लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात भर पावसाळ्यात पुरेसा पाऊस न बरसल्याने आॅक्टोबर महिन्यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील पशूपालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे़दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागते़ परंतु, यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही़ परतीच्या पावसानेही पाठ फिरविली़ त्यामुळे जिल्ह्यातील जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यातच रबी हंगामातही ज्वारीची पेरणी झाली नाही़ त्यामुळे जनावरांचे प्रमुख खाद्य समजल्या जाणारा कडबा शेतकºयांकडे उपलब्ध होणार नाही़ सोयाबीनही हातचे गेल्याने भविष्यात जिल्ह्यात तीव्र चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे पशूपालक आॅक्टोबर महिन्यातच अडचणीत आले आहेत़ शासनाने जिल्ह्यात चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी होत आहे़
परभणी जिल्ह्यातील पशूपालक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:41 AM