शहरात कोरोनाकाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:13 AM2021-01-10T04:13:40+5:302021-01-10T04:13:40+5:30

परभणी : मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात रुग्णांनी उपचार घेतले. या काळात शहरातील जैविक कचऱ्यामध्ये दुप्पट ...

In the city of Corona | शहरात कोरोनाकाळात

शहरात कोरोनाकाळात

Next

परभणी : मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात रुग्णांनी उपचार घेतले. या काळात शहरातील जैविक कचऱ्यामध्ये दुप्पट वाढ झाली. सर्वसाधारणपणे १२० टन कचरा या कालावधीमध्ये संकलित केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रुग्णालयांमध्ये जमा होणारा कचरा जैविक कचरा म्हणून संकलित केला जातो. त्यात शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारे इंजेक्शन, हँडग्लोज, मास्क आणि शस्त्रक्रियेनंतर झालेला कचरा हा स्वतंत्ररित्या जमा केला जातो. परभणी शहरात जालना येथील अतुल इन्व्हारमेंट या एजन्सीमार्फत हे काम केले जाते. शहरातील सर्व रुग्णालयांमधील कचरा जमा केला जातो. कोरोना संकटाच्या पूर्वी साधारणत: ४५ टन कचरा महिन्याकाठी संकलित केला जात असे. मात्र कोरोनाच्या काळामध्ये तो १२० टनापर्यंत पोहोचला होता. यात कोरोनासह इतर जैविक कचऱ्याचाही समावेश होता. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग घटला असून, जैविक कचऱ्याचे प्रमाणही कमी झाले आहे. मागील महिनाभरापासून शहराच्या हद्दीत या एजन्सीमार्फत दररोज साधारणत: २०० ते २२० किलो कचरा संकलित केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कोरोनाकाळातच जैविक कचरा वाढल्याचे दिसत आहे.

एकही दंडात्मक कारवाई नाही

जैविक कचरा हा अस्ताव्यस्त टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. ९ महिन्यांच्या कालावधीत महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणाही कोरोनाच्या नियंत्रणासाठी व्यस्त होती. मात्र बहुतांश रुग्णालयातून हा कचरा नियमित उचलला जात असल्याने या काळात एकही दंडात्मक कारवाई झाली नाही.

शहरातील अतिदक्षता विभाग असलेल्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयेही जैविक कचरा संकलित करणाऱ्या एजन्सीकडे नोंद आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून नियमितपणे कचऱ्याचे संकलन होते. त्यामुळे हा कचरा मोठ्या प्रमाणात संकलित करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.

Web Title: In the city of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.