- अनिल भापकर
anil.bhapkar@lokmat.com
चीन आणि अमेरिकेनंतर सगळ्यात जास्त स्मार्टफोन यूर्जस हे भारतात आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. स्मार्टफोनच्या किमती या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. याला कारण म्हणजे अँण्ड्राईडमध्ये झालेली क्रांती. आपण आज स्मार्टफोन घेतला तर तो काही महिन्यांनी जुना वाटू लागतो. त्याचा परफॉर्मस हा खूप ‘लो’ झालेला असतो. आपल्याला आपल्याच स्मार्टफोनचा राग यायला लागतो. मात्र स्मार्टफोन घेतल्या दिवसांपासून आपण काही चांगल्या सवयी जर स्वत:ला लावून घेतल्या तर वर्षभरानंतरही तो अगदी नव्यासारखचं परफॉर्म करेल.
‘स्क्रीन’ची साफसफाई
कॉम्प्युटरच्या डेस्कटॉप स्क्रीनवर जास्त फाईल्स आणि फोल्डर्स ठेवले तर त्याचा स्पीड जसा कमी होतो. अगदी तसाच स्मार्टफोनच्या स्क्रीनवर सुद्धा ‘अँप’चे आयकॉन्स आणि विगेटस जास्त असले तर त्याचा स्पीड मंदावतो. त्यामुळे कुठले आयकॉन्स होम स्क्रीनवर ठेवावेत आणि कुठले काढून टाकावेत याचा रिव्ह्यू आपण दर दहा दिवसांनी घेतला पाहिजे. कारण फक्त स्पीडच कमी होतो असं नाही तर बॅटरी लाईफवरदेखील त्याचा परिणाम होतोच.
बिनाकामाचे अँप्स
अनेकांना नवनवीन अँप्स डाउनलोड करायची चटक लागते. ते इन्स्टॉल केल्यानंतर कधी वापरलेही जात नाही. पण बॅकग्राउंडला ते नेहमी चालू असतात, त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनची बरीच एनर्जी त्यात खर्च होते. हे अँप्स रेग्युलरली अपडेट डाउनलोड करीत असतात. त्यामुळे तुमचा इंटरनेट युजेसही वाढतो परिणामी खर्च तर वाढतो. त्यामुळे जे नको ते अँप्स बिंधास काढूनच टाका.
कॅश आणि कुकीज
जेव्हा तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेट सफर्र्ींग करता तेव्हा बराच बिनाकामाचा डेटा तुमच्या स्मार्टफोनच्या मेमरीमध्ये सेव्ह होत असतो, त्यामुळे नियमितपणे स्मार्टफोनची कॅश मेमरी क्लीन करायला पाहिजे. त्यासाठी अनेक चांगले मोफत अँप्ससुद्धा उपलब्ध आहेत जसे की क्लीन मास्टर. याचप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनमध्ये कुकीजसुद्धा नियमितपणे सेव्ह होत असतात ज्या लक्षातदेखील येत नाही. त्यामुळे कुकीजसुद्धा नियमितपणे क्लीन करायला पाहिजे. यासाठीसुद्धा क्लीन मास्टर हे अँप चांगले आहे.
लाईव्ह वॉलपेपर्स
आपल्या स्मार्टफोनवर लाईव्ह वॉलपेपर्स टाकायची बर्याच जणांना भारी हौस असते. पण त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी तर डाऊन होतेच शिवाय परफॉर्मससुद्धा स्लो होतो. त्यामुळे लाईव्ह वॉलपेपर्स शक्यतो वापरू नयेत.
मोबाइल सर्व्हिसेस
अनेकवेळा आपण मोबाइलच्या सर्व्हिसेस चालू तर करतो मात्र त्या परत बंद करायचा विसरून जातो. मोबाइल सर्व्हिसेस जसे की वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, मोबाइल डेटा आदि यापैकी ज्या सर्व्हिसेसची गरज नसेल किंवा काम झाल्यास लगेच बंद करून टाकल्या पाहिजे, स्मार्टफोनची बरीच एनर्जी त्यामुळे वाचते.
रिबुट मस्ट
रिबुटिंग अर्थात तुमचा स्मार्टफोन रिस्टार्ट करणे. शक्य झाल्यास तुमचा स्मार्टफोन दिवसातून एकदा रिबुट केला पाहिजे. कारण, त्यामुळे बॅकग्राउंडला जे बिनाकामाचे अँप्स आणि सॉफ्टवेअर्स चालू असतात ते बंद होतात. बर्याचदा आपण काही अँप्स चालू केले आणि काम संपल्यानंतर बंद जरी केले तरी बॅकग्राऊंडला ते चालू असतात. त्यामुळे आपण दिवसातून एकदा स्मार्टफोन रिबुट केला पाहिजे.
स्मार्टफोन क्लिनिंग
आपण जो स्मार्टफोन वापरतो तो स्वच्छ आणि निटनेटका दिसायला पाहिजे, त्यामुळे आठवड्यातून एकदा स्मार्टफोनचे कव्हर काढून स्मार्टफोन व कव्हर स्वच्छ करायला पाहिजे. त्याचप्रमाणे स्क्रीनसुद्धा स्वच्छ करायला पाहिजे. तांत्रिक काळजी एवढीच स्मार्टफोनची स्वच्छतासुद्धा महत्त्वाची आहे.