परभणीत ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीचे धरणे आंदोलन
By मारोती जुंबडे | Published: October 2, 2023 05:55 PM2023-10-02T17:55:44+5:302023-10-02T17:56:13+5:30
ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्याची मागणी
परभणी: येथील ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने ओबीसींचे आरक्षण कायम ठेवा, या प्रमुख मागणीसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात २ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले.
ओबीसी समाजाला मंडळ आयोगाच्या काही शिफारशी लागू झाल्यामुळे नोकऱ्यांमध्ये स्थान मिळू लागले आहे. परंतु, जे काही थोडेफार ओबीसींच्या पदरात पडले आहे. ते सुद्धा सरकारच्या डोळ्यात खूपत असल्याने समाजामध्ये राज्य सरकार विरुद्ध संताप व्यक्त होत आहे, असे निवेदनात नमूद करुन ओबीसींच्या आरक्षण कायम ठेवा, जातीनिहाय जनगणना तत्काळ करा, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करा यासह प्रमुख मागण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात माजी महापौर भगवान वाघमारे,सुरेश भुमरे, स्वराजसिंह परिहार, कीर्तीकुमार बुरांडे,नानासाहेब राऊत, डॉ. धर्मराज चव्हाण,आनंद बनसोडे, प्रा. तुकाराम साठे, विशाल बुधवंत, अविनाश काळे, कृष्णा कटारे, अंगद सोगे, प्रल्हाद चिंचाणे, फैजुल्ला पठाण, फारुख ओबीसी, शाम कटारे, प्रल्हाद देवडे, किशोर खत्री, गंगाधर यादव, अजय तुरे यांच्यासह सकल ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होते. आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.