विविध कार्यक्रमांतून महापुरुषांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:14 AM2021-01-14T04:14:43+5:302021-01-14T04:14:43+5:30
कर्तृत्ववान नागरिकांचा गौरव येथील रामकृष्ण हरि मंडळ संचलित नाना पटोले युवामंच, वीर वारकरी सेवा संघ यांच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त ...
कर्तृत्ववान नागरिकांचा गौरव
येथील रामकृष्ण हरि मंडळ संचलित नाना पटोले युवामंच, वीर वारकरी सेवा संघ यांच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शहरातील कर्तृत्ववान नागरिकांचा सत्कार करण्यात आला. स्टेडियम परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रकाश कंठाळे, डॉ. राजगोपाल कालानी, सुभाष जावळे, नितीन देशमुख, विजया कातकडे, कलावंत मधुकर कांबळे, डॉ. कल्पना सावंत, प्रा.रूपा कृपा कंधारकर, नितीन रन्हेर आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बाळासाहेब मोहिते, पुरुषोत्तम झाडगावकर, संजय डहाळे, माजी महापौर प्रताप देशमुख, डॉ. पवन निकम, नारायण चट्टे, नितीन जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. नितीन महाराज गोळेगावकर यांनी प्रास्ताविक केले. नितीन रन्हेर यांनी आभार मानले.
सुभाषचंद्र बोस विद्यालय
येथील संजीवनी शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य सुरेश नाईकवाडे, एम. ए. काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास टी. आर. बोबडे, आर. डी. चव्हाण, बी. डी. जावळे, एम. बी. निर्वळ, एस. एल. रेंगे, एम. एम.शिंदे, एस. टी. गारकर, एस. एस. वायगुडघे, एम. आर. टोम्पे, बी. डी. जावळे, व्ही. एन. सोनवणे आदींची उपस्थिती होती.
मांगणगाव येथे कार्यक्रम
तालुक्यातील येथील पार पडलेल्या कार्यक्रमास ह.भ.प. रामप्रसाद महाराज, राजू पवार, मधुकर शिंदे, त्र्यंबकराव शिंदे आदींची उपस्थिती होती. शाहीर राजू पवार यांनी पोवाडा सादर केला. उमेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास त्र्यंबकराव शिंदे, विठ्ठल शिंदे, विठ्ठलराव माळेकर, राम पवार, लक्ष्मणराव मुळे, भगवानराव शिंदे, योगेश वरकड, गोविंद वरकड, नारायण मुळे आदींची उपस्थिती होती.
जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय
येथे पार पडलेल्या कार्यक्रमास सुरेश भिसे, सारिका भिसे, अशोक दुधारे, अर्चना लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. भावना तारे, साक्षी भिसे, श्रद्धा धोपटे, श्रेया पवार, प्रिती जाधव, प्रियंका जाधव, विशाल वानखेडे, ओंकार निर्वळ, वैभव साठे, सपना भिसे आदी विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रक, चित्र रेखाटन, जिजाऊ वंदना या उपक्रमात सहभाग नोंदविला. सुनील काळे यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार निर्वळ यांनी आभार मानले.