायात मोजडय़ा, एका हातात मोठय़ा डायलचं घडय़ाळ, फुलाफुलांच्या नक्षीचे ड्रेसेस आणि पसरट चपला (म्हणजे नो हिल्स) हा यंदाच्या कॅम्पसचा मूड आहे!
 
***
गेल्या दोन-तीन कॉलेज पिढय़ांनी जे मागास ठरवलं तेच पुन्हा आता स्टायलिश म्हणून येतं आहे, फॅशन नावाचं एक चक्र पूर्ण फिरलंय. म्हणून तर ढगळ्या पलाझो, डंगरी, नाकातल्या मुरण्या, कपाळावर रंगीत टिकल्या हे सारं फिरून पुन्हा नव्यानं आलंय. काजळानं आपला रंग बदलून घेतलाय आणि मोबाइलवाल्या हातात घडय़ाळं पुन्हा आली आहेत.
कॉलेजात जाणारी प्रत्येक पिढी आधीच्या पिढय़ांपेक्षा वेगळी असते आणि या पिढीनं तर फॅशन्सच्या बाबतीतही स्वत:चा एक नवाच ट्रेण्ड तयार करायला सुरुवात केली आहे.
सिम्पल पण बिंधास्त!!
 

Web Title: Simple still damn !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.