परभणी जिल्ह्यात बीडीओंविरूद्ध पुकारले बहिष्कार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:27 AM2017-11-27T00:27:31+5:302017-11-27T00:29:33+5:30
येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांविरूद्ध ग्रामसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने पंचायत समितीतील अधिकारी विरूद्ध ग्रामसेवकांचा वाद चव्हाट्यावर आला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांविरूद्ध ग्रामसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने पंचायत समितीतील अधिकारी विरूद्ध ग्रामसेवकांचा वाद चव्हाट्यावर आला आहे़
पूर्णा पंचायत समिती अंतर्गत ७९ ग्रामपंचायती असून, ५४ ग्रामसेवक कार्यरत आहेत़ मागील काही महिन्यांपासून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरवसे यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामसेवकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती़ शनिवारी ग्रामसेवकांच्या संघटनेने गटविकास अधिकाºयांविरूद्ध तक्रार अर्ज दिल्याने हा वाद चव्हाट्यावर आला आहे़ या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश सवडे यांनाही निवेदन पाठविले आहे़ गटविकास अधिकारी आरेरावीची भाषा वापरून ग्रामसेवकांना दमदाटी करतात़ काही तक्रारी घेऊन गटविकास अधिकाºयांकडे गेल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्याची धमकी दिली जाते़ विकासकामांच्या प्रस्तावात उणिवा काढून ही कामे स्वत:च्या मर्जीप्रमाणे करून घेतात, असे आरोप ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाºयांनी केले आहेत़ गटविकास अधिकाºयांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामसेवक त्रस्त असून, गटविकास अधिकाºयांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एऩए़ देसाई, उपाध्यक्ष के़एम़ भुसारे, सचिव आऱएस़ शिंदे, तुकाराम साखरे, केशव जवंजाळ आदींनी केली आहे़
ग्रामसेवक संघटनेने या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सविस्तर निवेदन दिले असून, त्यात अनेक आरोप केले आहेत़ या सर्व प्रकरणावर गटविकास अधिकाºयांची वरिष्ठस्तरावरून चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली असून, ही चौकशी पूर्ण होईपर्यंत पंचायत समितीस्तरावर होणाºया मासिक व अर्धमासिक बैठकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे़ ग्रामसेवकांच्या या पवित्र्यामुळे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे़ एकंदर या प्रकरणामुळे विकास कामांनाही खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे़