CoronaVirus : लोणी तांड्यावरील 92 ऊसतोड मजुरांचे अखेर स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 06:35 PM2020-03-31T18:35:09+5:302020-03-31T18:36:58+5:30
4 दिवसापासून लोणीजवळ शेतात होते पाल टाकून
- विठ्ठल भिसे
पाथरी - एकीकडे कोरोनाच्या विष्णुचा कहर सुरू असताना पाथरी तालुक्यातील लोणी तांड्यापासून दीड किमी अंतरावर अडरणातील शेतात चंद्रपूर जिल्ह्यातील 92 ऊस तोड मजूर 26 मार्च पासून पाल टाकून राहत होते ना त्यांची आरोग्य सर्वेक्षण मध्ये नोंद ना आरोग्य तपासणी ही बाब लोकमतने समोर आणल्या नंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली पोलिसां सोबतच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत 31 मार्च रोजी सर्व मजुरांचे पाथरी येथे स्थलांतर केले
31 मार्च रोजी दुपारी कोरोना संदर्भात महसूल विभागाचे पथक लोणी तांड्यावर हजर झाले यात उपजिल्हाधिकारी व्ही एल कोळी , तहसीलदार एन यु कागणे ,गटविकास अधिकारी बी टी बायस यांच्या समावेश होता , 26 मार्च रोजी रात्री उशिरा मुला बाळा सह 92 मजूर या भागात लोणी ग्राम पंचायत अंतर्गत लोणी तांड्या पासून दीड किमी अंतरावर मुकादम यांच्या शेतात हे मजूर पाल ठोकून मुक्कामी राहू लागले , कोरोनाचा कहर सुरू असताना आणि पाच जिल्ह्याच्या सीमा ओलांडून ही मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली नव्हती , 30 मार्च रोजी या घटनेबाबत लोकमत ऑनलाइन ला बातमी प्रकाशित झाली आणि त्या नंतर प्रशासन जागे झाले , 30 मार्च रोजी तालुका आरोग्य अधिकारी के पी चौधरी आरोग्य पथकासह घटनास्थळी दाखल होऊन सर्व मजुरांची तपासणी करण्यात आली ,
आरोग्य विभागाच्या पथकाने आज सकाळी सर्व ऊस तोड मजुरांची मजूर थांबलेल्या ठिकाणी जाऊन त्यांच्या हातावर होम कोरन्टीन चे शिक्के मारण्यात आले त्या जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार तहसीलदार एन यु कागणे यांनी सकाळी 8 वाजता लोणी तांडा गाठून माहिती घेतली त्या नंतर दुपारी मजुरांच्या स्थलांतर संदर्भात कारवाई सुरू झाली पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या सोबत सर्व मजूर दोन ट्रॅक्टर मधून पाथरी येथील महात्मा फुले मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे ,
3 किमी गावाच्या बाहेर पाल
लोणी बु गावाच्या बाहेर 3 किमी अंतरावर एका शेतात हे मजूर पाल करून राहू लागले होते त्या मुळे गावात कोणालाही याची खबर लागली नाही की नोंदणीत आले नाहीत ज्या वेळी ही बाब निदर्शनास अली त्या वेळी प्रशासकीय यंत्रणेचा एकच गोंधळ उडाला गेला