Taking a week off

By admin | Published: November 19, 2015 09:32 PM2015-11-19T21:32:48+5:302015-11-19T21:32:48+5:30

फोन बंद, नेट बंद. ऑनलाइन राहणं बंद असं म्हणत सुटी घेतलेल्या सप्ताहाचा एक नवीन ट्रेण्ड

Taking a week off | Taking a week off

Taking a week off

Next

- अपूर्वा ढोले

कसला म्हणून ट्रेण्ड येईल,
याचा आताशा काही नेम उरलेला नाही.
फॅशन म्हणा किंवा खूळ म्हणा, आलं की जगभर एकदमच येतं.
सध्या ऐन दिवाळीत आपल्याकडे तरुण मुलांमधे एक ट्रेण्ड होता.
दिवाळीत काढ फोटो की टाक फेसबुक, व्हॉट्सअॅपवर असं एकीकडे अनेकांनी केलं. म्हणजे खाल्लेल्या फराळापासून, घातलेल्या कपडय़ांपासून, मारलेल्या अत्तरापासून ते फटाके आणि सिनेमांर्पयत जे जे केलं ते सारं फेसबुकवर टाकलं.
म्हणजे हे दिवाळी सेलिब्रेट करत होते की नुस्ते फोटो काढत ऑनलाइन होते हे कळायला मार्गच नाही.
पण या गर्दीत एक ट्रेण्ड वेगळा होता.
त्याचं नाव, ‘टेकिंग अ वीक ऑफ!’
म्हणजे काहींनी चक्क सुटी घेतली होती, दिवाळीची. आठवडाभर.
पण त्याचवेळी त्यांनी आपल्या ऑनलाइन जगापासूनही सुटी घेतली होती. सारं बंद करून टाकलं. फोनच स्वीच्ड ऑफ. नेट बंद, सोशल नेटवर्किग बंद.
सगळं डोकंच बंद करून टाकत धावत्या जगातून उडी मारून स्वत:पुरते काही निवांत क्षण जगून घेतले. 
त्याचंच नाव टेकिंग अ वीक ऑफ!
यंदा ऐन दिवाळीत तरुणांच्या जगात चर्चा कसली होती तर हे आठवडा नेटानं नेट बंद ठेवून आनंदानं साजरा करण्याची!
तीच ती चर्चा, त्याच त्या स्मायली यातून ब्रेक घेऊन सरळ सतत ऑनलाइन आणि अव्हेलेबल असणंच त्यांनी नाकारलं होतं.
जगण्यातला निवांतपणा पुन्हा शोधायला मदत करणारा हा नवीन ट्रेण्ड..
वेगळा. हटके. शांत.
अशी सुटी ‘हक’ बनती है, असं म्हणत काही चांगले ट्रेण्ड येतात असं म्हणायला हवं.
ैआपण त्या ट्रेण्डचा भाग कधी होणार ही गोष्ट वेगळी!

Web Title: Taking a week off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.