३६५ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:17 AM2021-03-05T04:17:41+5:302021-03-05T04:17:41+5:30

ग्रामीण भागाचा विचार केला तर आतापर्यंत ५७ हजार ६५९ ग्रामस्थांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ४३९ गावांमधील १ हजार ९८३ ...

365 villages blocked the Corona at the gates | ३६५ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

३६५ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

Next

ग्रामीण भागाचा विचार केला तर आतापर्यंत ५७ हजार ६५९ ग्रामस्थांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ४३९ गावांमधील १ हजार ९८३ ग्रामस्थांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना बाधित झालेल्या १ हजार ९८३ रुग्णांपैकी १ हजार ८३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ९० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सध्या ५७ रुग्ण उपचार घेत आहेत. परभणी तालुक्यात ८५ गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे पाथरी तालुक्यात ४०, पूर्णा ४६, जिंतूर ६३, गंगाखेड ६३, मानवत ३०, पालम ३७, सेलू ४६ आणि गंगाखेड तालुक्यातील २९ गावांमध्ये मागील दीड वर्षात कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. उर्वरित गावांनी मात्र कोरोनाला वेशीबाहेर ठेवले आहे.

दहापेक्षा अधिक रुग्ण असलेली ४७ गावे

जिल्ह्यात ४७ गावामध्ये १० पेक्षा अधिक रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. परभणी तालुक्यात १०, पाथरी ५, पूर्णा १०, जिंतूर ७, गंगाखेड ८, मानवत, पालम, सेलू तालुक्यात प्रत्येकी २ गावे आणि सोनपेठ तालुक्यात एका गावात १० पेक्षा अधिक रुग्ण नोंद झाले आहेत.

Web Title: 365 villages blocked the Corona at the gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.