गंगाखेड नगर परिषद कार्यालयात लिपीक, वॉलमन, सेवक, सफाई कामगार, शिपाई, वाहन चालक पदावर सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतनाचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून मंजूर झालेले नाहीत. या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान, महागाई भत्ता आदी लाभ व निवृत्ती वेतन मिळाले नाही. सेवानिवृत्तीनंतर वयोमानानुसार हे कर्मचारी दुर्धर आजाराने पीडित झाल्याने औषधोपचार व अन्य कामासाठी त्यांना नियमित पैशाची आवश्यकता भासत आहे. निवृत्तीवेतन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती पूर्वक विचार करून कुटुंब सेवा निवृत्ती वेतन धारक कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्वरित निकाली काढून थकीत महागाई भत्ता, सेवा उपदान व अन्य लाभ तात्काळ अदा करावे, अशी मागणी उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी केली आहे. निवेदनावर विष्णू खळीकर, कालीदास जोशी, अंबादास कुलकर्णी, दौलत मोरे, म. वा. कुलकर्णी, हाजी शेख गफार, नागोराव सनसाळे, अनंता महाजन, विष्णुकांत वलसेटवार, भीमराव खरात, माणिक साळवे, शंकर गायकवाड, सय्यद निजाम, सु. ग. बोर्डे, कलावतीबाई कोतावर, रामा साळवे, राधाबाई जगतकर, पद्मीनबाई साळवे, गंगाबाई जाधव, नामदेव सावंत, नन्हुबाई जगतकर आदी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो कॅप्शन: गंगाखेड नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव त्वरित निकाली काढावे, या मागणीचे निवेदन उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे यांना देतांना विष्णु खळीकर, कालीदास जोशी, अंबादास कुलकर्णी, हाजी शेख गफार, दौलत मोरे, विष्णुकांत वलसेटवार, सय्यद निजाम आदी.