तरुणाच्या मृत्यूप्रकरणी टिप्पर चालकाविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:22 AM2021-08-12T04:22:05+5:302021-08-12T04:22:05+5:30
गंगाखेड तालुक्यातील वाघलगाव येथील जीवन नामदेव काचोळे (२४) हा तरुण ४ ऑगस्टच्या रात्री ८ च्या सुमारास एमएच २२ एव्ही ...
गंगाखेड तालुक्यातील वाघलगाव येथील जीवन नामदेव काचोळे (२४) हा तरुण ४ ऑगस्टच्या रात्री ८ च्या सुमारास एमएच २२ एव्ही ९३५८ क्रमांकाच्या दुचाकीवरून गंगाखेड येथून गावाकडे येत असताना अंधारात उभ्या असलेल्या एमएच ४४ यु ५५५७ क्रमांकाच्या हायवा टिप्परला दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात जीवन काचोळे हा गंभीर जखमी झाला. उपचारार्थ त्याला गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून औरंगाबाद येथे हलिवण्यात आले. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना ८ ऑगस्ट रोजी जीवन काचोळे याचा मृत्यू झाला. याबाबत मयताचे नातेवाईक संजय पंडितराव दिवसे यांनी ८ ऑगस्ट रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून एमएच ४४ यू ५५५७ क्रमांकाच्या हायवा टिप्पर चालकाविरोधात निष्काळजीपणे रस्त्यात वाहन उभे करून जीवन काचोळे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.