समर इन द बॉटल-उन्हाळातला नवा ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 05:00 PM2019-05-09T17:00:36+5:302019-05-09T17:01:31+5:30

समर कलरचे कपडे घालता येत नाहीत? - ना सही! ते सगळे ब्राइट रंग एका बाटलीतून प्रकटले तर.

Summer in the Bottle-Summer New Trend | समर इन द बॉटल-उन्हाळातला नवा ट्रेंड

समर इन द बॉटल-उन्हाळातला नवा ट्रेंड

Next

प्रिया परदेशी 

समर इन द बॉटल. असा एक भन्नाट ट्रेण्ड सध्या आहे. त्याचंच भावंडं आहे, समर इन द ग्लास!
म्हणजे काय तर उन्हाळ्यात ‘कूल’ वाटेल, मूड छान होईल आणि मस्त फ्रेश वाटेल, थकवा पळून जाईल असे रंग बाटलीतून किंवा ग्लासमधून तरी आपल्या आयुष्यात उतरवायचे.
- अजिबात वाचून गैरसमज करून घेऊ नका!
इथं चर्चा आहे ती गारेगार सरबतांची आणि नेलपॉलिशची.
त्यालाच म्हणतात समर इन द बॉटल!
प्रत्येक वर्षी समर कलरची चर्चा होते. ज्यांच्याकडे पैसे असतात ते समर शॉपिंग करतात. म्हणजे उन्हाळ्यात छान दिसतील अशा प्रकारचे कपडे विकत घेतात. त्या रंगाचे आणि पोताचे कपडे घालतात. मात्र सगळ्यांनाच काही एवढा खर्च परवडणार नाही.
मात्र उन्हाळ्याचे ब्राइट कलर्स तर आपल्या जगण्यात आणायलाच हवेत. ते ही कमी पैशात, खर्चात आणि छान स्टाइलमध्ये!
तर त्यासाठी हा समर इन द बॉटल ट्रेण्ड.

उन्हाळ्यातले रंग
पिवळा, लिंबू रंग, ऑरेंज, निळ्याच्या विविध छटा, पिच आणि इंद्रधनु विविध रंग आणि पांढरा हे रंग सध्या उन्हाळी रंग अर्थात समर कलर्स म्हणून चर्चेत आहेत.
त्या रंगांना आपल्या आयुष्यात स्थान देण्यासाठी हे दोन सोपे फॉम्यरुले!

नेलपेण्टची बाटली
बाटलीत रंग


आपण समर कलर्समध्ये रंगायचं असेल तर हा एक सोपा उपाय. नेलपॉलिश.
त्यावरूनच हा समर इन द बॉटल असा ट्रेण्ड आला आहे.
नेल आर्ट तसंही सध्या चर्चेत आहे. मात्र तेही न करता विविध रंगांच्या नेलपॉलिशचा वापर करून आपण समर कलर्स वापरू शकतो.
1. मुळात पिवळा, केशरी, निळा, किंवा विविध रंगाचे पट्टे हे नेलपेण्ट म्हणून कसं वापरायचं हा किंतू-परंतु मनातून काढून टाका.
2. रोजचे कपडे कितीही जुने किंवा तेच ते असले तरी हाताच्या नखांवर आपण ब्राइट रंग वापरू शकतो.
3. लेमन कलर, ऑरेंज हे दोन रंग प्लेन लावता येतील.
4. निळ्या रंगाच्या विविध छटा एकाचवेळी नखांना लावता येतील.
5. निळा, पिवळा, केशरी असं कॉम्बिनेशन करता येईल.
6. पिच कलर तर कसाही लावला नखांना तरी सुंदर दिसेल, एखादं फुलंही नखावर काढता येईल.
7. नखांवर इंद्रधनुषी रंगही देता येईल.


 

सरबतं- रंग आणि ग्लास


आपली कुठलीही पारंपरिक पेय काढून पाहा. लिंबू सरबत, पन्हं, कोकम सरबत, लस्सी, मॅँगो लस्सी, टरबुजाचा रस, मोसंबीचा रस, खरबुजाचा रस हे सारे रस या उन्हाळी रंगातच येतात. 
त्यामुळे अधनंमधनं हे सारे रस पिणं हे आरोग्याच्याच नाही, तर आपल्या मूडच्या उत्तम आरोग्यासाठी गरजेचं आहे.
आपण जे रंग सतत पाहतो, त्यांचा आपल्या मनावर परिणाम होतोच. त्यामुळे हे सारे ब्राइट रंगाचे पारंपरिक पेय पिणं केव्हाही उत्तम. कोल्ड ड्रिंकला नाही म्हणणं हेही म्हणूनच ‘कूल’ ठरतं!

Web Title: Summer in the Bottle-Summer New Trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.