परभणी बांधकाम कंत्राटदारांकडून फसवणूक; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:13 AM2021-04-29T04:13:26+5:302021-04-29T04:13:26+5:30

परभणी शहरातील सुभेदार नगर भागातील सेवानिवृत्त कर्मचारी नुरमोहमद जानमोहमद शेख यांनी काद्राबाद प्लाट भागात घराचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदार जावेदखान ...

Fraud by Parbhani construction contractors; Filed a crime | परभणी बांधकाम कंत्राटदारांकडून फसवणूक; गुन्हा दाखल

परभणी बांधकाम कंत्राटदारांकडून फसवणूक; गुन्हा दाखल

Next

परभणी शहरातील सुभेदार नगर भागातील सेवानिवृत्त कर्मचारी नुरमोहमद जानमोहमद शेख यांनी काद्राबाद प्लाट भागात घराचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदार जावेदखान अहेमदखान याच्यासोबत १५ ऑक्टोबर २०१९ रोजी लेखी करार केला होता. त्यानुसार सर्व बांधकाम साहित्य व मजुरीसह ३० लाख रुपये कंत्राटदार जावेदखान यांना देण्याचे निश्चित करण्यात आले होते नंतरच्या कालावधी बांधकामात सुधारणा करण्यात आली. त्यामुळे कामाच्या रकमेत ७ लाख ८५ हजारांची वाढ झाली होती. त्यानुसार नूरमोहमद शेख कंत्राटदार जावेदखान ३५ लाख रुपये दिले. १४ जानेवारी २०२१ पर्यंत ८५ हजार रुपये आणि सर्व काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित २ लाख रुपये देण्याचे ठरले होते. घराचे सर्व बांधकाम ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करून देण्याचे ठरले होते. निश्चित केलेली रक्कम बँकेच्या माध्यमातून देण्यात आली; परंतु कंत्राटदार जावेद खान याने लेखी कराराप्रमाणे घराचे बांधकाम केले नाही. ठरावाप्रमाणे बांधकामाचा दर्जा राखला नाही तसेच घराचे बांधकाम दरवाजे, खिडक्या, फरशी, रंगरगोटी काही ठिकाणचे प्लास्टर, पायऱ्या आणि इतर ठिकाणची स्टीलची रेलिंग, समोरील वॉल कंपाैंड, मेनगेट, आंगण व पेव्हर ब्लाक, आदी १० ते १२ लाख रुपयांचे घराचे काम सोडून कंत्राटदार २५ मार्च २०२१ रोजी निघून गेला. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच नूरमोहमद जानमोहमद शेख यांनी २७ एप्रिलला नानलपेठ पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून आरोपी जावेदखान अहेमदखान याच्यावर फसवणूक व अन्य विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Fraud by Parbhani construction contractors; Filed a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.