बोरी : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी बोरी गावातून सायकल रॅली काढून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
देशात सर्वाधिक दराने परभणी जिल्ह्यात पेट्रोलची विक्री होत आहे. त्याचबरोबर डिझेल व गॅस दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतीत आहेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी बोरी येथील युवक काँग्रेसच्या वतीने कौसडी फाटा ते पेट्रोल पंपापर्यंत रविवारी सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये इंधन दरवाढीबाबत घोषणाबाजी करण्यात आली. या रॅलीमध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नागसेन भेरजे, किसान सेलचे प्रभाकर बोर्डीकर, प्रदीप देशमुख, अंकुश राठोड, राम देशमुख, शेख सलमान शेख चाँद, दासराव कनकुटे, चांदजचे सरपंच अरुणराव गजभारे, पिंपळगाव येथील सरपंच सुरेश कानडे, विजय ठमके, रमेश कड, गणेश जाधव, भगवान झाडे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.