चुकीच्या पद्धतीने केलेली व्याज आकारणी रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:22+5:302021-06-30T04:12:22+5:30

परभणी : शहरात मालमत्ता कराची आकारणी चुकीच्या पद्धतीने होत असून, ही व्याज आकारणी व शास्ती तात्काळ रद्द करावी, अशी ...

Cancel the wrongly charged interest | चुकीच्या पद्धतीने केलेली व्याज आकारणी रद्द करा

चुकीच्या पद्धतीने केलेली व्याज आकारणी रद्द करा

Next

परभणी : शहरात मालमत्ता कराची आकारणी चुकीच्या पद्धतीने होत असून, ही व्याज आकारणी व शास्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केली आहे.

महानगरपालिकेने मालमत्ता कर आकारणी चुकीच्या पद्धतीने केली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी सहा- सहा महिने अगोदर दोन टप्प्यांमध्ये कर आकारणी करून मुदतपूर्व हा कर वसूल केला जातो. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच व्याज आकारणीची अत्यंत चुकीची पद्धत मनपाने अवलंबिली आहे. तसेच राज्य शासनाने २००८ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी आदेश काढून २००८ नंतरच्या अनधिकृत बांधकामांबाबत तपासणी अहवाल व आकारणी अहवाल सादर होईपर्यंत अनधिकृत बांधकामांवर शास्ती लावू नये, असे लेखी आदेश काढले होते; परंतु महापालिकेच्या वतीने सध्या मालमत्ता कर आकारणी पावतीवर अनधिकृत बांधकाम शास्ती हा कॉलम दिला जात आहे. त्यातून नागरिकांची मोठी लूट होत आहे. तेव्हा ही अनधिकृत वसूल केलेली रक्कम नागरिकांना परत करावी, तसेच चुकीच्या पद्धतीने लावलेली व्याज आकारणी रद्द करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, ज्ञानेश्वर पंढरकर, पिंटू कदम यांनी केली आहे.

आज बोलावली बैठक

महानगरपालिकेच्या वतीने चुकीच्या पद्धतीने शास्ती आकारणी आणि व्याज आकारणी होत असल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केल्यानंतर या प्रश्नावर मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ३० जून रोजी बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात होणाऱ्या या बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त, करनिर्धारण विभागाचे सहायक आयुक्त, तहसीलदार आदींची उपस्थिती राहणार आहेत. तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवलिंग बोधने व इतर पदाधिकाऱ्यांनाही या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: Cancel the wrongly charged interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.