लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने शहरात मागील दोन महिन्यांपासून मोहीम सुरू केली आहे़ मात्र वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाºया कारवाया लक्षात घेता वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी केवळ वसुलीवरच भर दिला जात असल्याचे दिसत आहे़अनेक ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असताना कानाडोळा केला जातो आणि ठराविक ठिकाणी मात्र शिस्तीचा बडगा उगारत दंड वसूल केला जात असल्याने वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे़परभणी शहरातील वाहतूक व्यवस्था मागील अनेक वर्षांपासून कोलमडली आहे़ जागोजागी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते़ त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणे, छोटे मोठे अपघात होणे यासारख्या घटना घडतात़ या विस्कळीत वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उद्देशाने दोन महिन्यांपूर्वी वाहतूक शाखेने शहरात मोहीम सुरू केली़वाहतुकीला अडथळा ठरणारी दुचाकी वाहने थेट उचलून कारवाई केली जाऊ लागली़ सुरुवातीला या मोहिमेचे स्वागतही झाले; परंतु, ही मोहीम राबवित असताना वाहतूक शाखेचे कर्मचारी दुजाभाव करीत असल्याचे समोर येत आह़े़ शहरात जागोजागी वाहने लावली जातात़ वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने हातगाडे लावलेले आहेत़ परंतु, याविरूद्ध कारवाई होत नाही़ विशेष म्हणजे, शहरात वास्तव्याला असलेल्या वाहनधारकाने नियम मोडला तर त्याकडे कानाडोळाही केला जातो़; परंतु, ग्रामीण भागातील वाहनधारकांवर मात्र कडक कारवाई केली जाते़ हा दुजाभाव दररोज जागोजागी दिसत आहे़ ग्रामीण भागातून दररोज अनेक युवक शहरात कामानिमित्त येतात़ अशा वाहनधारकांना कडक नियम लावले जातात़ वाहनधारकाच्या नजरचुकीने नियमांचे उल्लंघन झाले असताना त्या वाहनधारकाला सुरुवातीला समज देणे आवश्यक असते़; परंतु, असे न करता थेट पावती फाडून दंड आकारला जात आहे़ शहरातील काही मोजक्याच ठिकाणी ही कारवाई केली जात असून, इतर ठिकाणांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे़ या प्रकारामुळे वाहतूक शाखेच्या कारवाईविषयी वाहनधारकांतून संताप व्यक्त केला जात आहे़एकाच ठिकाणी पोलिसांचा गराडाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात दररोज मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित असतात़ एका पॉर्इंटवर दोन कर्मचारी पुरेसे असताना ५ ते ६ पोलीस कर्मचाºयांसह अनेक वेळा पोलीस अधिकारीही या ठिकाणी उपस्थित राहून कारवाई करीत आहेत़ त्यामुळे एवढ्या कर्मचाºयांची एकाच ठिकाणी काय आवश्यकता? असा सवाल उपस्थित होत आहे़ अनेक भागांत तर वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थितही नसतात़ रेल्वेस्थानक परिसर, नारायण चाळ, उड्डाणपूल या ठिकाणी पोलीस कर्मचाºयांची आवश्यकता आहे़ वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयांनी या भागात वारंवार विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे़ परंतु, वाहूतक सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचारी पुढे येत नाहीत़ मात्र दंड आकारण्यासाठी पोलीस कर्मचारी नेहमीच अग्रेसर असल्याचे दिसत आहे़टोर्इंग व्हॅन कारवाईबाबतही संतापवाहतुकीला अडथळा होऊ नये या उद्देशाने वाहतूक शाखेन टोर्इंग व्हॅनच्या सहाय्याने वाहने उचलून कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे़ प्रत्यक्षात एखादे वाहन रस्त्यात उभे असेल तर त्या वाहनाचा पंचासमक्ष पंचनामा करूनच ते वाहन ताब्यात घेणे अपेक्षित आहे़ परंतु, सर्रास वाहने उचलून कारवाई केली जात आहे़ शहरामध्ये पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही, अशी ओरड झाल्यानंतर महापालिकेने काही भागात पार्किंगचे पट्टे ओढले़ परंतु, या पार्किंगची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वाहतूक शाखेची असताना ती मात्र झटकली जात आहे़ रस्त्यात उभी असणारी वाहने पार्किंगमध्ये नेवून उभी केली तर वाहतुकीला शिस्त लागू शकते़ शिवाय अनेक ठिकाणी पार्किंगच्या स्थळीच हातगाडे, छोटे व्यावसायिक थांबतात़ ही जागा पार्किगसाठी मोकळी करणे अपेक्षित आह़े़ त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे़शहराबाहेरही होते कारवाईशहरामध्ये वाहतूक शाखेने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे़ परंतु, शहराबाहेरही वाहतूक शाखेतील काही कर्मचारी वाहनधारकांकडून दंड वसूल करीत आहेत़ गुरुवार हा जनावरांच्या बाजाराच्या दिवशी जनावरांची वाहतूक करणाºया वाहनधारकांकडून दंड वसूल केला जातो़४तसेच शहरात दाखल होण्यापूर्वीच वाहनधारकांकडून दंड वसूल करण्याच्या उद्देशाने वाहतूक शाखेचे कर्मचारी शहराबाहेरही थांबत असल्याचे दिसत आहे़
ांविरूद्ध कारवाई करण्यात आली.शिस्त लावण्याऐवजी वसुलीवरच भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:50 AM