परभणीत तूर खरेदीचे अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:34 AM2018-04-17T00:34:10+5:302018-04-17T00:34:10+5:30
जिल्ह्यातील सहा हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही १३ हजार ९०७ शेतकºयांच्या तुरीची खरेदी शिल्लक आहे. तूर खरेदीसाठी केवळ तीन दिवस प्रशासनाकडे शिल्लक असून, या काळात सर्व शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे. शासनाने तूर खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील सहा हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही १३ हजार ९०७ शेतकºयांच्या तुरीची खरेदी शिल्लक आहे. तूर खरेदीसाठी केवळ तीन दिवस प्रशासनाकडे शिल्लक असून, या काळात सर्व शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे. शासनाने तूर खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
जिल्ह्यात यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र सुरुवातीच्या काळात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांना खाजगी बाजारपेठेत तूर विक्री करावी लागली. तुरीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकºयांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाभरातून ओरड वाढली. त्यानंतर परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पूर्णा आणि बोरी येथे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, तूर खरेदीची गती अतिशय कमी होती. १८ एप्रिलपर्यंत हमीभावाने तूर खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत ४९७३८.५० क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडे १७ हजार १३९ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी केवळ ३ हजार २३२ शेतकºयांचीच तूर खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १९ टक्के शेतकºयांची तूर खरेदी करणे झाले असून, ८१ टक्के शेतकºयांची तूर येत्या तीन दिवसांत खरेदी करावी लागणार आहे.
जिंतुरात सर्वाधिक खरेदी
जिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रापैकी जिंतूर येथील हमीभाव खरेदी केंद्रावर सर्वाधिक १०८२१ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. सेलू येथील खरेदी केंद्रावर १०५७६ क्विंटल, गंगाखेड ८१२९.५० पूर्णा- ७७६९.५०, बोरी- ७२१६.५० आणि परभणी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत ५२२६ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.
मुदतीत खरेदीसाठी वाढविले काटे
जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या सर्व तूर उत्पादकांची तूर खरेदी करण्यासाठी मार्केटींग फेडरेशनने प्रत्येक खरेदी केंद्रावर २ काटे वाढविले आहेत. तर परभणी येथील खरेदी केंद्रावर आठ ते दहा काट्यांच्या साह्याने खरेदी सुरू करण्यात आली आहे. पूर्वी दिवसाकाठी १२०० ते १३०० क्विंटल तुरीची खरेदी होत होती. काटे वाढविल्यामुळे सुमारे अडीच हजार क्विंटल तुरीची खरेदी दररोज होत असल्याची माहिती मार्केटींग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली. असे असले तरी मुदतीत सर्व तूर खरेदी होणे अशक्य असल्याने खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
मुदत संपत आली तरी अर्ध्याहून अधिक शेतकºयांची तूर खरेदी बाकी असल्याने शेतकºयांतही चिंता व्यक्त केली जात आहे. शासनाने सर्व शेतकºयांची तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.
तुरीसह जिल्ह्यात हरभºयाचीही खरेदी हमीभावाने केली जाणार आहे़ यासाठी राज्य शासनाने हमीभाव खरेदी करण्याचे आदेश दिले असले तरी अजूनही तीन केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नाही़ हरभरा विक्रीसाठी जिल्ह्यातील १ हजार ८८४ शेतकºयांनी प्रशासनाकडे नोंदणी केली आहे़ जिल्ह्यात ६ हमीभाव खरेदी केंद्र असून, त्यापैकी परभणी, गंगाखेड आणि बोरी हे तीन केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नाही. तर सेलू येथील खरेदी केंद्रावर २७७ क्विंटल, पूर्णा २०१़५० क्विंटल आणि जिंतूर येथील खरेदी केंद्रावर १३ क्विंटल हरभºयाची खरेदी करण्यात आली आहे़ परभणी तालुक्यात ७८७, जिंतूर ८५, सेलू ५४५ आणि पूर्णा ४६७ शेतकºयांनी हरभºयाच्या विक्रीसाठी नोंदणी केली आहे़