पाथरीत तूर आणि हरभरा खरेदीचे 6 कोटी 62 लाखाचे चुकारे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 06:56 PM2018-07-06T18:56:32+5:302018-07-06T18:57:14+5:30

शासनाने पाथरी प्रथमच  हमी भावातील तूर आणि हरभरा खरेदी केंद्र सुरु केले.मात्र,या केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या तूर आणि हरभरा पिकांचे तब्बल 6 कोटी 62 लाख रुपये चुकारे अद्यापही ही मिळाले नाहीत.

farmers are waiting for 6 crores 62 lacks rupees of purchased tur and harbhara in pathari | पाथरीत तूर आणि हरभरा खरेदीचे 6 कोटी 62 लाखाचे चुकारे अडकले

पाथरीत तूर आणि हरभरा खरेदीचे 6 कोटी 62 लाखाचे चुकारे अडकले

Next

पाथरी (परभणी ) : शासनाने पाथरी प्रथमच  हमी भावातील तूर आणि हरभरा खरेदी केंद्र सुरु केले.मात्र,या केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या तूर आणि हरभरा पिकांचे तब्बल 6 कोटी 62 लाख रुपये चुकारे अद्यापही ही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी आपला माल हमी भाव खरेदी केंद्रावर विक्री करून अडचणीत सापडला आहे.

पाथरी तालुक्यासाठी मानवत येथे हमीभाव खरेदी केंद्र ठेवण्यात आले.या भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन एप्रिल महिन्यात पाथरी येथे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि नाफेडच्या वतीने हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. यानुसार तूर  5400 तर हरबरा 4400 रुपये दराने खरेदी करण्यात आला. 

या केंद्रावर 18 एप्रिल ते 13 जून या काळात 253 शेतकऱ्यांची 3892 क्विंटल तूर तर 829 शेतकऱ्यांचा 10289 क्विंटल हरभरा बाजार समिती मार्फत खरेदी करण्यात आला. यानुसार तुरीचे 2 कोटी 12 लाख 14 हजार 125 तर हरभऱ्याचे 4 कोटी 52 लाख 3 हजार 400 रुपये चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. 

पहिल्याच वर्षी अडचण
पाथरी तालुक्यात या वर्षी पहिल्यांदा च शासनाने हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले, केंद्र सुरू झाल्यावर शेतकऱ्यांची गैरसोय कमी होईल असे वाटत होते मात्र हमी भावावर घेतलेल्या मालाचे चुकारे मिळत नसल्याने शेतकरी अधिक च अडचणीत सापडला आहे

शेतकरी अडचणी त
शासनाच्या हमी भाव खरेदी केंद्रावर शेतकरी चांगला भाव मिळेल म्हणून माल विक्री करण्यास आणतात.मात्र,माल विक्री करून वेळेत रक्कम मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत
-अनिल नखाते,सभापती,बाजार समिती, 
शेतकऱ्यांकडून सतत विचारणा
हमी भाव केंद्रावर शेतकऱ्यांनि आपला माल विक्री केला, खरेदी नंतर शेतकरी मालाचे चुकारे कधी मिळतील यासाठी वाट पाहत आहेत, सतत विचारणा होत आहे, मात्र अद्याप रक्कम उपलब्ध झाली नाही 
-बी एस कुटे, सचिव बाजार समिती पाथरी

Web Title: farmers are waiting for 6 crores 62 lacks rupees of purchased tur and harbhara in pathari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.