नायजेरियन तरुण का चिडलेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 03:02 PM2020-10-15T15:02:09+5:302020-10-15T15:02:20+5:30

नायजेरियातील अबुजा आणि लागोस शहराच्या रस्त्यावर हजारों तरुण उतरले. जोरदार घोषणाबाजी करत पोलीस दलात सुधारणेची मागणी त्यांनी लावून धरली. आंदोलनाचं स्वरूप व व्याप्ती पाहता सरकारने तत्काल 30वर्षे जुने स्पेशल पोलीस दल बरखास्त केले. 

Why are Nigerian youth angry? | नायजेरियन तरुण का चिडलेत?

नायजेरियन तरुण का चिडलेत?

Next

- कलीम अजिम

रविवारी नायजेरियन युवकांनी पोलिसी अत्याचाराविरोधात भला मोठा मोर्चा काढला. 
तरुणांचा हा आक्रोश इतका महलप्रचंड होता की जागतिक मीडियाला त्यांची दखल घ्यावी लागली. नायजेरियातील अबुजा आणि लागोस शहराच्या रस्त्यावर हजारों तरुण उतरले. जोरदार घोषणाबाजी करत पोलीस दलात सुधारणेची मागणी त्यांनी लावून धरली. आंदोलनाचं स्वरूप व व्याप्ती पाहता सरकारने तत्काल 30 वर्षे जुने स्पेशल पोलीस दल बरखास्त केले. 
नायजेरियन नागरिकांसाठी पोलिसी कौर्य तसं नवं नाही. 
रोजगार, उदरनिर्वाह व सामाजिक समस्या असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. 
दारिद्रय़, शिक्षणाचा अभाव, संधीच्या असमानतेमुळे सरकारी यंत्रणेवर मोठा जनसमूह नाराज आहेच.
सामाजिक अपप्रवृत्तीही वाढलेल्या आहेत. अशावेळी रोजगार व पायाभूत सुविधा पुरवण्याऐवजी सरकारने लोकांचं वर्तन-व्यवहार नियंत्रित करण्याची योजना काढली. त्यातून 1992 साली ‘अँटी रॉबरी स्कॉड’ची (सार्स) स्थापना झाली.
असामाजिक तत्त्वाचा बंदोबस्त करण्यासाठी अतिरिक्त अधिकार या दलाला प्रदान करण्यात आले; पण झाले उलटेच. अतिरिक्त शक्तीमुळे पोलिसांनी सामान्य नागरिकांचे जगणो मुश्कील केले. या विशेष पोलीस पथकाविरोधात कारवाईच्या नावाने रस्तोरस्ती स्टॉप अँण्ड सर्च ऑपरेशन राबवणं. आरोपींचा क्रूर छळ करणं. चोरीच्या आरोपावरून निरपराध तरुणांना तुरुंगात घालणं, अमानुष व निर्दयी मारहाण करणं, रस्त्यावरून जाणा-या तरुणांना बळजबरी रोखत त्यांच्या मौल्यवान वस्तू काढून घेणं, अशा अनेक तक्रारी आहेत. 


मीडिया रिपोर्ट सांगतात की, पोलीस कस्टडीत अनेक तरुणांचे बळी गेले आहेत. अखेर तरुणांनी एकत्र येत पोलिसी अत्याचाराचा कायमचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं. सोशल मीडियाचा वापर करत नियोजनबद्ध आखणी केली गेली.  लोकशाही पद्धतीने विरोध दर्शवला. त्यासाठी मोठी मोर्चेबांधणी केली. 
ही चळवळ दोन प्रकारे राबवली गेली. एकीकडे ऑनलाइन तर दुसरीकडे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून.
 पीडितांनी आपला छळ व दाहक अनुभव वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये शेअर केला. बघता-बघता भयंकर वेदनादायी प्रतिक्रि यांची रिघ लागली. 
त्यातून  ‘एण्ड सार्स’ हे मोठं अभियान उभं राहिलं.
तरुणांची संघटित शक्ती काय करूशकते, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.


( कलीम मुक्त पत्रकार आहे.)

kalimazim2@gmail.com

 

 

Web Title: Why are Nigerian youth angry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.