जलद आणि विनाअडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या अनधिकृत डिजिटल मंच व मोबाइल ॲपचे प्रमाण मागील काही दिवसांत वाढले आहे. कर्जदारांकडून अधिक व्याजदर व छुपे आकार मागण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कर्जवसुलीसाठी दडपशाहीच्या पद्धतीचा अवलंब केला जात असल्याच्या तक्रारी आरबीआयकडे प्राप्त झाल्या आहेत. या संस्थांकडून फोनमधील डाटा मिळविण्यासाठी कराराचा गैरवापरही केला जात आहे. तेव्हा ग्राहकांनी अशा कर्ज देणाऱ्या संस्थांना बळी पडू नये. केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती आणि अनधिकृत ॲप्सबरोबर कधीही शेअर करू नयेत. अशा अनधिकृत ॲप्सना बँक खात्याची माहिती देऊ नये. यासंदर्भात ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी सचेत पोर्टलचा उपयोग करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बँका व एनबीएफसीच्या वतीने वापरण्यात येणाऱ्या डिजिटल कर्जदायी प्लॅटफॉर्मने ग्राहकांना बँक किंवा एनबीएफसीची नावे सुरुवातीलाच सांगावीत, अशा सूचना आरबीआयने दिल्या आहेत.
कर्ज देणाऱ्या अनधिकृत डिजिटल संस्थांपासून सावध राहण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:14 AM