जिल्ह्यात १ हजार ३७ रुग्ण ; १८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:13 AM2021-04-29T04:13:33+5:302021-04-29T04:13:33+5:30

जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आरोग्य विभागाला बुधवारी २ हजार ७६७ नागरिकांचे अहवाल प्राप्त ...

1 thousand 37 patients in the district; 18 killed | जिल्ह्यात १ हजार ३७ रुग्ण ; १८ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात १ हजार ३७ रुग्ण ; १८ जणांचा मृत्यू

Next

जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आरोग्य विभागाला बुधवारी २ हजार ७६७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या २००५ अहवालांमध्ये ७७० आणि रॅपिड टेस्टच्या ७६२ अहवालांमध्ये २६७ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्रही जिल्ह्यात जोरात सुरू आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्णांचे मृत्यू होत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ३ तर खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या १८ रुग्णांमध्ये १० महिला आणि ८ पुरुषांचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण ३४ हजार १७० रुग्णसंख्या नोंद झाली असून त्यापैकी २६ हजार २२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनाने ८५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७ हजार ९१ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील जिल्हा रुग्णालय २१८, आयटीआय हॉस्पिटल- १५५, जिल्हा परिषदेचे कोविड हॉस्पिटल- २६५, अक्षदा मंगल कार्यालय- १५५, रेणुका कोविड हॉस्पिटल- १२७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ५ हजार ५६८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title: 1 thousand 37 patients in the district; 18 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.