८०४ रुग्ण; २२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:17 AM2021-04-25T04:17:17+5:302021-04-25T04:17:17+5:30

मागील एक महिन्यापासून कोरोना संसर्गाने धास्ती निर्माण केली आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढली आहे. सुरुवातीला ३०० ते ४०० च्या ...

804 patients; 22 killed | ८०४ रुग्ण; २२ जणांचा मृत्यू

८०४ रुग्ण; २२ जणांचा मृत्यू

Next

मागील एक महिन्यापासून कोरोना संसर्गाने धास्ती निर्माण केली आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढली आहे. सुरुवातीला ३०० ते ४०० च्या दरम्यान असलेली ही रुग्णसंख्या आता ८०० ते १००० च्या घरात पोहोचली आहे. शनिवारी प्रशासनाला २ हजार ८०१ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ९७८ अहवालात ४८८ आणि रॅपिड टेस्टच्या ८२३ अहवालात ३१६ जण पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूने जिल्हावासीयांची धडधड वाढविली आहे. आठवडाभरापासून दररोज १५ ते २० रुग्णांचा मृत्यू होत आहे. २४ एप्रिल रोजी २२ रुग्णांचा कोराेनाने मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात १, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १३, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयांत ४ आणि खासगी रुग्णालयात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या रुग्णांमध्ये १७ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ३० हजार ७७७ झाली आहे. त्यातील २२ हजार ८५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ७७६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ७ हजार १४४ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील जिल्हा रुग्णालयात २१९, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५२, जि.प. कोविड रुग्णालयात २८८, अक्षदा मंगल कार्यालयात १५६, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये ११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ५ हजार ६४९ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

५३२ रुग्णांची कोरोनावर मात

शनिवारी जिल्ह्यातील ५३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील आठवडाभरापासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Web Title: 804 patients; 22 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.