रोजगार हमीच्या शासकीय कामांची घटली संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:22 AM2021-08-27T04:22:27+5:302021-08-27T04:22:27+5:30
दरवर्षी पावसाळ्यामध्ये रोहयोअंतर्गत होणाऱ्या कामांची संख्या कमी होते. यंदाही ही संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीला एकूण ५१६ कामे ...
दरवर्षी पावसाळ्यामध्ये रोहयोअंतर्गत होणाऱ्या कामांची संख्या कमी होते. यंदाही ही संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीला एकूण ५१६ कामे सुरू आहेत. त्यापैकी ४३४ कामे ग्रामपंचायतींची आहेत, तर १०६ कामे विविध शासकीय यंत्रणांनी सुरू केली आहेत. शासकीय यंत्रणांच्या कामांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीची केवळ जिंतूर तालुक्यातच ३७ कामे सुरू केली, तर रेशीम आणि कृषी विभागाची प्रत्येकी ३४ कामे सध्या सुरू आहेत.
दुसरीकडे ग्रामपंचायतीमार्फत कामांची संख्या वाढली असली तरी प्रत्यक्षात घरकुलाचीच कामे अधिक आहेत. त्यामुळे इतर मजुरांना या कामांवर रोजगार मिळणे अवघड झाले आहे. ग्रामपंचायतींनी वैयक्तिक विहिरींची ९७, वैयक्तिक वृक्ष लागवडीची ९२, सार्वजनिक वृक्ष लागवडीची ३२ कामे सुरू केली आहेत. मागील आठवड्यात केवळ ४३०४ मजुरांच्या हाताला काम मिळाले.