CoronaVirus : 'सांगा,पहिल्यांदा आपण कोठे भेटलो'; एकटेपणा घालवणारा सोशल मीडियावरील नवा ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 02:44 PM2020-03-30T14:44:29+5:302020-03-30T14:45:23+5:30

वेळ तर जातोच सोबत जुन्या आठवणींना मिळतोय उजाळा

CoronaVirus: 'Tell us where we first met'; New trends have emerged on social media for skipping loneliness | CoronaVirus : 'सांगा,पहिल्यांदा आपण कोठे भेटलो'; एकटेपणा घालवणारा सोशल मीडियावरील नवा ट्रेंड

CoronaVirus : 'सांगा,पहिल्यांदा आपण कोठे भेटलो'; एकटेपणा घालवणारा सोशल मीडियावरील नवा ट्रेंड

googlenewsNext

- विठ्ठल भिसे

पाथरी : 'सांगा,आपली पहिली भेट कुठे झाली?' सोशल मीडियावर सध्या सुरू झालेल्या या ट्रेंडमुळे अनेकांचे मनोरंजन होत आहेच त्यासोबत वेळही जात आहे. सोशल मीडियावरील अनेक ओळखी या शाळा कॉलेज मधील मित्र, सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमातीळ ओळख असते मात्र यात पहिली प्रत्यक्ष भेट कधी झाल्याचे यातून मागे पडते. मात्र हा नवीन ट्रेंड जुन्या आठवणीला उजळणी देण्यासाठी  सुरू झालाय ,फेसबुकवर सुरू झालेला ट्रेंड आता सर्व सोशल मीडियावर दिसून येत आहे. आता या माध्यमातून संचारबंदीच्या काळात हीच ओळख घरातील एकटे पण घालवण्यासाठी पुढे आल्याचे दिसत आहे एवढे मात्र नक्की.

#नमस्कार, #माझं_नाव :- -------------
 सोशल मीडियावर आपली ओळख आहेच मात्र प्रत्यक्षात कधीतरी आपली गाठभेट झालीच असेल. आपण पहिल्यांदा कधी/कुठे/कसे भेटलो (एखादं ठिकाण, एखादी व्यक्ती, एखादा क्षण, एखादा प्रसंग, माझ्याकडून भविष्यातील अपेक्षा ) हे आठवत असेल तर एका शब्दात/वाक्यात कमेंट करावी. त्यानिमित्ताने आपल्या प्रथम भेटीच्या आठवणींना उजाळा मिळेल. जरी झाली नसेल तर लवकरच भेटू 🙂


#21DaysChallenge #QuarantineDays
#StayHomeStaySafe


वरील वाक्य फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोणी जुने मित्र, कोणी व्यवसायिक मित्र, तर कोणी नुकतेच सोशल मीडियामधून ओळख झालेले मित्र संचारबंदीच्या काळात या नवीन ट्रेंड मधून आठवणींना उजाळा देत आहेत. बर जुने मित्र शोधावे असा उद्देश असेल तर ठीक आहे मात्र आपण कोठे भेटलो ही जुनी आठवण  पुन्हा आठवायची हा मोठा लोच्या आणि हो आता सगळेच जण घरात बसले असल्याने या ट्रेंड मधून वेळ ही निघून जात असल्याने, ही नवीन शक्कल कामी आलीय असेच म्हणावे लागेल 


आपली ओळख अंगणवाडीची
जवा अंगणवाडी चावडीवर भरत होती तवा आपली पहीली भेट  झाली, कोणाची कोठे भेट झाली यावर फेसबुकवर अनेक प्रतिक्रिया पहावयास मिळत आहेत. कोल्हा येथील उदय भिसेच्या फेसबुक वॉलवर तर जवा अंगणवाडी चावडीवर भरत होती तेंव्हा आपली भेट झाली अशी जुन्या आठवणींना उजाळा देणारी प्रतिक्रिया बोलकी ठरली आहे 

Web Title: CoronaVirus: 'Tell us where we first met'; New trends have emerged on social media for skipping loneliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.