दारू डोक्यात गेली की, संपलंच !

By admin | Published: June 18, 2015 05:45 PM2015-06-18T17:45:46+5:302015-06-18T17:45:46+5:30

प्रेमभंग झाला की प्या दारू. दु:ख झालं, प्या दारू. जिंकलो तरी दारू, हरलो तरी दारू. दु:ख पचवण्यासाठी दारू. टेन्शन घालवण्यासाठी दारू. मजेसाठी दारू, थ्रिलसाठी दारू. खुन्नस जोमाने काढण्यासाठी दारू. असं निमित्त शोधत जे पितात, त्याचा परिणाम एकच, व्यसन-सवय आणि त्रास !

When the liquor went into the head, the expansion! | दारू डोक्यात गेली की, संपलंच !

दारू डोक्यात गेली की, संपलंच !

Next

बंटी दारूच्या व्यसनाच्या आहारी चालला होता हे खरंच ! त्याला आवरायला हवं, सावरायला हवं ही त्याच्या आईची कळकळ खरीच होती. त्यासाठीच तर तिनं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात मदत मागितली. मात्र मुक्तांगणच्या ढवळे सरांना भेटलो तर त्यांचं म्हणणं काहीसं वेगळं होतं. ते म्हणाले, ‘बंटीच्या प्रश्नात खोलवर जाऊन विचार केला तर पहिला टप्पा त्याच्या वडिलांच्या केसपासून सुरू होतो. त्यांच्या विशिष्ट वागण्यामुळे घरातील वातावरण फारसे सुखद राहिलेले नाही. आई आणि वडील यांच्यात असलेला सततचा तणाव, त्यांची दारू, त्या विषयावरची भांडणं एका बाजूला आहेत, तर दुस:या बाजूला बंटीच्या मनात दारू पिणं हे एक  सामाजिक मान्यता असलेलं व्यसन आहे. आपले कर्तृत्वानं मोठे असलेले वडील व्यसन करतात, घरात त्यांनी बार बसवला आहे या गोष्टी तो लहानपणापासून पाहत आला आहे. आपण मोठं होणं, यशस्वी होणं याचा संबंध बंटीनं दारू पिण्याशी स्वत:च्या नकळत लावून टाकला आहे. त्यामुळे माझ्या मते सुधारणोची सुरुवात बंटीच्या वडिलांपासून करायला हवी !’

- ढवळे सर सांगत होते. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे मला काही गोष्टींचा उलगडा झाला. उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू समाजात वावरणा:या उच्चवर्गीय लोकांच्या काही चमत्कारिक धारणा असतात. सर्वसाधारणपणो या धारणा किंवा समजुती प्रचलित जीवनशैलीशी निगडित असतात. सोशल ड्रिंक म्हणजे पाटर्य़ामधे दारू पिणं ही त्यातलीच एक उच्चभ्रू धारणा.
त्यातून ते खात्री नसलेली माहितीही आपल्या वतरुळात फॉरवर्ड करत राहतात. त्यातलीच एक बातमी की, एक विशेष प्रकारची वाइन रोज घेणा:या व्यक्तीला हृदयविकाराचा धोका टाळण्यास मदत होते. यातदेखील मेख आहे. विशिष्ट देशात पिकणा:या विशिष्ट द्राक्षांपासून बनवलेली वाइन काही प्रमाणात हृदयविकार कमी होण्यास पूरक ठरते. 
पण ते तिकडे, आपल्याला हृदयविकार टाळण्यासाठी अनेक सोपे आणि फुकट पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे रोज अर्धा ते पाऊण तास मोकळ्या हवेत फिरणं, अति तेलकट पदार्थ कमी खाणं, व्यायाम करणं. पण हे सारं टाळून महागडय़ा वाइनची किंमत मोजून स्वत:च आपल्या शरीराचे नुकसान का करून घ्यायचं? दुर्दैवाने अशी अनेक मिथकं समाजमनात रूजलेली आहेत. आणि ती सर्व मिथकं अर्धवट माहितीवर आधारलेली आहेत आणि त्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
मुक्तांगणमधे मला दारूच्या व्यसनाविषयी अशी बरीच माहिती तपशिलात मिळाली. 
दारू पिणा:या लोकांना वाटतं की, दारूमुळे कामभावना वाढते आणि समागम उत्तम होतो. वस्तुस्थिती तशी नाही. दारुनं माणूस उत्तेजित झाला तरी मेंदूतील परिणामामुळे तो समागम अपेक्षित काळ करू शकत नाही. इतकेच नव्हे, तर व्यसनामुळे काही जणांची इच्छा आणि क्षमताही कमी होते ! 
अनेकांना असं वाटतं की मी फक्त बिअर पितो. फार तर व्होडका-जीनसारखी लेडीज ड्रिंक्स. हे मिथक समजणारे इतके जण आहेत आणि ते स्वत:ला नियंत्रित मद्यपी असं समजतात. वस्तुस्थिती अशी आहे की, माणसाला दारूचा किती त्नास होतो ते कोणते पेय माणूस पितोय याच्यावर अवलंबून नसून, त्याच्या रक्तात असलेला मद्यार्काचा अंश हा असतो.
हिंदी चित्नपटांनी अजून दोन मिथकांची भर घातली आहे. एक म्हणजे प्रेमभंग झालं की प्या दारू. दु:ख झालं, प्या दारू. जिंकलो तरी दारू, हरलो तरी दारू. दु:ख पचवण्यासाठी दारू. टेन्शन घालवण्यासाठी दारू. मजेसाठी दारू, थ्रिलसाठी दारू. खुन्नस जोमाने काढण्यासाठी दारू. 
परिणाम एकच, व्यसन-सवय आणि त्रस ! 
ढवळे सर म्हणाले, ‘दारूला मिळणारी प्रतिष्ठा ही सगळ्यात मोठी समस्या आहे. दूरदर्शन किंवा चित्नपटात दारू पिण्याचे प्रसंगात जरी संदेश दिला जात असला की हे आरोग्यासाठी घातक आहे, तरी ते इतके छोटे असते की पाहण्यात दंग असलेल्या कुणाच्या ते लक्षातच येत नाही. उलटपक्षी अनेकांना दारू एन्जॉय करायच्या नवनवीन आयडिया मिळतात. आत्ता हे सगळे बंटीच्या वडिलांच्या डोक्यात चालू असेल.’
मी विचारलं की, तुम्ही सांगितलं म्हणून त्याच्या वडिलांनी दारू पिणं थांबवलं असेल का?
ढवळे सर म्हणाले, ‘नाही. सुप्रियाताईंचा फोन आला होता. त्यांचा निर्धार दोनच दिवस टिकला. जेव्हा सुप्रियाताईंनी आमच्या भेटीची आठवण करून दिली त्यावर ते म्हणाले, दोन दिवस जास्त झाली. या क्षणापासून बंद म्हणजे बंद. मग सारखी कॉफी पिणो, थंड पाण्याने अंघोळ करणो वगैरे सुरू झाले. पण त्रास चालूच राहिला. मग पुन्हा पूर्वीच्या पदावर गाडी आली.
बंटीची तर वार्ता पण नाही. म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. कारण मुळात हा आजार ओळखणं अवघड आणि हा आजार मला झालं आहे हे मान्य करणं हे त्याहून अवघड. जोर्पयत माणूस मी आजारी आहे असे मान्य करत नाही तोर्पयत तो होणा:या त्नासावर घरगुती उपचार करीत राहतो. हेच तत्त्व दारूच्या आजारालाही लागू होतं.’
पण मग या आजारानं बरबाद होणा:यांनी सावरायला हवं, तेही वेळीच!!
 
 
- मनोज कौशिक 
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणो यांच्या सहकार्याने
 
दारू पिऊन गाडी चालवणा:यांचा दोष काय?
* अलीकडचीच एक बातमी तुम्हीही ऐकलीच असेल. मुंबईत एका उच्च विद्याविभूषित मद्यपी महिलेचं वाहन चालवताना नियंत्नण सुटलं आणि दोन निष्पाप जीव एका अपघातात मरण पावले. साधारणपणो मद्य पिऊन वाहन चालवल्याने रस्त्यावरील अपघातात बळी गेलेल्या मृत्यूचं प्रमाण 5क् टक्के इतके जास्त आहे.
 
* एक ड्रिंक (3क् मिलिलिटर) पोटात गेल्यावर रक्तातील मद्याचे प्रमाण क्.क्2 टक्के असते. त्यावेळी माणसाला प्रतिक्रि या देण्याची क्षमता आणि प्रतिक्षिप्त क्रि या मंद होतात. त्याचा परिणाम म्हणजे माणूस एकाच वेळी दोन गोष्टींवर काम करू शकत नाही. पुढे रक्तातील मद्याचे प्रमाण क्.क्3 टक्के झाले की  स्टेअरिंगवरील नियंत्नण कमी होते आणि हेच प्रमाण जर क्.क्4 टक्के झाले तर तुमचे डोळे फक्त रस्त्यावर फोकस होतात आणि सिग्नल, पादचारी मार्ग, वाहतूक नियमनाच्या खुणा याकडे साफ दुर्लक्ष होतं. आणि रक्तातील मद्याचे प्रमाण क्.क्5 टक्के झाले की तुमचे वाहन चालवणो लेफ्ट-राईट लेफ्ट असे ङिागझाग होते. परिणाम अपघात.

Web Title: When the liquor went into the head, the expansion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.