सेलू : कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील हादगाव पावडे येथे क्षेत्रीय किसान कार्यक्रमांतर्गत सिद्धेश्वर पावडे यांच्या शेतात गुरुवारी अंतर्गत कांदा पीक उत्पादन या विषयावर कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापठाचे कृषी विद्यावेतन यु.एन. आळसे, प्रगतशील शेतकरी प्रभाकर चव्हाण, आत्मा उपप्रकल्प संचालक सराफ, कृषी सहाय्यक पी.आर. पवार, शिवराज कदम, सोमेश हुगे यांची उपस्थिती होती. यावेळी कांदा बीजोत्पादन या विषयवर मार्गदर्शन करून कांदा सरी वरंबा पद्धतीने घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू या पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. सुहास धोपटे यांनी सूत्रसंचालन तर अनंता महाराज पावडे यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोरकिनी येथे महिला शेती शाळा
तालुक्यातील बोरकिन्ही येथे हरभरा पिकावर महिला शेती शाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हरभरा पिकावरील कीड नियंत्रण, अंतर मशागत तसेच खत देणे आदी बाबत महिलांमध्ये चर्चा घडवून आणली. तसेच हरभरा पिकाचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये प्रत्येक १५ दिवसाला शेती शाळा आयोजित केली जात आहे.