बागेतले फिरते बाक
By admin | Published: January 7, 2016 09:46 PM2016-01-07T21:46:00+5:302016-01-07T21:46:00+5:30
सिमरन बागेत खेळायला जाते. खेळून दमले की सारे मित्र गप्पा मारत बाकडय़ांवर बसतात. पण सगळे सीमेण्टचे किंवा लोखंडी बाकडे. पावसाळ्यात
Next
>- सिमरन चढ्ढा
इयत्ता आठवी, लुधियाना, पंजाब
सिमरन बागेत खेळायला जाते. खेळून दमले की सारे मित्र गप्पा मारत बाकडय़ांवर बसतात. पण सगळे सीमेण्टचे किंवा लोखंडी बाकडे. पावसाळ्यात हे बाकडे भिजतात आणि मग त्यावर बसताच येत नाही. सिमरनला वाटलं या बाकडय़ांना हॅण्डल असलं आणि ते फिरते ठेवले तर? एका बाजूनं भिजले तर बाकडं फिरवायचं आणि खालची कोरडी बाजू वर करायची. म्हणजे मग मुलं, म्हातारी माणसं यांना जरा वेळ बागेत बसता येईल.
सिमरन म्हणते, ‘हा प्रश्न वाटतो छोटा पण मुलांना, आजीआजोबांना विचारा, किती त्रस होतो पावसाळ्यात. छोटी आयडिया लढवली तर हा प्रश्नच सुटू शकेल!’