लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : कर्जासाठी उपोषणास बसलेल्या शेतकºयाच्या मृत्यूनंतर तिसºया दिवशी प्रशासकीय अधिकाºयांनी कुटूंबियांच्या भेटीसाठी मरडसगावकडे धाव घेतली़ या प्रकरणी शनिवारी ‘लोकमत’ने प्रत्यक्ष मरडसगाव येथे जाऊन ग्राऊंड रिपोर्ट प्रसिद्ध केला होता़ मयत शेतकºयाच्या कुटूंबियाची व्यथा ‘लोकमत’मधून मांडल्यानंतर अधिकाºयांनी मरडसगाव येथे कुटूंबियांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली़कर्जाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मरडसगाव येथील शेतकरी तुकाराम काळे यांचा उपोषणा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना १३ डिसेंबर रोजी घडली होती़ अत्यंत गरीब कुटूंबातील तुकाराम काळे यांच्या मृत्यूनंतर ‘लोकमत’ने मरडसगाव येथे भेट देऊन काळे यांच्या कुटूंबियांची सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली़ घटनेनंतर एकही प्रशासकीय अधिकारी या गावाकडे फिरकला नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला होता़ ‘लोकमत’च्या वृत्तानंतर तहसीलदार निलम बाफना, गटविकास अधिकारी बी़टी़ बायस यांनी कुटूंबियांची भेट घेतली़आरोग्य अधिकारीही दाखलमयत तुकाराम काळे यांच्या पत्नीच्या दोन्ही कानाच्या शस्त्रक्रिया झाल्याने त्या आजारी आहेत़ ही बाब ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती़ मरडसगाव येथे तातडीने भेट देऊन काळे यांच्या पत्नीस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल करावे, त्यांच्या विविध चाचण्या घ्याव्यात, अशा सूचना परभणी येथील वरिष्ठ अधिकाºयांनी पाथरगव्हाण बु़ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाºयांना दिल्या होत्या़ या सुचनेप्रमाणे वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेश हलगे, डॉ़ गजानन शिंदे व इतर कर्मचारी शनिवारी मरडसगाव येथे दाखल झाले़ काळे यांच्या पत्नीची तपासणी केली़ दिवसभर हे अधिकारी मरडसगाव येथे उपस्थित होते़तातडीची मदत हवीतुकाराम काळे यांच्या मृत्यूनंतर हे कुटूंबिय उघड्यावर पडले असून, या कुटूंबाला सावरण्यासाठी तातडीने शासकीय मदतीची गरज निर्माण झाली आहे़ शानिवारी अधिकाºयांनी भेटी दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात आर्थिक मदतीविषयी ठोस आश्वासन मिळाले नाही़ जिल्हा प्रशासनाने या कुटूंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे़
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याचे मृत्यू प्रकरण : ...अन् अधिकारी धावले भेटीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:55 AM