कपड्यांच्या फॅशन्समधले ‘इन’ ट्रेण्ड्स
By admin | Published: December 31, 2015 08:10 PM2015-12-31T20:10:32+5:302015-12-31T20:10:32+5:30
नो टाइट फिटिंग्ज! टाइट फिटिंग्जचा जमाना गेलाय. टाइट फिटिंग्जचा शर्ट-पॅण्ट आणि स्कर्ट घालून दिवसभर वावरणं अवघड
Next
>नो टाइट फिटिंग्ज!
टाइट फिटिंग्जचा जमाना गेलाय. टाइट फिटिंग्जचा शर्ट-पॅण्ट आणि स्कर्ट घालून दिवसभर वावरणं अवघड. हल्ली तर सकाळी जीमपासून संध्याकाळी एखाद्या हॉबी क्लासपर्यंत तरुणांचे नाना व्यवधानं असतात. वेळ मात्र फारच कमी असतो. आणि एवढं सगळं करायचं म्हणजे पैसाही लिमिटेड. घरी जाऊन दहावेळा कपडे बदलायला वेळ असतो कोणाला? म्हणून दिवसभर कम्फर्टेबली वावरता येईल असे लूज कपडे घालणं ही आजच्या तरुणांची गरज आहे. ढगळे कपडे घालणं म्हणजे गबाळ दिसणं असं नव्हे. अंगावर शिवल्यासारखे घट्ट, स्किनटाईट कपडे आता बाद होतील. आणि कम्फर्टेबल वाटेल असे फिटिंगचे, मापातले पण सैलसर कपडे यावर्षी मुलामुलींना जास्त हवेसे वाटतील!
बदलेल काय?
पॅण्ट असू देत, शर्ट असू देत, टॉप असू देत नाहीतर स्कर्ट ते दिसायला कदाचित ढगळे दिसतील पण शोल्डर, वेस्टमध्ये व्यवस्थित फिटिंगचे असतील. तिथलं फिटिंग परफेक्ट. पण बाकी जरा सैलसर. त्यामुळे तरुणतरुणींना दिवसभर मोकळेपणानं वावरण्याची परवानगी देतील अशा कपड्यांवर टे्रण्डी लूकचा फॅशनेबल शिक्का बसेल.
जॉगर्स इन
मुलं आणि मुली या दोघांनाही सहजपणे घालता येणारी पॅण्ट्समधली यंदाची सगळ्यात महत्त्वाची फॅशन म्हणजे जॉगर्स. कंबरेत व्यवस्थित बसणारी आणि पुढे पावलांपर्यंत कम्फर्टचा फील देणारी ही जॉगर्स पॅण्ट. यावर्षी तिची डिमाण्डही जास्त असेल आणि चलतीही!
बदलेल काय?
सकाळी जीमला ही जॉगर्स घालून गेलं, तर तिथून परस्पर तीच घालून कॉलेजला गेलं आणि संध्याकाळी मित्र-मैत्रिणींबरोबर कॉफीलाही गेलं तरी चालेल. अशा सगळ्या ठिकाणी फॅशनेबल आणि कम्फर्टेबल वाटेल अशी ही लेटेस्ट फॅशन जगण्यात स्वत:चं स्थान निर्माण करेल.
लूज टॉप, लॉँग स्कर्ट, पलाझो
स्कर्टची काहीशी गायब झालेली फॅशन यंदा पुन्हा येण्याची चिन्हं आहेत. मुलीही यावर्षी लूज टॉप आणि लॉँग स्कर्टला विशेष पसंती देतील. फिटिंग आणि मोकळेपणाचा फील एकाच पेहेरावात देणारी पलाझो पॅँट यावर्षी घालण्याकडे मुलींचा विशेष कल असेल. त्यावर वेल फिटेड क्रॉप टॉप हा नवीन फंडाही मुली ट्राय करून बघतील.
बदलेल काय?
नेहमीचे टिपिकल पंजाबी, जीन्स हे जरा बाजूला राहत पायघोळ पलाझो, स्कर्ट हे जरा यंदा जास्त मिरवताना दिसतील!
फ्लोरल प्रिण्ट्स, सॉफ्ट कलर
गेल्या वर्षी अधिकच भडक वाटणाऱ्या निआॅन कलर्सची आणि काहीशा बटबटीत वाटणाऱ्या फ्लॉरेन्स प्रिण्ट्सची खूप चलती होती. सगळीकडे निआॅन कलर्स दिसायचे. यावर्षी हे निआॅन वापरातून बऱ्यापैकी बाद होतील. त्याऐवजी नाजूक आणि डिसेंट दिसणारी फ्लोरल प्रिण्ट्स ही तरुणींची पहिली पसंती असेल. सोबर प्रिण्टला पसंती देणारे मग भडक रंगांना कशाला चूझ करतील? त्यापेक्षा सॉफ्ट कलरकडे तरुणांचा विशेष ओढा असेल.
बदलेल काय?
मुख्य बदल हाच की, निआॅन कलर्स फारसे चालणार नाहीत, त्याऐवजी पुन्हा सॉफ्ट कलर्स अंगाखांद्यावर छान मिरवताना दिसतील!
सेलर स्ट्राइप
प्रिण्ट्समधलं हे न्यू अरायव्हल आहे. टॉप्स, टी शर्ट यामध्ये सेलर स्ट्राइप प्रिण्ट विशेष निवडल्या जातील. या प्रिण्ट्समध्ये लाल, गुलाबी, निळे आणि हिरवे रंगही उपलब्ध आहेत. पण व्हाइट अॅण्ड ब्लॅक हे कॉम्बिनेशन एकदम छा जाणारं असल्याकारणानं सेलर स्ट्राइप विथ ब्लॅक अॅण्ड व्हाइट अशी फॅशन यावर्षी नक्की दिसेल.
बदलेल काय?
ब्लॅक अॅण्ड व्हाइटसह आडव्या रेषांची डिझाइन्स यंदा पाहायला मिळतील. प्रिण्टमधला रेषांचा गुंता कमी होऊन या स्ट्राईप जरा सुखद धक्का देतील.
> अॅक्सेसरीजचे ‘इन’ ट्रेण्ड्स
वन अॅट अ टाइम
नटणं मुरडणं म्हणजे हातात, कानात, नाकात, गळ्यात आणि पायातही खरे खोटे दागिने घालणं. पण हा नटण्या-मुरडण्याचा टिपिकल टे्रण्ड केव्हाच गेला आहे. यावर्षी तर कपड्यांबरोबरच ज्वेलरीमध्येही सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न प्रामुख्याने दिसेल. म्हणजे नजरेत भरेल असं काही ठसठशीत गळ्यात घातलं असेल तर हातात आणि कानात काही घालायचं नाही. आणि जर समजा हातात आणि कानात मोठ्ठं, ठाशीव काही घालणार असाल तर गळा मोकळा ठेवायचा. टू मेनी थिंग्ज अॅट वन टाइम हा कामाचा आणि उपक्रमाचा मल्टिटास्किंग फंडा राबवणारी तरुण पिढी पेहराव आणि अलंकाराच्या बाबतीत मात्र जरा साधं सुटसुटीत राहीन असं दिसतंय.
स्मार्ट घड्याळं
तरुण-तरुणींमध्ये टेक्नॉलॉजीची प्रचंड क्रेझ आहे. कुठलीही न्यू टेक्नॉलॉजी लॉँच झाली की ती वापरून पाहायला त्यांची अजिबात ना नसते. हा टे्रण्ड विशेषत: स्मार्ट घड्याळांत प्रामुख्यानं दिसेल. मिनी कम्प्युटरसारखी अशी घड्याळं जी तुम्हाला वेळ दाखवतीलच त्यासोबत तुमचं लोकेशन, तुमच्या शरीरातल्या कॅलरी याविषयीही सांगेल, तसेच तुम्ही जर खूप वेळ कम्प्युटरसमोर बसला असाल तर तुम्हाला दरडावून जागं करून एका जागेवरून उठून जरा मोकळं फिरून यायलाही भाग पाडतील. फिटनेसबाबत अॅलर्ट करणारी ही टेक्नॉलॉजी स्मार्ट दिसते. त्यामुळे वॉटरप्रूफ, वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सच्या स्मार्ट वॉचेस घालण्याकडे तरुण-तरुणींचा ओढा असेल.
लाइफस्टाइल शूज
कम्फर्ट, टे्रण्डी ही गरज फक्त कपड्यांच्या आणि दागिन्यांच्याच बाबतीत नसून पायातल्या वहाणांचीही आहे. दिवसभर आरामदायी वाटायला हवं आणि आपल्या पायाकडे पाहून मुलगा/मुलगी फॅशनेबल आहे हेही पाहणाऱ्याला कळायला हवं यासाठी स्पोटर््स शूजपेक्षाही तरुण-तरुणी लाइफस्टाईल शूज घालतील.
ड्राय फिट फॅबरिक जॅकेट
जे शूजच्या बाबतीत तेच जॅकेट्सच्याही बाबतीत. जॅकेट घातल्यावर बाहेरून भलेही हिरो दिसू, पण आतून जो घामट फील येतो तो कॅरी करण्याची तरुणांची इच्छा नाही. त्यामुळे यंदा ड्राय फिट फॅब्रिक जॅकेट्स तरुण विशेषत: घालतील. हे जॅकेट्स नुसतेच कम्फर्टेबल नसून स्वेट फ्रीही आहेत.
फॅशनेबल मोबाइल कव्हर
यंदा तरुण-तरुणी फक्त आपल्या अंगाखांद्यावरच्याच फॅशनचा विचार करणार नसून हातातल्या मोबाइललाही टे्रण्डी लूक देणार आहेत. हातातला मोबाइल, तो कोणत्याही ब्रॅण्डचा असू देत, त्याचं कव्हर कसं टे्रण्डी दिसायला हवं. शिवाय आपण घातलेल्या डे्रसला ते शोभायलाही हवं. कारण दिवसभर मोबाइल हातात असतो ना. म्हणूनच मग वेगवेगळे प्रिण्ट्स आणि रंगांचे मोबाइल कव्हर तरुण ट्राय करतील. म्हणजे अंगावर जर लाइट कलरचा डे्रस असेल तर हातातल्या मोबाइलला जरा ड्राक कलरचे कपडे घातले जातील. आणि जर कपडे प्लेन असतील तर मोबाइलचे कव्हर हटकून प्रिण्टेड ठेवले जाईल.