ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:43 AM2021-01-13T04:43:11+5:302021-01-13T04:43:11+5:30
पूर्णा : ग्रामीण भागाच्या विकासासाठी महाआघाडीचे सरकार कटिबद्ध असून, परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न ...
पूर्णा : ग्रामीण भागाच्या विकासासाठी महाआघाडीचे सरकार कटिबद्ध असून, परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही ग्रामीण विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत १२ जानेवारी रोजी परभणी, मानवत आणि पूर्णा येथे कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात आले. पूर्णा येथील मेळाव्यात सत्तार बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री अर्जुन खोतकर, खा. बंडू जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, महिला आघाडीच्या सखुबाई लटपटे, गंगाप्रसाद आणेराव, सुधाकर खराटे, प्रभाकर वाघीकर, दशरथ भोसले, काशिनाथ काळबांडे, मुंजा कदम, साहेब कदम व नितीन कदम, नगरसेवक श्याम कदम व ॲड. राजेश भालेराव, विकास वैजवाडे आदींची उपस्थिती होती.
जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खा. बंडू जाधव म्हणाले, ग्रामीण भागात शिवसेनेचे विचार मागील ४० वर्षांपासून घराघरात पोहोचले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पूर्णा तालुक्यातील बिनविरोध निवडून आलेल्या ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार करण्यात आला. साहेबराव कल्याणकर यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेना शहरप्रमुख मुंजा कदम यांनी आभार मानले.