ये दिल आखीर चाहता क्या है?
By admin | Published: October 2, 2014 07:31 PM2014-10-02T19:31:18+5:302014-10-02T19:31:18+5:30
दिल-ए -नादान, तुझे हुआ क्या है, आखीर इस दर्द की दवा क्या है? -कुठल्या बाजारात मिळते हो, दर्दे दिल की दवा?
Next
नादान दिल समझे कैसे?
दिल-ए -नादान, तुझे हुआ क्या है, आखीर इस दर्द की दवा क्या है?
-कुठल्या बाजारात मिळते हो, दर्दे दिल की दवा?
नाहीच मिळत.
कारण आपलं आपल्याला तरी कुठं माहिती असतं, आपल्याला नक्की काय हवंय ते.
कधी त्या ‘बडा नाम करेगा‘ म्हणणार्या आमीरसारखं वाटतं, बाकी सब झूठ, मेरा तो सपना है एक चेहरा, आखो में जादू होटो पे प्यार, बंदा ये खुबसूरत काम करेगा, दिल की दुनिया अपना नाम करेगा.
मात्र असं सारखं वाटत राहील आणि जे वाटतं त्यावरच ठाम राहील ते मन कसलं.?
कधी वाटतं, ‘प्यार से भी जरुरी कईं काम है, प्यार सबकुछ नहीं, जिंदगी के लिए.’
हे वाटणंबिटणं वाटत राहतं आणि आपण प्यार-इश्कमुहब्बतच्या ब्रेकप-पॅचपच्या चक्रात भरडून जातो.
कधी हसतो, कधी रडतो. दिल-ए-नादान मात्र नादानपणा करतच राहतं. या ‘नादानी’तून सुटून, प्रेमानं आयुष्य समृद्ध करण्याची आहे काही युक्ती? आहे कुणी असा दोस्त? जो आपल्याला उपदेशाचे डोस न पाजता, आपलं आयुष्य फुलवण्याची संधी देईल? आपलाच’ होऊन, आपलं जगणंच सुंदर करुन टाकील. भेटेल कुठे असा जिंदादिल दोस्त? -भेटेल ना ! आणि ती भेट, तुमचं जगणंच बदलून टाकेल !
जी ले जरा
शिक्षण-नोकरी-करिअर, पैसे, लग्नबिग्न. आणि नाकासमोरचं आयुष्य. अरे यार, आयुष्य आहे का कॅलेण्डर. एकामागून एक पान नुस्तं उलटत रहायचं. वाटतं, नकोच ही चाकोरी, नको हे काही सिद्धबिद्ध करुन दाखवणं. नकोच जीवघेणी स्पर्धा त्यापेक्षा मस्त बॅगपॅक करावी, प्रवास करावा, जग पहावं. सायकलवर जावं, पायी जावं, फिरावं, माणसं पहावी, जगणं शिकावं. ट्रेक करावेत, डोंगरदर्या पालथ्या घालाव्या, आपल्या सारख्याच मित्रांसोबत करावं असं काहीतरी काम ज्याचा इतरांना उपयोग होईल. सोशल वर्क नव्हे, तर आपलंच शिक्षण, इंडियातून भारतात नेणारं.
मात्र त्यासाठी भेटतील का असे काही मित्र ज्यांना कळेल हे असं चाकोरीबाहेरचं जगणं
भेटतील असे ‘येडे’ दोस्त - भेटतील ना ! आणि ती भेट, तुमचं जगणंच बदलून टाकेल !
दौलत भी, शोहरत भी.
मिले कैसे?
कधी वाटतं, आपल्याकडेही असावी दुनियाभरची दौलत आपणही म्हणावंच, मेरे पास गाडी है, बंगला है, दौलत है, शोहरत है, इज्जत है, और मा भी है ! मात्र ही दौलत-शोहरत फुकट कशी मिळणार?
त्यासाठी हाताशी उत्तम डिग्री हवी, प्रोफेशनल स्किल्स हवेत, नेटवर्किंग जमायला हवं, सॉफ्ट स्किल्स, पर्सनॅलिटी, उत्तम इंग्रजी असं बरंच काही हवं.
आणि आपली मात्र झोळीच गळकी. कधी कधी वाटतं, हाताशी काहीच नाही. आपण सारं शिकायला हवं,करायलाच हवी तयारी जग जिंकण्याची. मात्र नुस्त्या मुठी आवळून, जोषाचे फुगे भरल्यानं हे जमत नाही. त्यासाठी हवं मार्गदर्शन. प्रोफेशनल गायडन्स. नव्या जगाबरोबर चालण्यासाठी,
नव्हे त्या जगात रुजून त्या जगापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवण्यासाठी हवा अँटिट्यूड.
बदलांचा वेग समजून घेण्याचा दृष्टिकोन, आपल्याच डोळ्यांना द्यावी लागते त्यासाठी एक वेगळी नजर. आपलं जे आहे ते टिकवून नवं शिकण्याची, आकाशाकडे झेपवण्यासाठी मातीत घट्ट रुजण्याची आणि रुजूनही अजिबात ‘ताठर’न होण्याची ही अस्सल हिंमत आणि धमक कशी येणार आपल्यात?
आणि ती नसेल तर आपण टिकणार कसे ?-‘टिकायला’ तर हवंच, फुलायलाही हवं.
पण ते कसं?हे शिकवणारा आहे कुणी दोस्त?
जो या नव्या जगात आपला हात धरेल?
भेटेल कुठे असा गाईड?
- भेटेल ना !
आणि ती भेट,
तुमचं जगणंच बदलून टाकेल!