ग्रामीण भागात तापले वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:51 AM2021-01-08T04:51:36+5:302021-01-08T04:51:36+5:30
रस्त्याच्याकडेला कचर्याचा ढिगारा परभणी : शहरातील गांधी पार्क भागातील कचऱ्याची समस्या अद्यापही कायम आहे. येथील स्वच्छतागृहाजवळ मनपाने कचराकुंडी बसवली ...
रस्त्याच्याकडेला कचर्याचा ढिगारा
परभणी : शहरातील गांधी पार्क भागातील कचऱ्याची समस्या अद्यापही कायम आहे. येथील स्वच्छतागृहाजवळ मनपाने कचराकुंडी बसवली असली, तरी हा कचरा कुंडीतून खाली पडत असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या भागातील कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
हातगाड्यांचा वाहतुकीला अडथळा
परभणी : शहरातील बाजारपेठ भागात फळ आणि भाजी विक्रेते आपल्या हातगाड्या रस्त्याच्या बाजूने लावत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मध्यंतरी वाहतूक शाखेने या हातगाड्या हटविल्या होत्या; परंतु आता परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. हातगाड्यांवर भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
निवडणुकीमुळे नागरिकांची कामे ठप्प
परभणी: ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे नागरिकांची इतर प्रशासकीय कामे मात्र ठप्प झाली आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला अधिकारी- कर्मचारी प्राधान्य देत असून, सर्वसामान्य नागरिकांच्या कामांवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील विकासकामांसाठी आता नागरिकांना मतदानानंतर प्रशासकीय कार्यालयात पाठपुरावा करावा लागणार आहे.
जायकवाडी कालव्यात पाणी दाखल
परभणी : शहराजवळून जाणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामातील पाण्याचे हे दुसरे आवर्तन असून, गहू आणि हरभरा या पिकांसाठी हे पाणी फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यात जायकवाडीच्या कालव्यामुळे सुमारे ९० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.